' गोड आश्चर्य! घरातील पाळीव प्राणी लहान मुलांचे गंभीर आजार दूर करू शकतात! – InMarathi

गोड आश्चर्य! घरातील पाळीव प्राणी लहान मुलांचे गंभीर आजार दूर करू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी…जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा पाळीव प्राणी असणे ही चांगली कल्पना आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला ते खरे वाटेल? गेल्या काही वर्षांमध्ये, मानसिक आरोग्य आणि पाळीव प्राणी यांचा संबंध जोडणारी अनेक संशोधने केली गेली आहेत.

काहींनी असे सुचवले आहे की पाळीव प्राण्यांची काळजी घेतल्याने शरीरातील ताणतणाव कमी होऊ शकतात आणि व्यक्तीला त्यांच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारचे ‘मोटिव्हेशन’ मिळते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की घरी पाळीव प्राणी ठेवल्याने पालक आणि ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये मजबूत नातेसंबंध निर्माण होतात आणि तणाव कमी होतो.

 

shahrukh khan 2 IM

 

माय नेम इज् खान मधला शाहरुख खान किंवा बर्फीमधली प्रियांका चोप्रा तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला कळेल की हे ऑटिझम म्हणजे नेमकं काय आहे. तर आता या ‘ऑटिझम’ नामक मानसिक आजारावर किंवा स्थितीवरसुद्धा पाळीव प्राणी उपाय ठरतायेत… आणि कसं? चला पाहुयात!

ऑटिझम म्हणजे नेमकं काय?

‘स्वमग्नता’ हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे.

स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही.

 

autism IM

 

स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात. ही स्थिती मुलांमध्ये मुलींपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते.

Animal Therapy म्हणजे नेमकं काय?

मंडळी..प्राणी आणि माणसातील मैत्री तशी जुनी आहे. त्यात माणसंही कुत्र्यांना पाळतात आणि त्यांची मैत्रीही अधिक जमते. वैद्यक शास्त्राने या दोघांची मैत्री वर्तणूक सुधारण्यासोबत आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार १० मिनिटांच्या ‘डॉग थेरपी’मुळे लोकांची चिंता आणि वेदना काही मिनिटांत नाहीशी होऊ शकते, असे म्हटले आहे.

 

dog therapy IM

 

कुत्रा, मांजर किंवा अनेक पाळीव प्राणी हे खेळताना – बागडताना कधीच कोणता विचार न करता मनसोक्त आनंद घेत असतात आणि देतही असतात. त्यांच्या नुसत्या सोबत असण्यानेदेखील आपल्याला कंटाळा किंवा नैराश्य जवळही फिरकत नाही.

अगदी सामान्य पातळीला सांगायचे तर एकट्याला वेळ मिळाला की माणूस नैराश्याच्या विचार करतो पण आजूबाजूला कायम आनंद देणारे, खेळणारे हे जीव असतील तर आपल्यालाच बाकी गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही.

अनेक मानसिक आरोग्याबद्दलचे तज्ञसुद्धा पेशंटना पाळीव प्राणी पाळायला सांगतात यालाच Animal Therapy असेही म्हणतात.

‘ऑटिझम’वर Animal Therapy उपयुक्त!

अमेरिकेच्या एका विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार ऑटिझम असलेल्या मुलांच्या पालकांना सामान्यतः विकसित मुले असलेल्या पालकांपेक्षा सरासरी जास्त ताण येतो.

ऑटिझम असलेल्या काही मुलांमध्ये विशिष्ट संवेदनशीलता असते त्या संवेदनशीलतेला पूरक असे पाळीव प्राण्यांचे वागणे असते. काही संशोधनात कुत्र्यापेक्षा मांजरही अधिक योग्य असू शकते असेही अभ्यास संशोधकांनी सांगितले होते.

मध्यंतरी ७०० हून अधिक कुटुंबांचे जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा घरात कुत्रा किंवा मांजर पाळण्याचे फायदे किंवा तोटे शोधण्यात आले. संशोधनात असे आढळून आले की, पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची पूर्णवेळ जबाबदारी असूनही ऑटिझम असलेली मुले आणि त्यांचे पालक त्यांच्याशी चांगले संबंध ठेवतात.

 

animal therapy IM

 

खरेतर ज्या पालकांच्या घरी जास्त पाळीव प्राणी होते त्यांनी अधिक फायदे नोंदवले. प्रामुख्याने असे म्हटले जाते की इतर गोष्टींबरोबरच, ऑटिझम असलेल्या मुलांना चिंताआणि संवादाच्या समस्या भेडसावतात.

संशोधनात असे दिसून आले आहे की पाळीव प्राणी हे मुले आणि त्यांचे पालक दोघांनाही आराम देऊ शकतात. संवाद वाढवू शकतात आणि चिंता किंवा तणाव कमी करू शकतात.

गेल्या काही वर्षांत, डॉक्टरांना पाळीव प्राणी आणि मानसिक आरोग्य यांच्यातील महत्त्वाचा संबंध सापडला आहे. यामुळे, प्राण्यांच्या सहाय्याने उपचार कार्यक्रम मानसिक आरोग्य उपचारांचा एक अविभाज्य भाग बनले आहेत.

घरी पाळीव प्राणी पाळल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते, त्यामुळे संवाद आणि मानसिक आरोग्य वाढीस लागते.

 

autism 3 IM

 

“आमचा मुलगा/मुलगी आधी ऑटिझममुळे कोणाशीच बोलत नव्हते..व्यक्त होत नव्हते..एका जागेवरचं बसून असायचे पण या मुक्या प्राण्यांनी त्यांना बोलायला भाग पाडलं. त्यांना व्यक्त व्हायला भाग पाडलं आणि आज ते काही प्रमाणात नॉर्मलला आले आहेत” हीच प्रतिक्रिया अनेक पालकांची आपल्या मुलांच्या बाबतीत असते असं मानसोपचारतज्ञ सांगतात.

त्यामुळे मंडळी..गेल्या काही वर्षांत डॉक्टरांना पाळीव प्राणी आणि मानसिक आरोग्य यांच्यातील महत्त्वाचा संबंध सापडला आहे. सध्या ही प्राण्यांची थेरपी मानसिक आरोग्य उपचारांचा अविभाज्य भाग बनली आहे!

अर्थात याचा नेमका किती फरक पडतोय ते येणारा काळच ठरवेल, पण ऑटिझमसारख्या आजारावर निघालेला हा उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकेल हे मात्र नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?