' प्रतिष्ठेच्या “कान्स फेस्टिव्हल”मागे आहेत आश्चर्यकारक अशी मोठाली आर्थिक गणितं! – InMarathi

प्रतिष्ठेच्या “कान्स फेस्टिव्हल”मागे आहेत आश्चर्यकारक अशी मोठाली आर्थिक गणितं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या देशात धार्मिक वातावरण चांगलेच तापले आहे तर दुसरीकडे चर्चा आहे ती कान्स फेस्टिव्हलची. अलिकडील काही वर्षांत बॉलिवुडनं जगप्रसिध्द कान्स चित्रपट फेस्टिव्हलची फॅशनची जत्रा बनवून टाकलेली आहे हे वास्तव आहे.

सामान्य भारतीयाला कान्स हे नावही माहीत नव्हतं मात्र मल्लीका शेरावत नावाच्या बी ग्रेड चित्रपटातून काम करणार्‍या, अंगप्रदशन, चुंबनदृश्यं यामुळे चर्चेत असणार्‍या एका अभिनेत्रीमुळे हे नाव प्रथम लहान शहरातल्या स्थानिक वृत्तपत्रातल्या बातम्यांत झळकलं आणि सर्वसामान्यांपर्यंत कान्स हे नाव पोहोचलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वेगळ्या धाटणीचे चित्रपट दर्दी प्रेक्षकांना पहायला मिळावेत अशी कान्सची एक वेगळीच ओळख आहे, मात्र गॉसिप कॉलम्स चवीन चघळणार्‍या प्रेक्षकांत कान्सची चर्चा ही त्यात सहभागी चित्रपटांपेक्शाही “रेड कार्पेट” सोहळ्यामुळे होते. रेड कार्पेटला अवाच्यासवा महत्व दिला गेलेला हा महोत्सव अशी बॉलिवुड निर्माण केलेली ओळख आहे.

 

cannes im

 

दरवर्षी कान्सचे वेध लागले लागले की रेडकार्पेट वर कोण कोण भारतीय विशेषत: बॉलिवुड सेलिब्रेटी चालणारआहेत, त्यांचे पोषाख किती महागडे असणार आहेत, आणि ते कोणत्या फॅशन डिझायनरनं बनविले आहेत याच्या चर्च्यांनी रकाने भरभरुन लिहिलं जातं आणि चवीनं वाचलंही जातं.

नाही म्हणायला भारतीय चित्रपट सहभागी असतील तर त्यांचीही थोडीफार चर्चा होते पण ते तितपतच. यावर्षी ६ विविध भाषेतील सिनेमे दाखल झाले आहेत. माध्यमांचा मुख्य झोत रेड कार्पेट चालणार्‍या सेलिब्रटीवरचअसतो.

कान्स महोत्सवाचा जन्म २९ सप्टेंबर १९४६ ला झाला. अल्पावधीतच हा जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाऊ लागला. आपल्या चित्रपटाला कास्नमधे हजेरी लावायला मिळणं हे प्रतिष्ठेचं, अभिमानाचं मानलं जाऊ लागलं. हा इतका महागडा महोत्सव आहे की इथल्या ब्लॅक टाय ओन्ली प्रिमियरसाठी पॅलेस दे फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेट्वर चालत चित्रपट बघायला जाणं केवळ उच्चभ्रू लोकांनाच परवडू शकतं. सर्वसामान्यांसाठी तिकिटांची विक्रीही होत नाही.

 

cannes im 4

 

खरं बघता कान्स हा केवळ चित्रपट महोत्सव उरला नाही. इथे भविष्यातल्या या क्षेत्रातल्या मोठमोठ्या गुंतवणुकी ठरतात, जगभरातून निर्माते, कलाकार आपल्या आगामी चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावतात.त्याचप्रमाणे अनेक जागतिल ब्रॅण्ड या महोत्सवासोबत करार करतात आणि यात सहभागी होतात. या ब्रॅण्डचे चेहरे असणारे कलाकार ज्यांना ब्रॅण्ड अँबेसिडर म्हणलं जातं ते या फेस्टिवलमध्ये कंपनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हजेरी लावतात.

 

cannes im 2

 

भारतातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश नसतो की त्यांच्या हातात कोणता चित्रपट नसतो ज्याची जाहिरात त्यांना या फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून करायची असते पण असे सगळे सितारे कान्सच्या रेड कार्पेटवर चमचमत असतात.

भारतातील सामान्य प्रेक्षकांना मग प्रश्न पडतो की ही तिथे काय करतेय? त्याचं उत्तर दडलेलं असतं त्यांच्या प्रोफ़ेशन टाय अप मधे, पेड पार्टनरशिपमधे. चोपार्ड आणि लॉरिएलशी कान्सनं तब्बल २५ वर्षांची भागीदारी केली असल्यानं या कंपन्यांच्या जगभरातल्या मॉडेल्स या महोत्सवात हजेरी लावत असतात.

 

cannes im 1

 

गेली अनेक वर्षं ऐश्वर्या राय लॉरिएलचा चेहरा म्हणून कान्समधे उपस्थिती लावत आहे. याशिवायदीपिका, सोनम कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनिही लॉरिएलच्यावतीनं उपस्थिती लावली आहे. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी सोनम कपूर ही देखिल याच ब्रॅण्डचा  भारतीय चेहरा म्हणून कान्स रेड कार्पेटवर चालली होती.

 

aishwarya im

या दरम्यान या दोन नायिकांत शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. या कलाकारांचा या महोत्सवात दाखविल्या जाणार्‍या चित्रपटांशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसतो मात्र सोशल मिडियावर, बातम्यांतल्या त्यांच्या ग्लॅमरमुळे त्यांना रेड कार्पेटवर बघून प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. दीपिका पदुकोणही लॉरिएलचा चेहरा म्हणून यात सहभागी झालेली आहे मात्र यंदाच्या तिच्या सहभागाला विशेष महत्व आहे कारण ती आठ सदस्यीय ज्युरीचा एक भाग आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?