भारतीय सैन्य महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं? वाचा अभिमानास्पद उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रत्येक भारतीयासाठी भारतीय सैन्य ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपण आपलं जीवन सुखाने जगत असताना आपल्या रक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र तैनात असणाऱ्या शूरांबद्दल आपण नेहेमीच कृतज्ञ असतो. त्याच्याबद्दल धन्यता मानतो. आणि ह्या भावना सर्वांसाठी असतात.

मग ते जमिनीवरील सैन्य असो –

 

territorial-army-marathipizza

 

वा आपल्या गरुड दृष्टीद्वारे देशाचं रक्षण करणारी वायू सेना असो –

 

inidan-air-force-inmarathi
idreamcareer.com

 

वा – भारताच्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करणारी नेव्ही…!

 

navy--InMarathi03

 

सच्चा भारतीय ह्या सर्वांना मनापासून वंदनच करतो.

तर, देशाची सेवा करणाऱ्या आपल्या सैन्याला आवश्यक असणारी साधनसामुग्री हा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे.

ह्या घटकांमध्ये विविध हत्यारं, ट्रॅकिंग डिव्हायसेस इत्यादी गोष्टी येतात. त्यातच येतात – दळणवळणाची साधनं!

बिकट प्रसंगी तात्काळ महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, खासकरून भू-सेनेला – अत्यंत विश्वासार्ह वाहनाची गरज असते.

ही गरज भासवते – मारुती जिप्सी.

१९८५ साली आलेली Maruti Gypsy ही जीप, भारतीय सैन्यामधे खूप वापरली जाते. सैन्यासाठी कुठल्याही वाहनाच्या बाबतीत, सहाजिकच, मजबूत असणं हा एक प्रमुख criteria असतो.

पण जिप्सी नंतर अनेक SUV आल्या  आहेत. तरीसुद्धा भारतीय सैन्यात जिप्सीच का निवडतात – हा प्रश्न अनेकांना  नेहमी पडत असतो.

हाच प्रश्न Quora वर विचारल्या गेला आणि तिथे दिलं गेलेलं एक उत्तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला उद्युक्त करेल.

उत्तर असं आहे :

१) Off-road कामगिरी (रस्ता नसलेल्या भागात चालण्याची क्षमता!) – हे जिप्सीच्या सैन्यातील लोकप्रियतेच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे.

 

gypsy marathipizza 00

स्त्रोत

Autocar India च्या रिपोर्टनुसार :

खडतर भागात जिप्सी जशी चालते तसं – अर्जुन रणगाडा सोडून – इतर कुणीच चालू शकत नाही ! ( 😮 अर्जुन रणगाड्यासोबत तुलना ! AWESOME !) लोडेड जिप्सी ही त्याहून जास्त comfortable असते.

२) वजनाला हलकी असल्याने जिप्सी कुठेही सहज पोहोचवता येऊ शकते – जहाजावरून पाठवा, हेलिकॉप्टरला लटकावून खाली सोडा किंवा IL-76 आणि C-17 Globemaster III सारखे युद्धविमानं वापरून शत्रूच्या सरहद्दीत टाका!

 

gypsy marathipizza 01

 

त्यामुळे हव्या त्या ठिकाणी तातडीने पोहोचवण्यासाठी जिप्सी अत्यंत उपयुक्त आहे.

 

३) शक्तिशाली इंजीन

जीप्सीचं इंजीन १२९८ सीसी आहे, जे ८० bhp एवढी पावर जनरेट करतं – प्रसिद्ध SUV बोलेरोचं इंजीन ७५ bhp एवढी पावर निर्माण करतं.

कमी वजन आणि भरपूर पावर – ह्या गणितामुळे जिप्सी १३०+ speed पकडू शकते.

 

gypsy marathipizza 02

 

शेवटी, सारांश हा, की भारतीय सैन्याला मिशन पूर्ण करण्यासाठी हवं असतं – एक मजबूत, चपळ, भरपूर वजन (सैनिक + शस्त्र !) वाहू शकणारं वाहन.

मारुती जिप्सी हे सर्वच्या सर्व देते.

शिवाय – ही भारतीय आहे 🙂

मग दुसरी कुठली SUV कशाला लागणार? 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भारतीय सैन्य महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं? वाचा अभिमानास्पद उत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?