' “केस कापले की जास्त वाढतात!” मुलींना नेहमी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टीमागचं वास्तव! – InMarathi

“केस कापले की जास्त वाढतात!” मुलींना नेहमी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टीमागचं वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुंदर लांबसडक केस हे स्त्रीच्या सौंदर्याचे एक लक्षण मानले जाते. भारतात साधारणपणे दक्षिण भारतीय स्त्रियांचे केस हे घनदाट आणि लांबसडक असतात. त्याचे कारण त्यांचा आहार!

 

hair im

 

याशिवाय शिकेकाई रिठा अशा नैसर्गिक घटकांचा वापर करून केस धुणे. नियमित तेल लावून त्यांना पोषण देणे हे अगदी जाणीवपूर्वक करतात. त्यामुळे दाक्षिणात्य स्त्रियांचे केस सुंदर असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण केस जितके लांब तितका त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. त्यांची निगा नित्यनेमाने राखावी लागते. लांब केस विंचरणे, धुणे, वळवणे या गोष्टी खूप वेळ खातात. त्या तुलनेत छोटे, आखूड केस हे लवकर विंचरता येतात. धुवायला वेळ लागत नाही. सुकतात पण लवकर. त्यांना मेहंदी लावायची झाली तर कमी वेळात लावून होते. एकंदरीत छोटे केस हे सांभाळायला सोपे असतात.

आजकाल शाळा क्लासेस, नोकरी या सर्व व्यापात केसांची काळजी घ्यायला वेळ कमी मिळतो. दूरवर असलेली नोकरी व्यवसायाची ठिकाणे, या कारणांमुळे आजकाल मुली स्त्रिया केस वाढवण्यापेक्षा केस आखूड ठेवण्याकडे जास्त कल ठेवतात. तरीही लांब केसांची फॅशन ही कायमस्वरूपी आहे. नेहमीच ती स्त्रियांना भुरळ घालत असते. असतील ते आखूड केस व्यवस्थित ठेवण्याकडे त्यांचा कल असतोच. लांब केसांचे आकर्षण त्यांना असते.

 

hair im

 

अधूनमधून केस कापून ते छान राखणे ही त्यांची आवड असतेच. लांबीला कमी असले तरी रेशमी चमकदार केस कुणाला नको असतात? विविध शाम्पू, कंडीशनर,सीरम लावून केस छान ठेवण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यांना नीटनेटके कापून, पोनीटेल घालून शक्य तितके केस व्यवस्थित राहावेत हे सगळ्याजणी बघता असतात.

साधारणपणे एक समज सर्रास आहे, केस कापले की ते छान वाढतात. यासाठी खूपदा अगदी छोट्या मुलींचे टक्कल पण केले जाते की त्यांचे केस चांगले वाढतात. हे खरं आहे का?

एका बाबतीत हे काही अंशी बरोबर आहे. म्हणजे कापलेले केस चमकदार दिसतात पण ते छान वाढतात वगैरे काही होत नाही.

 

hair cut im

 

केस कापून साधारण महिना दिड महिना झाला की वाढलेले, फाटे फुटलेले, निस्तेज झालेले केस किती विचित्र दिसू लागतात. मग त्यांना नीट आकार देण्यासाठी मुली, महिला परत एकदा पार्लरचा दरवाजा ठोठावतात. मग छान कापून सेटिंग केल्यानंतर केस किती व्यवस्थित दिसू लागतात.

तरीही खूप जणी असे मानतात, की केस कापले की ते पुन्हा जोमाने वाढतात. हे खरे आहे का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे.

हो, ते थोडेसे दाट होतात, त्यांना एक चमक येते पण ते लांब होत नाहीत, वाढत नाही. यासाठी तुमच्या नेहमीच्या पार्लरमध्ये साधारणपणे दिड दोन महिन्यांनी जाऊन केस नीटनेटके कापून घ्या. प्रत्येकाच्या केसांच्या वाढीचा कालवधी हा कमी जास्त असू शकतो. पण साधारणपणे एक ते दिड महिन्यात केस वाढतात आणि कधी कधी ते अतिशय गबाळे घाणेरडे दिसू लागतात.

पातळ केस तर वेणी घातल्यावर अगदीच घाणेरडे दिसतात. म्हणून त्यांना ट्रिम करणे आवश्यक ठरते. तेही साधारणपणे १ सेंटीमीटर इतकेच करावेत. कारण दरमहा तुमचे केस फक्त १ किंवा १.५ सेमीच वाढतात.

आपल्या खांद्यापर्यंत असलेले केस अंदाजे ३ वर्षापर्यंत वाढतात. पण तोवर त्यांना बऱ्याच गोष्टी सोसाव्या लागतात. आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा धूळ, उन्ह, धूर हे सारे आपल्या आजूबाजूलाच असतात. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने होणारा प्रवास, उन्हाने येणारा घाम, त्याने केस चिकचिकीत होणं हे आपण अनुभवतोच. तसेच प्रत्येक ऋतू थंडी, कडक उन्ह, कोरडेपणा हे सारे आपल्याला सोसावे लागते.

 

hair tying im

 

हे सर्व हवामानातील बदल केसांवरही परिणाम करतात. त्याचा परिणाम म्हणून केस निस्तेज होतात, त्यांना फाटे फुटतात. त्यामुळे त्याच्यापुढे केसांना आपोआप फाटे फुटल्यासारखे होतातच. त्यामुळे ते कापणे योग्य ठरते.

खूप निस्तेज केसांची निगा नीट राखली तर ते सुळसुळीत, चमकदार होतातच पण तुमच्या व्यक्तीमत्वात पण एक टवटवीतपणा आणतात.

 

hair 1 im

 

तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा केस कापून नेटके ठेवा.योग्य आहार, शाम्पू, तेल लावून त्यांची निगा राखा आपोआपच केस छान दिसतील. ये रेशमी जुल्फे चा अनुभव देतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?