विमानात सिगारेट ओढण्यास मनाई असताना ऐश ट्रे का ठेवली जाते?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ज्यांनी विमानामधून प्रवास केला असेल त्यांना ही गोष्ट माहित असेल की प्रवासामध्ये अडथळा उत्पन्न होईल अश्या सर्वच गोष्टी विमानात प्रतिबंधित असतात. त्यापैकी एक म्हणजे धुम्रपान अर्थात सिगारेट ओढणे! जर तुम्ही विमानामधून प्रवास केला असेल तर तुमचं लक्ष ऐश ट्रे कडे नक्कीच गेलं असेल.

तर तुमच्या मनातही असा विचार आलाय का, जर सिगारेट ओढण्यास विमानात बंदी आहे तर ऐश ट्रे तेथे ठेवण्याचा उपयोग तो काय? चला तर आज या बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

 

plan-ash-tray-marathipizza02
businessinsider.in

विमानात सिगारेट ओढण्यास केवळ प्रवाश्यांना मनाई असते असे नाही, विमानच्या वैमानिकांना देखील सिगारेट पिण्यास मनाई असते. विमानात प्रत्येक ठिकाणी धुम्रपान निषिद्धच्या सूचना आढळून येतात. पण तेथेच ऐश ट्रे देखील पाहायला मिळते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की, जर एखादी ऐश ट्रे खराब झाली किंवा तुटली तर पुढच्या ७२ तासांमध्ये नवीन ऐश ट्रे तेथे ठेवली जाते. यावरून लक्षात येते की नक्कीच या ऐश ट्रेचा स्पेशल उपयोग असला पाहिजे.

खरं तर पूर्वी विमानामध्ये सिगारेट पिण्यास मनाई नव्हती, म्हणजे पूर्वी तुम्ही ३५,००० फुट उंचावर उडत्या विमानामध्ये सिगारेट पिऊ शकत होतात. काय? ऐकून दचकलात ना? पण हे अगदी सत्य आहे.

 

plane-ash-tray-marathipizza01
businessinsider.in

मात्र नंतर त्यातला धोका लक्षात आल्यानंतर धुम्रपानावर पूर्णत: बंदी घालण्यात आली. पण पूर्वी ज्या नियमानुसार प्रवाश्याला विमानात सिगारेट पिण्याची परवानगी होती, तो नियम मात्र अजूनही तसाच आहे.

Code of Federal Regulations (14) च्या अंतर्गत प्रवासी विमानात कोठेही सिगारेट ओढू शकतो. जसे कि सीटवर किंवा प्लेनच्या वॉशरूममध्ये! म्हणजेच हा नियम प्रवाश्याला सिगारेट ओढण्याची पूर्ण मुभा देतो.

याच नियमाची पूर्तता करण्यासाठी एयरलाइन्स कंपन्या प्लेन वॉशरूममध्ये ऐश ट्रे ठेवतात.

या मागे हे देखील कारण सांगितले जाते की, समजा एखाद्या व्यक्तीने चोरून प्लेनच्या वॉशरूममध्ये सिगारेट ओढली आणि त्याने ती तिथेच झटकली तर एका ठिणगीने देखील प्रवास धोक्यात येऊ शकतो.

म्हणून त्या व्यक्तीने इतरत्र कोठेही सिगारेटची ऐश न झटकता ती ऐश ट्रे मध्येच झटकावी या उद्देशाने ऐश ट्रे ठेवली जाते.

 

plane-ash-tray-marathipizza03
businessinsider.in

याचाच अर्थ काय तर, ऐश ट्रे ही विमानातील एक शोभेची वस्तू आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?