' जुलुमी शासकांनी पाडलेली तब्बल ३०० मंदिरं पुन्हा दणक्यात निर्माण होणार आहेत! – InMarathi

जुलुमी शासकांनी पाडलेली तब्बल ३०० मंदिरं पुन्हा दणक्यात निर्माण होणार आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या वादाने वातावरण चांगलंच तापलंय. या मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मशिदीच्या ज्या भागात शिवलिंग सापडल्याचा दावा केला गेलाय तो भाग संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

अशा सगळ्या परिस्थितीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूर्वी उध्वस्त झालेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय गोव्यातील भाजपा सरकारने घेतला असल्याचं जाहीर केलं आहे.

 

masjid im1

 

सुट्टी टाकून फिरायला जाण्यासाठी आपल्यासमोर साधारण जे पर्याय असतात त्यातला गोवा हा हमखास समोर असलेला पर्याय. एकदा तरी गोव्याला जाऊन धमाल करण्याची अनेकांना इच्छा असते. त्यामुळे गोव्याची ओळखच आता पर्यटन स्थळ अशी झाली आहे. गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवणं हा पर्यटकांसाठी आल्हाददायक अनुभव असतो. गोव्याच्या या सौंदर्याचं वर्णन करणारी अनेक गाणीही प्रसिद्ध आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हेच गोवा आता केवळ मजामस्तीसाठीचं फिरण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं न जाता सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून ओळखलं जावं असा सरकारचा मानस आहे. मुघलांनी मंदिरं पाडली असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. अशात, पोर्तुगीजकाळात हिंदूची जी मंदिरं उध्वस्त केली गेली होती.

तशा तब्बल ३०० मंदिरांची पुनर्बांधणी करण्याची योजना सरकारने आखली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यादृष्टीने एव्हाना प्रयत्न सुरूही केलेत. काय आहे हे सगळं वृत्त? जाणून घेऊ.

 

temple goa 1

 

गेल्या काही काळापासून सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पर्यटनाचा प्रचार करून समुद्रांवरून मंदिरांकडे लोकांचं लक्ष वेधण्याचा गोवा सरकार प्रयत्न करतंय असं सावंत म्हणाले. आपल्या राज्यात पोर्तुगीजकाळात जी मंदिरं उध्वस्त झाली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्या सरकारने एव्हाना २० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीचं वाटप केलं आहे असं सावंत यांनी सांगितलं.

 

goa inmarathi

 

‘आरएसएस’ला ७५ वर्षं झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या प्रसारमाध्यमांच्या बैठकीत सावंत बोलत होते. ते म्हणाले, “पोर्तुगीजांनी ४५० वर्षं आपल्यावर राज्य केलं त्या काळात हिंदू संस्कृतीचा विनाश झाला आणि बऱ्याच लोकांनी आपले धर्म बदलले. राज्यातली मंदिरं उध्वस्त केली गेली. आम्ही या सगळ्याला नवसंजीवनी देणार आहोत. त्यात काय चुकीचं आहे? जिथे जिथे मंदिरं उध्वस्त झालेल्या स्थितीत आहेत तिथे तिथे त्यांची पुनर्बांधणी केली जावी असं मला वाटतं. हे माझं ठाम मत आहे.”

 

pramod sawant im

 

‘आरएसएस माऊथपीस’च्या संपादक आणि आयोजक प्रफुल्ला केतकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आपलं सरकार गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी अतिरिक्त काम करतंय असं ते म्हणाले. ते म्हणाले, “प्रत्येक गावात बरीच मंदिरं आहेत. आम्हाला लोकांना समुद्राकडून मंदिराकडे न्यायचं आहे.”

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले, “आमची प्रार्थनास्थळं ही आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्या’ची प्रतिकं आहेत. गोव्यातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनेक मंदिरं जीर्ण आणि दुर्लक्षित स्थितीत सापडतात.

पोर्तुगिजांचं सरकार होतं त्या काळात ही सांस्कृतिक केंद्रं नष्ट करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न केले गेले. पर्यटन विकास विचारात घेऊन आम्ही मंदिरं आणि वारसास्थळांच्या पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारासाठी २० करोड रुपयांची तरतूद केली आहे.”

बऱ्याच भाजपाशासित राज्यांमध्ये ‘समान नागरी कायद्या’बाबत चर्चा सुरू आहे. प्रफुल्ला केतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना सावंत म्हणाले की, गोव्याच्या समान नागरी कायद्याविषयी चर्चा झाली पाहीजे. कारण, तिथल्या अल्पसंख्यांकावर त्याचा दुष्परिणाम झालेला नाही. बाकी ठिकाणच्या लोकांनीही घाबरण्याचं कारण नाही. सावंत यांनी गोव्यात आधीच हा कायदा असल्याचं म्हटलं आहे.

 

temple goa im

इसवी सन ३२० ते ५५० चं सुवर्ण युग समजून घ्यायलाच हवं..वाचा या अज्ञात इतिहासाची गाथा!

मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

ते म्हणाले, “मी हे अभिमानाने सांगू शकतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोवा समान नागरी कायद्याचं पालन करतं आहे. बाकी सगळ्या राज्यांनीही समान नागरी कायद्याचं पालन करावं असं मला वाटतं. बाकी मुख्यमंत्र्यांशीही आम्ही समान नागरी कायद्याची चर्चा केली आहे.”

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. मात्र गोवा राज्य १९६१ मध्ये स्वतंत्र झालं. गोव्याला स्वात्रंत्र्य मिळायला इतका उशीर का झाला असा सवाल सावंत यांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारवर उपस्थित केला.

गोव्यात खाणकाम सुरू करण्यासंबंधी सावंत यांना विचारणा झाल्यावर ते म्हणाले की २०१२ सालापासून गोव्यात खाणकामावर बंदी आणली होती. पण गोव्यात पुन्हा खाणकाम सुरू करण्याबाबत त्यांचं सरकार काम करत आहे.

कुतुबमिनार, ज्ञानवापी सारख्या वादांच्या निमित्ताने आपल्याला माहीत नसलेली बरीच माहिती प्रकाशात येते आहे. सरकारने म्हटल्याप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी केली जाईलच. पण गोवा यापुढे केवळ समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येण्यापुरतं ठिकाण म्हणून मर्यादित राहील की खास मंदिरं पाहण्यासाठीही लोकांची भविष्यात गर्दी होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?