' 'स्वारगेट'च्या नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट खुद्द पुणेकरांना पण माहित नसेल

‘स्वारगेट’च्या नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट खुद्द पुणेकरांना पण माहित नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतामधील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.

समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे.

पुण्यात लाल महाल, तुळशीबाग, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, मात्र पुण्यात अनेक ‘गेट’ देखील प्रसिध्द आहेत त्यापैकी एका ‘गेट’ला नाव ‘मुहियाबाद’ असे होते नंतर ते स्वारगेट असे झाले.

चला तर मग पाहुयात स्वारगेटचा इतिहास…

स्वारगेट म्हणजे आधीचे ‘मुहियाबाद’ ?

पुण्यातील स्वारगेट जुन्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात मुळा नदीच्या किनारी पुनवडी नावाचे एक स्वतंत्र गाव होते. महाराजांनी कसबा पेठे जवळ लाल महाल बांधला आणि या भागात वस्ती वाढू लागली.

 

swargate im 1

 

दुसरी त्रासदायक घटना म्हणजे स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली. यावर संरक्षण आणि पर्याय म्हणुन गावात येणाऱ्या प्रवेशद्वार रस्त्यावर कोतवाल यांची नियुक्ती करणे होय.

जशी वस्ती वाढत होती तसेच देखरेख आणि संरक्षण म्हणून गावात येणाऱ्या रस्त्यावर चौक्या किंवा नाक्यावरचे ठिकाण म्हणून कोतवाल ठेवण्यात आले. या ठिकाणांना एक वेगळी ओळख मिळाली.

ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार करण्यात आले. नाके किंवा चौकी यांच्या नामात बदल होऊन त्यांचे नामकरण ‘गेट’ असे झाले.

येथील पोलीस अंमलदार आणि कर्मचारी यांना घोडे देण्यात आले. थोडक्यात देखरेखी हे कर्मचारी घोड्यावर स्वार होऊन तेथे रात्र – दिवस गस्त घालत असत. येथे घोडेस्वार तैनात केलेले असल्याने पुढे या नाक्याचे ठिकाण स्वारामुळे “स्वारगेट” म्हणून प्रचलित तर झालेच, पण त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे. पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ‘मुहियाबाद’ नाव दिले होते.

२. स्वारगेट नाव का?

 

swargate im

 

कालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल आणि इतर सामाजिक सुरक्षितेसाठी करण्यासाठी सुद्धा होत असे.

स्वारगेट सोडून कोंढवा गेट, क्वार्टर गेट, जाईचे गेट, पेरू गेट, फडगेट, मरीआई गेट, म्हसोबा गेट, रामोशीगेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. त्यापैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची.

त्यावरून तिथल्या जागेला ‘रामोशीगेट’ असे नाव मिळाले.स्वारांचा पहारा या जागेवर पूर्वी असल्याने, याला ”स्वारगेट” असे नाव पडले.

३. पुण्यनगरीत ‘स्वारगेट’चे महत्व

 

swargate im1

 

इ.स. १९४० मध्ये स्वारगेटहून पहिली बस धावली. त्याच्याआधी पुण्यात टांगे अस्तित्वात होते. आज हा परिसर स्वारगेट नावाने ओळखला जातो तरी येथील बसस्थानकाचे नाव ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज बसस्थानक’ असे आहे.

स्वारगेट चौकाचे नाव ‘देशभक्त केशवराव जेधे चौक’ असे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो.

आज पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू झाले आहे. त्यात ‘पिंपरी चिंचवड ते स्वारगेट’ हा मार्ग पुणे मेट्रोच्या तीन मुख्य कॉरिडॉर पैकी एक कॉरिडॉर असणार आहे.

 

swargate im2

 

‘पुणे मेट्रो स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ लवकरच येथे उभे राहणार असल्याचे कळते. हे देशातले पहिलेवहिले मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब असणार आहे.

मध्यंतरी स्वारगेटजवळ भुयारी मेट्रोचे काम चालू असताना २ भुयारी मार्ग सापडले. स्वारगेट ते सारसबाग या रस्त्यावर इ.स. १९१५ मध्ये स्वारगेट जलकेंद्र होते.

सुमारे १०० वर्षांपूर्वी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही भुयारं बांधली असतील, मात्र आजच्या वाढत्या गर्दीमुळे तसेच एसटीबस आणि मेट्रोमुळे स्वारगेट आता बदलत चालले आहे.

पूर्वीचे स्वारगेटचे महत्व, तिथला दरारा आता संपला आहे. ना घोडेस्वारांचे ठाणे उरले, ना पहारेकरांच्या चौक्या. एका बाजूला चौकात छोटी पोलीस चौकी आहे. ती रहदारीच्या, गजबजलेल्या या भागाचा भार सांभाळत उभी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?