१९६२ च्या भारत चीन युद्धातून भारताने शिकलेला धडा आणि २०१७ मधील परिस्थती

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारत देशाच्या, भारतवासीयांच्या मनात कायम घर करून राहिलेली दुःखद आठवण म्हणजे १९६२ चं भारत चीन युद्ध. ही आठवण दुःखद असण्यामागे २ कारणं आहेत…पहिलं, सहाजिकच भारताचा झालेला पराभव. पण दुसरं कारणही तितकंच महत्वाचं – चीनने केलेला विश्वासघात. अक्ख्या भारतात हिंदी-चिनी भाई भाई चा नारा असताना एकदिवस अचानक चीनने भारतावर हल्ला केल्याची बातमी काय येते आणि बघता बघता आपण मित्र मानलेला हा देश आपल्याला एका मानहानीकारक पराभवाची कायमची जखम काय देऊन जातो!

 

1962-war-marathipizza01
topyaps.com

ह्या युद्धावर अनेक ठिकाणी लिहिलं जातं, लिहिलं जाईल.

नुकतीच फेसबुकवर सौरभ गणपत्ये ह्यांनी एक अत्यंत माहितीपूर्ण पोस्ट लिहिली आहे. वाचकांसाठी ती इथे प्रसिद्ध करत आहोत.

===

१९६२ सालची कथा वेगळीच होती. भारत चीन युद्ध हा भारताच्या निष्काळजीपणाचा आणि गुप्तवार्ता (IB) विभागाच्या अर्धवट अपयशाचा संपूर्ण नमुना होता.

गुप्तवार्ता विभागाने अर्ध यश मिळवलं आणि अर्ध्या अपयशाने त्यावर संपूर्ण पाणी फिरवलं. ब्रह्मदेश आणि भारताची सीमारेषा तेंव्हा नीट आखली गेली नव्हती. भारताला लागून असलेल्या ब्रह्मदेशाचा भाग तेंव्हा खेचरांसाठी प्रसिद्ध होता. आयबीने त्यावेळी काही निरीक्षणे सुरु ठेवली होती.

अनेक लोकांना पाकिस्तानच्या भारतातल्या काळ्याकांड्या ह्या १९८९ -९० सालपासूनच्या वाटतात. प्रत्यक्षात हे उद्योग पाकिस्तानने १९५६ पासूनच सुरु केले होते. मिझोरामच्या लालडेंगा आणि नागालँडच्या लोकांना आयएसआयने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिलं होतं. एकंदरीतच या सर्व प्रकारात ईशान्य भारत हा संवेदनशील इलाका बनला होता.

या अनुभवांवरून आय बी ची नजर ईशान्येवर होती.

अचानक आयबीला जाणवलं की ब्रह्मादेशच्या हद्दीत अचानक मोठ्या प्रमाणावर खेचरांची संख्या वाढली आहे. ताबडतोब हा अहवाल आयबीने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवला. त्यावर मंत्रालयाने काहीच कृती केली नाही. आयबीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.

परंतु पुढे ठोस असं काही आयबी मांडू शकली नाही आणि इकडेच झटका बसला. खेचरांची संख्या वाढली कारण खेचारांबरोबरचे लोक हे चिनी सैनिक होते. हे नंतर समजलं कारण भारत चीन युद्धानंतर खेचरांची संख्या लगेचच पुन्हा पूर्ववत झाली.

चीन भारतावर आक्रमण करून परत का गेला ?

१) भारतावर नेफामध्ये आक्रमण वेगळे आणि हिमालय ओलांडून दिल्ली गाठणे वेगळे.

२) भारतीय लोक क्रांती क्रांतीचा नारा देत चिन्यांच्या मागे उभे राहतील असा चीनचा भ्रम होता. हा कोणी करून दिला यावर ठोस माहिती नाही. परंतु भारतातल्या कम्युनिस्टांमध्ये पाठींबा नक्की कोणाला द्यायचा, मातृभूमीला की वैचारिक पितृभुमीला यावर वाद होऊन पुढे पक्ष फुटला होता. आणि भूपेश दासगुप्तांसारखे कम्युनिस्ट नेते जागतिक मंचावर चीनची बाजू समजावून सांगत होते, या घटना पुरेश्या बोलक्या आहेत.

३) अमेरिकेची मदत इतक्या लवकर उपलब्ध होईल असं चीनला वाटलं नव्हतं.

1962-war-marathipizza02
hindustantimes.com

ह्या युद्धाचा मुख्य धडा म्हणजे गुप्तवार्ता विभागाचं अपयश. म्हणून तो विभाग फोडून पुढे रॉ ची स्थापना झाली.

दुसरा धडा म्हणजे भारत आणि ब्रह्मदेशाची सीमा आखली गेली. या ही बाबतीत धक्कादायक म्हणजे ब्रह्मदेशी सरकारला या कामी सहकार्य करत सीमारेषांच्या इलाक्याची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून फिरण्याची आणि फोटो काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. प्रत्यक्षात ब्रह्मदेशी लोकांकडे अत्यंत क्लियर फोटोज तयार होते.

या कामी त्यांना चीनने मदत केली होती आणि याची वार्तासुद्धा आपल्याला नव्हती.

तिसरा धडा म्हणजे “इस पाकिस्तान का कुछ करे” अशी भावना सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्याचीच नांगी ठेचून त्यांचा ब्रह्मदेश आणि ईशान्य भारतातलं जाळं ध्वस्त करायला म्हणून बांगलादेशाची निर्मिती झाली.

आजची २०१७ ची कथा नक्कीच वेगळी आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?