' रसवंती गृहांची नावं 'कानिफनाथ रसवंती गृह' असण्यामागे आदराचं एक कारण आहे

रसवंती गृहांची नावं ‘कानिफनाथ रसवंती गृह’ असण्यामागे आदराचं एक कारण आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो, तुम्ही कधी भर उन्हात ‘एसटी’ ने प्रवास केला आहे का? जर केला असेल तर नक्की तुम्हाला उन्हाने मारलेला सिक्सर अनुभवाला आला असेल आणि या उन्हाला आऊट करण्यासाठी तुम्ही शोधलेला उपाय पण.

काही आलं का लक्षात? अहो तो उपाय आहे प्रत्येक गावाच्या एस्टी स्टँडजवळ मिळणारा उसाचा थंडगार रस! आहे ना भारी उपाय?

उन्हाने कावलेल्या अवस्थेत आपण एस्टितून खाली उतरतो, भिरभिरत्या नजरेने इकडे-तिकडे शोधायला लागतो आणि तेवढ्यात घुंगरांचा लायदार आवाज कानावर येतो तिथेच आपला निम्मा जीव शांतवतो. पावले नकळत त्या आवाजाच्या दिशेने वळतात आणि समोर थंडावा देणारे रसवंती गृह दिसते.

दुकानातल्या डोक्यावर गांधी टोपी, सदरा किंवा बंडी आणि विजार, गळ्यात तुळशी माळ असलेल्या हसतमुख काकांशी हवापाण्याच्या गप्पा मारत आपण ऑर्डर देतो, ‘एक थंडगार फूल ग्लास.’

आता रसाच्या चरकातून आल,लिंबू आणि ऊसाच्या रसाचा सम्मीश्र वास आपल्या नकाशी दरवाळू लागतो,जोडीला घुंगरांचा आवाज असतोच. काका भरलेला बरफवाला थंडगार रसाचा ग्लास समोर आणून ठेवतात आपण तो फूल नजाकत के साथ उचलून ओठांना लावतो आणि पहिला डायलोग मरतो, लय भारी!

 

sugarcane juice im

 

अर्धा ग्लास संपला, जरा तरतरी आली की आपल निरीक्षण सुरू होत. रसवंती गृह तसं साधसुढच असतं. ऊसाचा भारा, एक मशीनमागे आडवा टाकलेला आणि एक शेजारी उभा करून ठेवलेला, एक भल-थोरलं गाळण आणि पटेल, एक पाण्याचा द्रम, काही काचेचे ग्लास, ज्ञानेश्वर माउली किंवा एखाद्या संताचे भिंतीवर लावलेले चित्र, दुसर्‍या भिंतीवर देव्हारा आणि त्यात असलेली नवनाथांची तसबीर!

तिथे आपण क्षणभर रेंगळतो, टॉवर ग्लासातला रस संपलेला असतो. मन आणि शरीर दोन्ही सुखावलेले असतात. आपण समाधानाने रसाचे पैसे देवून बाहेर पडातो, सहज नजर वर करून पाहतो तर रसवंती गृहाचे नाव आपल्याला दिसते, ‘नवनाथ रसवंती गृह किंवा कानिफनाथ रसवंती गृह’.

 

kanifnath rasavanti im2

 

फूड चेनला सारवलेल्या आपल्या शहरी मनाला ही रसवंती गृहाची पण चेन प्रत्येक गावी आहे की काय? हा प्रश्न पडू शकतो. पण थांबा! प्रत्येक वेळी जे दिसते तेच असतेच असे नाही महाराजा!

रसवंती गृहांची नावे सारखी असण्यामागे कोणती फूड चेन नाही तर तिथे विषय आहे आदर आणि श्रद्धेचा! पडलात ना बुचकळ्यात? चला जाणून घेवू या नावामागचे गौड-बंगाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहेत. त्यातील एक आहे दत्त संप्रदाय. या संप्रदायाची शाखा आहे नवनाथ संप्रदाय, ज्यातील नऊही नाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रय, आता एक आख्यायिका अशी आहे, की या नथानपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कांनापासून झाला.

या कारणाने कानिफनाथ यांना उस, गूळ आणि ऊसचा रस अधिक आवडत असे. म्हणून त्यांच्यावरील आदरापायी रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ रसवंती गृह असे ठेवले जाते, दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की, रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास ९०% व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यातले आहेत.

 

kanifnath rasavanti im

 

नाथ संप्रदायाचा या भागातील लोकांवर जास्त प्रभाव आहे. पुरंदर तालुक्या मध्ये सासवड पासून १२ किलोमीटरवर बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे.

बोपगाव कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गॄहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. त्यामुळे हे लोक श्रद्धेने कानिफनाथ किंवा नवनाथांचे नाव आपल्या दुकानाला देतात.

पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हा रस काढला जायचा. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं आहे याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी मनाशी जपली आहे. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्याला जोडलेले असतात.

बसस्टॅण्ड हे पूर्वीचे हक्काचे असे गर्दीचे ठिकाण त्यामुळे स्टँडवर गिर्हाईक भरपुर असल्याने धंदयाचा जम बसला. मग एकाचे पाहुन दुसऱ्याने, त्याचे पाहून तिसऱ्याने असे करत रसवंती गृह वाढू लागली. त्याकाळी सहकारचा एवढा गवगवा झालेला नव्हता त्यमुळे कारखान्याला जाणार्‍या उसाचे प्रमाण देखील थोडेच होते.

 

kanifnath rasavanti im1

 

पुरंदर तालुका दुष्काळी तालुका असल्याने तेथील एकजण पोट भरण्यासाठी मुंबईला गेला. त्याने तिथे शक्कल लढवून उसाचे गंडेरे बाटलीत भरून विकायला सुरू केले. हा देशी मेवा मुंबईकरांना भावला आणि उस पुण्यामुंबईत प्रसिद्ध झाला, पण हे गंडेरे लगेच खराब होत असत म्हणून त्याचा रस काढून एकाच ठिकाणी दुकानासारखी त्या रसाची विक्री सुरू झाली आणि रसवंती गृहांचा जन्म झाला.

आता पुरंदर तालुक्यात कानिफनाथांची समाधी असल्याने आख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे. पोटापाण्यासाठी रसवंती गृहाच्या माध्यमातून या तालुक्यातील मंडळी महाराष्ट्रभर विखुरली पण जाताना आपल्या श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांना आपल्या सोबत घेऊन गेली.

परमुलूखात गेली तरी आपली माती ही मंडळी विसरली नाहीत आणि म्हणूनच आपल्याला थंडावा देणार्‍या या रसवंती गृहांची नावे नवनाथ किंवा कानिफनाथ रसवंती गृह असे असते. कुठेही गेलात तरी आपले मूळ विसरू नका हे सांगण्याचं शस्त्र असतं ते…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?