' लंका रावणाची नव्हतीच! आपल्याला लंकेचा "खरा" इतिहास माहीतच नाहीये!

लंका रावणाची नव्हतीच! आपल्याला लंकेचा “खरा” इतिहास माहीतच नाहीये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लंका म्हटलं की सोन्याची लंका आणि रावणाची लंका या दोन गोष्टी अगदी सहजपणे आठवतात. लंकेच्या रावणाने सीतामाईचं अपहरण केलं आणि अवघं रामायण घडलं. मात्र हा रावण खरंच लंकेचा होता का? किंवा लंका खरोखरंच रावणाची होती का? हा एक मोठा प्रश्नच आहे.

 

ravana vadh inmarathi

 

जिला आपण रावणाची लंका म्हणतो, त्या लंकेचं नेमकं सत्य, वास्तत्व तुम्हाला माहित आहे का? लंका ही रावणाची नव्हतीच मुळी! मग ही लंका नक्की होती कुणाची? रावण आणि लंकेचा संबंध नक्की कधी आणि कसा आला, ते आज जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

श्रीलंका सरकारने घेतलेला निर्णय

रामायणात उल्लेख असणाऱ्या लंकेमधील जागांचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न लंका सरकारने केला आहे. ऐतिहासिक पुरावे गोळा करून, त्यांचं ऐतिहासिक सत्य सिद्ध करून त्या ठिकाणांना पर्यटन स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.

 

shri lanka im

 

रावणाची लंका एक प्रेक्षक म्हणून पाहणं आता अगदी सहज शक्य आहे. नुवारा एलीया पर्वत, वेरांगटोक, सीता कोटुवा, सीता एलिया, सध्याच्या श्रीलंकेतील अनेक जंगलं अशा ठिकाणांचा रामायणात समावेश होतो. असं म्हटलं जातं की लंकेतील एका जंगलात रावणाचे शव सुद्धा ठेवलेलं आहे. अशा या रामायणातील स्थळांना श्रीलंकन सरकारने पर्यटन स्थळांचा दर्जा दिला आहे.

रावणाचं साम्राज्य

रावणाचं राज्य म्हटलं, की श्रीलंका हा देश असलेलं एक बेट डोळ्यासमोर येतं. प्रत्यक्षात मात्र लंका हा रावणाच्या भल्याथोरल्या साम्राज्याचा एक भाग होता. सूंबा आणि बाली ही बेटं जिंकून रावणाने आपल्या राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अंगद्वीप, वराह, मलय, शंख, कुश, यव अशी बेटं आणि आंध्रालाय हा प्रदेश असा साम्राज्य विस्तार केला.

 

ravan im

 

सध्याच्या काळातील सीमांचा विचार केला, तर इंडोनेशिया, मलेशिया, बर्मा, दक्षिण भारतातील काही प्रदेश आणि संपूर्ण श्रीलंका बेट रावणाच्या अधिपत्याखाली होता.
रावणाचा सावत्र भाऊ आणि धनपती कुबेराने लंका जिंकून, तिथे राज्यविस्तार केला होता. मात्र रावणाचं लक्ष्य ठरलं ते कुबेराची लंका! रावणाने केवळ लंकेवरच कब्जा मिळवला नाही, तर कुबेराचं पुष्पक विमान सुद्धा त्याने ताब्यात घेतलं असं मानलं जातं. कुबेराचं राज्य असणारी ही लंका भगवान शिव म्हणजेच शंकराने निर्माण केली होती असं मानलं जातं.

रावण एक ‘ज्ञानी’ पुरुष होता…वाचा रामायणातील हे सत्य!

शिवलिंगावर का वाहिलं जातं फक्त बेलाचं पान, वाचा पौराणिक कथा

पार्वतीच्या इच्छेखातर…

बालहट्ट आणि स्त्रीहट्ट नेहमीच पुरवेल जायला हवेत असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. भगवान शिवाने लंकेची केलेली निर्मिती म्हणजे पार्वती मातेची इच्छा होती असं म्हटलं जातं. एकप्रकारे याला महादेव शंकराने पुरवलेला स्त्रीहट्ट म्हणता येईल.

 

shankar im

 

भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी कैलास पर्वतावर शिवपार्वतीला भेटायला गेले होते. त्यावेळी लक्ष्मी देवींना तिथली थंडी सहन झाली नाही. म्हणून या एवढ्या थंड ठिकाणी वास्तव्य कसं करता अशी विचारणा लक्ष्मीदेवीने पार्वतीकडे केली. लक्ष्मी देवीने केलेली ही मस्करी माता पार्वतीसाठी विचार करायला लावणारी ठरली.

वैकुंठाची यात्रा करून आल्यावर तिथलं वैभव पाहून पार्वतीने असाच एक महाल बनवण्याची इच्छा शंकराकडे प्रकट केली. यातूनच मग विश्वकर्मा आणि कुबेर यांच्या मदतीने शंकराने लंकेची निर्मिती केल्याचं मानलं जातं.

अशी साकारली लंका…

देवतांचा शिल्पकार विश्वकर्मा आणि कुबेर यांनी भर समुद्रात त्रिकुटाचाल पर्वतावर लंकेची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं. त्रि म्हणजे तीन आणि अकुटाचाल म्हणजे पर्वत. तीन पर्वत रांगांपासून लंकेची निर्मिती झाली.

 

lanka im

 

यातील पहिला पर्वत आहे सुबेल, दुसरा नील आणि तिसरा अशोक वाटिका! अशोक वाटिकेत सीतामाईला ठेवलं होतं, तर नील प[परिसरात एक अत्यंत सुंदर महाल होता. सुबेल हा या तीन पर्वतांपैकी पहिला पर्वत, म्हणजेच श्रीराम आणि रावण यांची युद्धभूमी होय.

अशीही एक दंतकथा

लंकेवरून प्रवास करत असताना, रावणाला ही भूमी फार आवडली. रावण तिच्या प्रेमात पडला. छलकपट करण्यात माहीर असणारा रावण ब्राम्हणाचं रूप घेऊन शंकराकडे पोचला. भिक्षा म्हणून त्याने चक्क लंकेची मागणी केली. महादेवाने रावणाला ओळखलं, रावणाच्या कपटाची जाणीव झाली शिवाला झाली होती. मात्र असं असूनही, त्याने रावणाची मागणी मान्य केली.

 

shankar ravan im

 

माता पार्वतीला याविषयी कळलं तेव्हा ती अत्यंत क्रोधीत झाली. रावणाने दान म्हणून मागितलेली लंका जाळून भस्म होईल असा शाप पार्वतीने दिला. हनुमानाने लंका जाळली त्यावेळी हा शाप खरा ठरला.

 

hanuman im

 

मुळात ही भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर जळून खाक झाली. कसा वाटला तुम्हाला हा लंकेचा खरा इतिहास? तुम्हालाही लंकेविषयी आणखी काही रंजक माहिती असेल, तर ती आम्हाला अवश्य कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?