' राज ठाकरेंचं कॉलेजमध्ये रॅगिंग झालं आणि… – InMarathi

राज ठाकरेंचं कॉलेजमध्ये रॅगिंग झालं आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तर प्रदेशमधले खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही असे म्हटले असले तरी त्यांच्या या म्हणण्याला न जुमानता राज ठाकरे अयोध्येला जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

 

raj im

 

राज ठाकरे म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यांसमोर येतं ते त्यांचं वादळी व्यक्तिमत्त्व! आपल्या वक्तृत्त्वाने कित्येकांवर छाप पाडणारे राज ठाकरे त्यांच्या वादग्रस्त भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

गेले बरेच दिवस भोंग्याच्या वादामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. एकूणातच, राज ठाकरे यांना राजकीय वर्तुळात वजन आहे.

 

raj thackrey 3 IM

 

इतका दरारा असलेले राज ठाकरे एकेकाळी शांत स्वभावाचे होते असं जर कुणी सांगितलं तर आता ते खरंही वाटणार नाही. पण मुळात कलाकाराचा पिंड असलेले राज ठाकरे खरोखरच एकेकाळी बुजऱ्या स्वभावाचे होते.

इतकंच नाही, तर राज ठाकरे कॉलेजमध्ये असताना त्यांचं रॅगिंगदेखील झालं होतं.

कॉलेज जीवनात काही जूनियर्सना आपल्या सिनियर्सकडून रँगिंगचा अनुभव येतो. मात्र राज ठाकरे यांचं त्यांच्या कॉलेजकाळात रॅगिंग होणं ही गोष्ट त्याच्या आताच्या प्रतिमेला परस्परविरोधी म्हणावी अशीच आहे. नेमका काय होता हा रॅगिंगचा किस्सा? जाणून घेऊ.

राज ठाकरे लहान असल्यापासूनच खोडकर होते. पण त्यांचा खोडकरपणा घरातच चालायचा.

राज ठाकरे यांनी मुंबईतील ‘जे जे स्कुल ऑफ आर्ट्स’ मध्ये पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतली होती.

 

raj thakrey im

 

कॉलेजमध्ये असताना ते आपले काका म्हणजेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मातोश्री येथे राहायचे. फक्त शनिवार-रविवार ते आपल्या आईबाबांकडे जायचे.

एकदा कॉलेजमध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर रॅगिंग झालं होतं. काही सिनिअर्सनी एकत्र येत राज यांना बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडले होते.

मात्र आपले काका इतकी मोठी व्यक्ती असूनदेखील त्यांना किंवा इतर कुणालाही राज ठाकरे यांनी आपल्याला आलेला हा अनुभव सांगितला नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरेंसोबत झालेल्या रॅगिंगविषयी कळलं.

आनंद दिघे मृत्यु: अपघात की घातपात? आजही न सुटलेलं कोडं

जेव्हा आर आर पाटलांनी प्लॅनिंग करून राज ठाकरेंची अटक घडवून आणली होती

राज ठाकरे हे बाळासाहेबांचे लाडके पुतणे होते. बाळासाहेबांचा राज यांच्यावर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.

बाळासाहेबांनी ही गोष्ट छोटी समजून सोडून दिली नाही. ज्या मुलांनी राज ठाकरे यांच्यावर रॅगिंग केलं होतं त्यांना बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मुलाचं आपण रॅगिंग केलंय याची त्या मुलांना कदाचित कल्पना नसावी. त्यांनी राज यांना धक्काबुक्कीही केली होती. या मुलांनी राज यांच्या केलेल्या रॅगिंगबद्दल बाळासाहेबांनी त्या मुलांना खडे बोल सुनावले. शिवाय, राज ठाकरे यांच्यासमोर त्या मुलांना बाळासाहेबांनी शिक्षाही केली.

 

balasaheb im

 

मुळात बुजऱ्या असलेल्या काही व्यक्ती या अशा अनुभवांमुळे आणखीनच कोशात जातात, तर अशाच इतर बुजऱ्या व्यक्ती या अनुभवांतून शिकून, कणखर होऊन स्वतःत आमूलाग्र म्हणावा असा बदल घडवून आणतात. राज ठाकरे हे या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये मोडतात असंच आपल्याला दिसून येतं. राज यांच्यावर त्यावेळी रॅगिंग केलेल्या त्या मुलांना आजच्या राज ठाकरेंकडे पाहून काय वाटत असेल असा प्रश्न राहून राहून मनात येतो.

राज ठाकरे आधी कसे होते हे समजल्यावर त्यांनी बऱ्याच वर्षांनी चक्क शिवसेनेतून वेगळं होण्याचं बंड करून मनसे पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय कसा घेतला असेल याचं आपल्याला आश्चर्यच वाटेल. मात्र या काका-पुतण्यातील प्रेम, ते प्रेम दर्शवणारा हा आणि असे इतर किस्से कायमच यादगार राहतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?