' राजीव गांधींचा मारेकरी सुटला मात्र पठ्याने जेलमध्ये असताना टॉप केलंय – InMarathi

राजीव गांधींचा मारेकरी सुटला मात्र पठ्याने जेलमध्ये असताना टॉप केलंय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोषी ए. जी. पेरारिवलन गेल्या ३१ वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा ते फक्त १९ वर्षांचे होते. आता पेरारिवलन यांची वयाच्या ५० व्या वर्षी तुरुंगातून सुटका झाली आहे.

 

rajiv gandhi inmarathi

 

११ जून १९९१ रोजी अटक झाल्यापासून पेरारिवलन हे आपण निर्दोष असल्याचे दावा करत आले आहे. परंतु आता एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर त्यांना या शिक्षेपासून सुटका मिळवण्यात यश मिळाले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

● पेरारिवलन यांच्याविषयी थोडक्यात :-

ए. जी. पेरारिवलन यांचा जन्म ३० जुलै १९७१ रोजी जोलारपेट, तामिळनाडू येथे ज्ञानसेकरन उर्फ ​​कुयिलदासन आणि अर्पुथम अम्मल यांच्या घरात झाला. त्यांचे आई-वडील हे तामिळनाडूतील द्रविड चळवळीचे संस्थापक पेरियार यांचे अनुयायी आहेत.

घटनेच्या वेळी पेरारिवलन फक्त १९ वर्षांचे होते. अटक झाली होती तेव्हा त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाले होते.पेरारिवलन वर असा आरोप होता कि त्याने राजीव गांधीच्या मारेकऱ्याला ९ वोल्ट ची बॅटरी आणून दिली होती.

 

periv im 1

 

● पेरारिवलन यांची शिक्षणामध्ये असलेली रुची :-

पेरारिवलन यांनी महात्मा गांधी कम्युनिटी कॉलेज आणि तमिलनाडु मुक्त विद्यापीठ यांच्या सहकार्याने तुरुंग विभागाने ऑफर केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर कोर्समध्ये प्रवेश घेतले होते. जानेवारीमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेला बसलेल्या १८५ कैद्यांपैकी १० कैदी वगळता सर्व कैदी यशस्वी झाले आहेत.

पेरारिवलन यांनी तुरुंगात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांनी संगणक अ‍ॅप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये डिप्लोमा मिळवले आहे. त्यांचा एमसीए प्रकल्प तुरुंग व्यवस्थापनातील ई-गव्हर्नन्सवर होता.

 

extc im 1

 

लेखनाची आवड असलेले पेरारिवलन तुरुंगाच्या शाळेतही शिकवतात आणि ते पाश्चात्य संगीत शिकण्यासाठी देखील उत्सुक आहेत. याशिवाय त्यांनी आठहून अधिक पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत. याचबरोबर पेरारिवलन याची इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये एमफिल करण्याची इच्छा आहे.

● फाशीची शिक्षा मिळाली होती :-

१९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पाठवला होता. त्यावेळच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ११ वर्षांनंतर ती याचिका फेटाळली. यानंतर ९ सप्टेंबर २०११ रोजी फाशीचा दिवस निश्चित करण्यात आला होता.

तसेच फाशी दिल्यावर मृतदेह घेण्यासाठी पेरारिवलन यांच्या आईला पत्रही पाठवण्यात आले होते. पण फाशीच्या आधी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी एक ठराव संमत करून दोषींची फाशीची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने फाशीच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

 

jaylalitha-marathipizza02

 

२०१३ मध्ये सीबीआय अधिकारी टी त्यागराजन यांनी उघड केले की, त्यांनी पेरारिवलनचा कबुलीजबाब बदलला होता. खरे तर राजीव गांधी यांच्या हत्येसाठी हे बॉम्ब वापरले जात होते ते बनवण्यासाठी आपल्या बॅटरीचा वापर केला जाईल हे पेरारिवलन यांना माहीत नव्हते. याविषयी सीबीआय अधिकाऱ्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टीएस थॉमस यांनी २०१३ मध्ये म्हटले होते की, २३ वर्षांच्या तुरुंगवासानंतर एखाद्याला फाशीची शिक्षा देणे योग्य होणार नाही. जर असे केले गेले तर हे एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा देण्यासारखे होऊन जाईल आणि हे संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

 

periv im 2

मोदी सरकार करणार चीनच्या मक्तेदारीतून श्रीलंकेची सुटका!

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

शिक्षामध्ये झालेल्या बदलनंतर पेरारिवलन यांनी २०१४ मध्ये तामिळनाडूच्या राज्यपालांकडे दयेची याचिका दाखल केली होती. जी गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित होती. २०१८ मध्ये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने याबाबत राज्यपालांना शिफारस केली आणि पेरारिवलन यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी त्यांची सुटका करण्याची मागणी केली.

त्याला अडीच वर्षे प्रलंबित ठेवल्यानंतर राज्यपालांनी ही याचिका राष्ट्रपतींकडे पाठवली. अखेरीस, होत असलेल्या हलगर्जीपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम १४२ चा विशेष वापर करून पेरारिवलन यांची निर्दोष मुक्तता केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?