आजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नेपाळ ..भारताचा शेजारी देश, खरं तर भारताचा मित्र देश, असा देश जो कधी इंग्रजांच्याच काय कुणाच्याच अधिपत्याखाली नव्हता, म्हणून नेपाळमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केलाच जात नाही ! आजचा जो नेपाळ आहे, आकाराने आधी त्याहून मोठा होता. भारतातले सिक्कीम आणि उत्तराखंड मधले काही भाग हे नेपाळने जिंकले होते. पण नंतर इंग्रजांनी हे प्रदेश जिंकून घेतले. मात्र आजचा जो नेपाळ आहे, तो मात्र इंग्रजाच्या ताब्यात कधी येऊ शकला नाही. त्यामुळे हे राष्ट्र कधी गुलामीत गेले नाही ह्याचा नेपाळी जनतेला अभिमान आहे.

nepal-marathipizza01
infoplease.com

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा 1950 साली भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले, त्याच वर्षी नेपाळ सोबत एक मैत्री करार करण्यात आला. 1950 च्या ह्या Indo-Nepal Treaty of Peace and Friendship नुसार नेपाळी नागरिकांना भारतात आणि भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये व्हिसाशिवाय कुठेही फिरण्याची आणि काम करण्याची मुभा आहे. आपल्या इथे कित्येक ठिकाणी आपण नेपाळी लोकं काम करायला आलेले पाहतोच. भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये हवाईमार्गे जाण्यासाठी पासपोर्ट किंवा Voter ID ह्या दोहोंपैकी काही एक सोबत असणे गरजेचे आहे. (हवाईमार्गे जाण्यासाठी हे 2 ID proofsच ग्राह्य धरले जातात, इतर ID proofs जसे आधार , PAN , ड्रायविंग लायसन्स चालत नाहीत.)

नेपाळचे आर्थिक चलन “नेपाळी रुपया” हे आहे. पण भारतीय रुपये हे देखील सर्व छोट्यामोठ्या दुकानांत स्वीकारले जातात. म्हणजे भारतीयांना नेपाळमध्ये Foreign Exchange करायची गरज नाही. (फक्त काठमांडूचं संग्रहालय ह्याला अपवाद ठरले, तिथे फक्त नेपाळी रुपये स्वीकारतात) तिथे भारतीय चलनाला ‘IC’ (Indian Currencyचा short form) म्हणूनच जास्त बोललं जातं. भारतीय नोटा चालत असल्या तरी नाणी मात्र स्वीकारली जात नाहीत आणि उरलेले सुट्टे परत करताना मात्र तिथले दुकानदार नेपाळी रुपयेच देतात. भारतीय रुपयांपेक्षा नेपाळी रुपयांची किमंत कमी आहे. नेपाळी रुपयांना 1.6 ने भागले कि भारतीय रुपयांची किंमत मिळते. (म्हणजे 100 नेपाळी रुपयांची किंमत भारतीय रुपयांमध्ये 62.50 होईल). आपल्याला हे गणित सारखे करत बसावे लागते, पण नेपाळी लोकांना ह्या गणिताची सवय असल्यामुळे ते तोंडीच करतात.

(चित्र : ठमेल बाजार, काठमांडू)

नेपाळचे घड्याळ हे भारतपेक्षा 15 मिनिटे पुढे आहे. आजकाल smart phone च्या जमान्यात मोबाईलचे clock automatic synchronize होते. परंतु बाकीच्या hand watches मध्ये आपल्याला स्वतःहून वेळ बदलावी लागेल. भारताची वेळ +5:30 GMT (GMT म्हणजे Greenwich Mean Time…ग्रीनवीच हे इंग्लंडमधले एक शहर आहे, तिथल्या प्रमाणवेळेपासून भारताचे घड्याळ साडेपाच तास पुढे आहे म्हणून भारताची वेळ +5:30 GMT अशी दर्शवतात.) तर नेपाळची वेळ +5:45 GMT अशी आहे. ह्या वेळेबद्दल अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ हे एकच असे राष्ट्र आहे ज्याने अशी GMT पासून पाऊण तास पुढे (+ :45) असलेली वेळ निवडली. बाकी सर्व राष्ट्रांच्यावेळा तास किंवा अर्धातास मागे पुढे आहेत. (जसे पाकिस्तानचे घड्याळ भारतापेक्षा अर्धातास मागे तर बांगलादेशचे अर्धातास पुढे आहे. )

(नेपाळी राष्ट्रध्वज )

नेपाळच्या वेळे बद्दलचे हे जसे वैशिट्य आहे, तसेच नेपाळच्या राष्ट्रध्वजाचे ही एक वैशिष्ट्य आहे. जगातील सर्व देशांचे राष्ट्रध्वज हे आयताकृती आहेत. परंतु नेपाळ हे असे एकमेव राष्ट्र आहे ज्याचा राष्ट्रध्वज हा आयताकृती नसून दोन त्रिकोणांनी बनला आहे.

नेपाळला जरी आपण मित्रदेश म्हणत असलो तरी ही मित्रता नेपाळमध्ये खरंच जाणवते ! पर्यटन हा मुख्य व्यवसाय असल्याकारणाने तिथलं वातावरण भारतीय पर्यटकांसाठीच नाही, तर जगाभरातील सर्व पर्यटकांसाठी मैत्रीपूर्ण आहे. ह्या पर्यटनामुळेच काठमांडूमध्ये इंग्रजी बोलू शकणाऱ्यांची कमी नाही, तसेच हिंदी देखील बहुतेकांना येते. म्हणून भाषेचा काही Problem जाणवत नाही.

(चित्र: स्थानिक नेपाळी )

भारत आणि नेपाळ, दोन्ही देशांची मैत्री इतकी घट्ट असण्यामागे एक कारण म्हणजे सांस्कृतिक साम्य. एकूण लोकसंख्येच्या 81.3 % हिंदू नेपाळमध्ये आहेत (भारतात हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 79.8% आहे) म्हणजे नेपाळमध्ये भारतापेक्षा हिंदूंची टक्केवारी जास्त आहे. परंतु इथल्या हिंदू संस्कृतीत तिबेटीयन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. इथली मंदिरे (चित्रात दिसत असल्याप्रमाणे) तिबेटीयन स्थापत्यशैलीची आहेत. हिंदू धर्मासोबतच बौद्ध धर्माचादेखील नेपाळवर पगडा आहे. गौतम बुद्धांची जन्मभूमी असलेले ‘लुम्बिनी’ हे ठिकाण नेपाळ मध्येच आहे .

(चित्र : पशुपतिनाथ मंदिर , काठमांडू )

 

(चित्र : बौद्धनाथ , काठमांडू )

गेल्या काही वर्षांत भारत आणि नेपाळ मध्ये तणावही पाहायला मिळाला. 2008 सालापर्यंत नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जायचे. तो पर्यंत तेथे राजेशाही होती. 2008 नंतर नेपाळने देखील लोकशाही अवलंबली. 2015 साली अंतिम संविधान लिहिले गेले. ह्या संविधानात भारताशी संबंधित असणाऱ्या (भारतासोबत रोटीबेटीचा व्यवहार ठेवणाऱ्या) परंतु नागरीकत्वाने नेपाळी असणाऱ्या ‘मधेशी’ समुदायाचे हक्क इतर नेपाळी नागरीकांपेक्षा कमी करण्यात आले होते आणि भारत सरकारला हे मुळीच पटणारं नव्हतं आणि हेच तणावाचं कारण बनलं.
हेच 2015चं वर्ष नेपाळसाठी दुर्दैवी ठरलं ते भयंकर भूकंपामुळे. ह्या भुकांपाची तीव्रता इतकी भयंकर होती कि त्यामुळे जुन्या मंदिरांचे झालेले नुकसान आपण आजही पाहू शकतो. तसंच काही ठिकाणी भूकंपामुळे Telephone linesचे झालेले नुकसान अजूनही दुरुस्त करण्यात आले नाहीये, विशेष करून ग्रामीण भागांतले!

(चित्र : २०१५ च्या भूकंपामुळे झालेले नुकसान )

नेपाळला लोकशाही स्वीकारून जास्त वेळ झाला नाहीये. त्यांची राजकीय उलथापालथ चालूच आहे. लोकशाहीची पाळेमुळे घट्ट बसायला अजून वेळ लागेल. नेपाळ भेटीमध्ये विदेश मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या :

India is elder brother to Nepal, not big brother

मार्च 2017 मध्ये देखील भारत-नेपाळ सीमेवर काही कारणांमुळे तणाव निर्माण झाला होता, असे निर्माण होणारे तणावपूर्ण संबंध आणि नेपाळची चीनशी वाढत चाललेली जवळीक, जरी भारतासाठी चिंतेची बाब असली तरी शतकांपासून चालत आलेली भारत-नेपाळची ही मैत्री वाढत राहो अशी आशा करूयात !

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?