' फुलनदेवीच्या मारेकऱ्याने अफगाणिस्तानात शिरून पृथ्वीराज यांच्या अस्थी भारतात आणल्या होत्या! – InMarathi

फुलनदेवीच्या मारेकऱ्याने अफगाणिस्तानात शिरून पृथ्वीराज यांच्या अस्थी भारतात आणल्या होत्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फुलनदेवी हे नाव ऐकलं की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. स्त्रीचं वर्चस्व सगळ्याच क्षेत्रांमध्ये असू शकतं, या वाक्याचा नकारात्मक क्षेत्राचाही विचार करून काही मांडायचा झालं, तर फुलनदेवी हे त्यापैकीच एक मोठं नाव ठरेल.

एकेकाळी भलीभली मंडळी सुद्धा फुलनदेवीला टरकून असत. तिची दहशत एका निराळ्या पातळीवर पोचलेली होती, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. हीच फुलनदेवी पुढे सक्रिय राजकारणाचा भाग झाली. खासदार म्हणून संसदेत निवडूनही गेली.

 

phoolan devi IM

 

नावामधील दहशतीच्या बरोबरीनेच राजकीय ताकद सुद्धा तिच्या मागे उभी राहिली. अशा या फुलनदेवीची हत्या करण्यात आली.

खासदार असणाऱ्या फुलनदेवीला थेट तिच्या सरकारी निवासस्थानी असताना ठार करणारा ‘शेर सिंह राणा’ याने त्याच्या आयुष्यात केलेलं हे एकमेव डेरिंग नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा शेरसिंह राणा नेमका कोण होता? त्याने आयुष्यात नेमकं काय मोठं काम केलंय तेच आज जाणून घेऊया.

ठाकूरांच्या मृत्यूचा बदला :

डाकू म्हणून फुलनदेवीचं फार मोठं नाव होतं. तिच्या नावाची दहशत आणि दरारा सुद्धा मोठा होता. पुढे ती संसद सदस्य झल्यावर तर तिच्या केसालाही धक्का लावणं कठीण असल्याचं बोललं जाऊ लागलं.

शेरसिंहच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. फुलनदेवीचा पक्ष एकलव्य सेनेत प्रवेश करण्याच्या बहाण्याने शेरसिंह तिला तिच्या सरकारी निवासस्थानी भेटला.

तिच्याशी बातचीत करून, तिने दिलेला प्रसाद घेऊन त्यानंतर त्याने पुढचा डाव रचला. दुपारी दीड वाजता आपल्या सरकारी निवासस्थानाबाहेर उभ्या असणाऱ्या फुलनदेवीवर गोळ्या झाडून त्याने तिची हत्या केली.

 

phoolan devi assassination IM

 

१९८१ साली फुलनदेवीने घडवून आणलेल्या हत्याकांडाचा बदल म्हणून ही हत्या केल्याचं शेरसिंहने नंतर सांगितलं होतं. २२ ठाकूरांना एका रांगेत उभं करून एकामागोमाग एक ठार करण्यात आलं होतं. यानंतर फुलनदेवीने आत्मसमर्पण केलं, मात्र राणाच्या मनात राग खदखदत होता.

या २२ जणांच्या मृत्यूचा बदला म्हणून फुलनदेवीची हत्या करून, त्यानंतर शेरसिंहने सुद्धा आत्मसमर्पण केलं. त्याच्या या कृतीचं समर्थन केलं जाणं योग्य नसलं, तरी त्याच्या धाडसाची चर्चा मात्र बरीच झाली.

शेरसिंहाचा जीवनपट बनतोय कारण :

फुलनदेवीची हत्या करणारा शेरसिंह राणा याच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट बनवण्यात येत आहे. विद्युत जामवाल हा अभिनेता यात शेरसिंहची भूमिका साकारणार आहे. याविषयी कळल्यानंतर विद्युतला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.

एका खुनी हत्याऱ्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची गरजच काय? असा प्रश्नही करण्यात येऊ लागला. या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात विरोधही सुरु झाला. मात्र ‘फुलनदेवीचा हत्यारा’ एवढी एकच ओळख जगजाहीर झालेला शेरसिंह धाडसाचा बाबतीत एवढ्यापुरताच मर्यादित नाही.

 

sher singh rana IM

 

त्याचे इतरही कारनामे फार मोठे आहेत. त्यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्याच्या बायोपिकमधून करण्यात येणार आहे. त्याच्या या अविश्वसनीय कारनाम्यांपैकी एक म्हणजे, पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी अफगाणिस्तानातून भारतात आणणं.

जेलमधून फरार :

फुलनदेवीची हत्या केल्यानंतर आत्मसमर्पण करणाऱ्या शेरसिंहला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली होती. तीन वर्षं तिहार जेलची हवा खाऊन झाल्यावर २००४ सालच्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर त्याने चक्क तुरुंगातून पलायन केलं.

काही दिवस भारतातच भटकत त्याने दिवस काढले, आणि त्यांनतर बांगलादेश व दुबई मार्गे तो थेट अफगाणिस्तानात पोचला. तीन-चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर, त्याने गजनी गाठलं.

११ व्या शतकातील सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थींवर त्याने ताबा मिळवला. या अस्थी ताब्यात आल्याबर त्याने पुन्हा भारत देश गाठला.

 

prithviraj chauhan 2 IM

 

भारतात परतल्यावर २००६ साली त्या पुन्हा अटक करण्यात आली. आईच्या मदतीने त्याने पृथ्वीराज चौहान यांच्या मंदिराची स्थापना केली.

आजही त्यांच्या अस्थी या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत असं म्हटलं जातं. २०१४ साली खटल्याचा निकाल लागला आणि शेरसिंह याला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर मात्र अंतरिम जामीनावर त्याची सुटका झाली.

स्वतःचा जीव धोक्यात घालून अफगाणिस्तानातून पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी भारतात आणणाऱ्या शेरसिंहला वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं. तो लोकांच्या नजरेत केवळ एक खुनी न राहता, एक हिरो ठरला. आजही त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं जातं.

हेदेखील माहित असू द्या…

दरम्यानच्या काळात २०१२ साली शेरसिंह राणा याने राष्ट्रीय जनलोक पार्टी नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी त्याने निवडणूक सुद्धा लढवली.

२०१५ च्या वर्षात शेरसिंह याच्यावर एका पंजाबी गाण्याची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे. या रॅप सॉंगला अनेक हजार व्ह्यूज सुद्धा मिळालेले आहेत. राजकारणात प्रवेश केलेल्या शेरसिंह यांनी पुढे माजी आमदाराच्या मुलीशी लग्न केलं.

 

sher singh rana 2 IM

 

मध्य प्रदेशातील माजी आमदार राणा प्रताप सिंह यांची मुलगी प्रतिमा राणा हिच्याशी शेरसिंहचा विवाह झाला. हा विवाह चर्चेत राहिला तो आणखी एका कारणामुळे. असं म्हटलं जातं की शेरसिंह राणा यांना तब्बल १० करोड ३१ लाखांचा हुंडा दिला जाणार होता.

मात्र हा हुंडा नाकारत, रिवाजाप्रमाणे केवळ एक चांदीचं नाणं स्वीकारून त्यांनी हा विवाह केला.

शेरसिंह याने त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना ठरलेल्या ‘फुलनदेवीची हत्या’, ‘तिहारमधील वास्तव्य’, तिथून पळून जाणं या सगळ्या बाबींवर स्पष्टीकरण देणारं ‘जेल डायरी’ हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.

आता तुम्हीच सांगा बरं, शेरसिंह राणाची लाईफ आहे की नाही फिल्मी? मग असं नाट्यमय आयुष्य जगणाऱ्या माणसाचा बायोपिक बनवला गेला नसता, तरच नवल!

तुम्हाला हा लेख कसा वाटलं ते आम्हाला कमेंटमधून अवश्य कळवा. अशाच काही रंजक जीवनपटांबद्दल तुम्हाला ठाऊक असेल, तर आपल्या इतर वाचकवर्गासाठी ती माहिती सुद्धा नक्कीच द्या.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?