' उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट! – InMarathi

उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पहिल्या लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे साधारण २ वर्षांपूर्वीपासून संजय दत्तची मुलं आणि बायको दुबईत राहत असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

संजय दत्तची मुलं तिथे शिक्षण घेत आहेत आणि त्याच्या बायकोचा तिथे व्यवसाय आहे. ते तिथे खुश आहेत याचा मला आनंद आहे आणि मी तिथे येऊनजाऊन असतो असं त्याने म्हटलंय.

केवळ संजय दत्तचंच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सचं दुबईशी कनेक्शन आहे. दुबईमधल्या बॉलिवूड पार्कमध्ये चित्रपट रिक्रिएट करणे, दुबईच्या ब्रॅण्ड्सचं प्रमोशन करणे, चित्रपट लाँच करण्यासाठी दुबईला जाणे इथपासून दुबईत स्वतःची मालमत्ता असणे इथपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे बॉलिवूडच्या स्टार्सचा दुबईशी संबंध येत असतो.

 

dubai frame inmarathi

 

बॉलिवूड कलाकारांच्या जीवनशैलीला साजेशी अशी विलासी जीवनशैली अनुभवणं या कलाकारांना दुबईसारख्या देशात सहज शक्य होतं.

दुबईस्थित डॉन दाऊद इब्राहीम याच्याशीही अनेक बॉलिवूड कलाकारांचे संबंध असल्याचं म्हटलं जातं. गेल्या वर्षी एनसीबीने बेकायदेशीदार अंमली पदार्थांच्या प्रकरणाअंतर्गत बॉलिवूड कलाकारांचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर आयपीएलचं निमित्त सांगून अनेक बॉलिवूड सितारे दुबईला पळून गेले होते.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शिल्पा शेट्टी, अरबाझ खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, कतरीना कैफ असे बरेच सेलिब्रिटीज आपल्या चित्रपटांचं आणि तिथल्या लोकल ब्रॅण्ड्सचं प्रमोशन करण्यासाठी बऱ्याचदा दुबईला जातात. यातल्या काही कलाकारांची दुबईत प्रॉपर्टी आहे. हे स्टार्स आणि त्यांच्या दुबईतील प्रॉपर्टीविषयी जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. शिल्पा शेट्टी :

 

shilpa shetty im

 

९०च्या दशकात बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आणि मुख्यत्वे आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याने २०१० साली दुबईतील बुर्ज खलिफा येथे एक फ्लॅट भेट दिला होता.

‘खलीज टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपण आपलं हे प्लश अपार्टमेंट गेल्या वर्षी विकलं असल्याचं शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “माझं दुबईत एक घर होतं पण, आम्ही इतक्यातच ते विकलं. आमची जागा खूप लहान होती. तुम्हाला मूल नसतं, तेव्हा २ बेडरूम्सचं घर असणं छान असतं. पण मूल असतं तेव्हा तुम्हाला जास्त जागा लागते.”

दुबईत दुसरं घर घेण्याचे काही प्लॅन्स आहेत का अशी विचारणा झाल्यावर तिने आम्ही दुसरं काहीतरी बघतोय, पण आम्ही ते शोधू. जे लोक वर्षातून दोन पेक्षा अधिक वेळा इथे येत नाहीत त्यांचं इथलं घर नुसतंच पडून असतं. त्यामुळे मी इथल्या प्लश हॉटेलमध्येच राहायला येणं पसंत करेन असं सांगितलं.

दुबईतील पाल्म जुमैरा इथे तिने एक टुमदार घर खरेदी केलं आहे.

२. शाहरुख खान :

 

srk dubai im

 

दुबई आपलं दुसरं घर असल्याचं शाहरुख खानने अनेकदा म्हटलंय. शाहरुख खान आणि गौरी खानचं दुबईतील पाल्म जुमैरा या पॉश ठिकाणी एक टुमदार घर आहे.

एका मुलाखतीत शाहरुख खानने दुबई हे त्याचं दुसरं घर आहे. जरी मी इथे माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत सुट्टीवर आलो किंवा बिझनेस दौऱ्यांच्या निमित्ताने शूटिंग करायला आलो तरी महत्त्वाकांशी, उत्कट आणि आवेशपूर्ण अशा अनेक अर्थांनी मी स्वतःला या शहराशी जोडून घेऊ शकतो असं म्हटलं होतं.

दुबईच्या पर्यटन आणि वाणिज्य विपणन महामंडळाच्या (DCTCM) #BeMyGuest या फिल्ममध्ये शाहरुख खान दिसला होता ज्यात दुबई हे शाहरुख खानचं दुसरं घर आहे असं का म्हटलं जातं ते दाखवलं गेलं होतं. यात शाहरुख लोकांना ‘माझ्यासोबत या, माझे पाहुणे व्हा.’ असं निमंत्रण देतो. आपल्यासोबत कायमस्वरूपी राहतील असे अनेक अनुभव दुबई आपल्याला देते असं शाहरुखने म्हटलंय.

३. ऐश्वर्या राय बच्चन – अभिषेक बच्चन :

 

aishwarya im

 

बॉलिवूडमधलं शाही जोडपं असलेल्या अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचंदेखील दुबईतील जुमैरा गोल्फ इस्टेट इथल्या सॅन्चुरी फॉल्समध्ये एक आलिशान घर आहे.

हे घर जिथे आहे त्या सुंदर भागात शांत वाहणारं पाणी असलेली रिसॉर्टच्या स्टाईलची टुमदार घरं आहेत. या जोडप्याने २०१३ साली हे आलिशान घर विकत घेतलं होतं आणि बऱ्याचदा ते त्यांच्या या दुबईतल्या घरी जातात.

४. सलमान खान :

 

salman khan im

 

दुबईत सलमान खानचे करोडो चाहते आहेत. तिथल्या रस्त्यांवरल्या पोस्टर्स आणि होर्डिंग्जवर सलमान खान बऱ्याचदा झळकतो. त्याने दुबईतल्या बऱ्याच कॅम्पेन्स आणि ब्रॅण्ड्सच्या जाहिराती केल्या आहेत.

‘स्प्लॅश’ हा त्यातलाच एक ब्रँड. सलमान खान बऱ्याचदा दुबईमधल्या मॉल्समध्ये फिरतो आणि सुट्टीवर असतानाही दुबईला जातो. सलमानच्या एका पाकिस्तानमधल्या चाहत्याने ‘S सिरीज’ अंतर्गत असलेली दुबईतील वाहनांच्या नंबर प्लेट्समधली २७/१२ ही सलमानच्या वाढदिवसाचे आकडे असलेली नंबर प्लेट विकत घेतली होती.

पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.

५. अनिल कपूर :

 

anil kapoor im

 

बॉलिवूडचा ‘झकास’ अभिनेता अनिल कपूर याचीदेखील दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना प्रिय असलेल्या दुबईला शाहरुखप्रमाणेच अनिल कपूरदेखील आपलं दुसरं घर म्हणत आलेला आहे.

दुबईतील ‘रिट्झ बाय दानुब’ या हाऊसिंग प्रोजेक्ट अंतर्गत अनिल कपूरने दोन बेडरूम्सचा फ्लॅट विकत घेतला आहे. आपल्याला हा करार फायदेशीर वाटला आणि त्या जागेचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी त्यात स्पॅनिश तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती दानुब ग्रुपचे चेअरमन असलेल्या रिझवान साजन यांच्याकडून त्याला मिळाली.

या दोन कारणांमुळे त्याने हे घर विकत घेतलं. दुबईत घर असण्याखेरीज अवॉर्ड शोजच्या निमित्ताने अनिल कपूर दरवर्षी दुबईत जातो. त्यांच्या चित्रपटांचं शूटिंग आणि प्रमोशनही तिथे होतं.

बॉलिवूडच्या मंडळींची प्रत्येकच गोष्ट ग्रँड म्हणावी अशी असते. एकेका चित्रपटांमधून करोडो रुपयांची कमाई करणाऱ्या, शिवाय मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करून त्यातून बक्कळ कमाई करणाऱ्या या सेलिब्रिटीजकडे एकूण किती मालमत्ता असेल याचा अंदाज बांधणं आपल्या कल्पनेपलीकडचं असतं. त्यामुळे परदेशांमध्ये त्यांच्या मोठमोठ्या प्रॉपर्टीज आहेत याचं आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. फावल्या वेळात चघळायला विषय मात्र मिळतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?