' मोदी शाह जोडगोळीला रोखण्यासाठी आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

मोदी शाह जोडगोळीला रोखण्यासाठी आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्तर ऐंशीच्या दशकात मुंबईत डी गँगचा चांगलाच सुळसुळाट होता. मुंबईचा कारभार हा डी गॅंग चालवायची असे त्याकाळी बोलले जात होते.  याच गॅंगला संपवण्याचा घाट घातला होता तो मुंबई पोलिसातील काही एन्काऊंटर स्पेशलिस्ट ऑफिसर्सनी, त्यातलं एक नाव सतत गाजत असतं ते म्हणजे प्रदीप शर्मा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अन्टेलिया प्रकरणात त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा हे नाव कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून आले आहे. एकीकडे त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यातर दुसरीकडे त्यांनी आपल्या करियरमध्ये राजकारणात देखील पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही यशस्वी झाला नाही. प्रदीप शर्मांप्रमाणे आता आणखीन एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट राजकारणात पाऊल ठेवले आहे तो नेमका कोण आहे चला तर मग जाणून घेऊयात…

 

pradeep sharma shivsena inmarathi
NDTV.com

 

नुकत्याच ५ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या, यात प्रामुख्याने भाजपला चांगले यश मिळाले आहे. आता गुजरात राज्याच्या निवडणूका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गुजरातचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले गेलेले ऑफिसर म्हणजे आयपीएस डी. जी वंजारा…

कोण आहेत डी. जी वंजारा :

८० च्या दशकात त्यांनी पोलीस खात्यात डेप्युटी सुप्रिडेंट म्हणून आपल्या करियरची सुरवात केली. १९८७ साली ते आयपीएस ऑफिसर म्हणून त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर काही काळ ATS  ऑफिसरमध्ये सुद्धा काही काळ काम केले. ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती तेव्हा ते कच्छच्या सीमेवर काम करत होते.

डी. जी वंजारांची कारकीर्द गाजली ती एका एन्काऊंटर केसमुळे, चुकीच्या एन्काऊंटर प्रकरणात आपल्याला गोवले आहे असं आरोप त्यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर केला होता.

 

vanjara.jpg inmarathi

 

सोहराबुद्दीन केस तर मोठ्या प्रमाणावर २००० साली गाजली होती. त्यात अनेक बड्या मंडळींचा सहभाग होता. शेखच्या एन्काऊंटरमध्ये  प्रजापती हा एकमेव साक्षीदार होता, त्यांचा देखील २००६ साली एन्काऊंटर करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रजापतीचा एन्काऊंटर करण्यात आला त्याच भागात १३ दिवसांपूर्वीच वंजारा यांची बदली करण्यात आली होती

या प्रकरणामुळे साहजिक सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि वंजारा यांच्यावर बोट ठेवण्यात आले. वंजारा यांना अटक ही करण्यात आली होती. २००४ साली त्यांनी राजीनामा देखील दिला होता.

 

prisoner in jail inmarathi

 

ट्विटमध्ये काय म्हणाले?

आपल्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले की, गुजरातमध्ये आता एक नवा राजकीय पर्याय उदयास येणार आहे. जो डिसेंबर मध्ये २०६ जागांवर विजय मिळवेल जे राजेशाहीसह धर्मशास्त्र स्थापन करेल. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्म असलेल्या देशांमध्ये राजेशाहीसह धर्मशास्त्र सक्रिय आहे. मग भारतात का नाही? याचे उत्तर गुजरातची जनता देईल. गुजरात नवीन आदर्श राबवेल.

 

dg im

गुजरातममध्ये अनेक वर्ष भाजपकडे सत्ता आहे. गुजरातच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने देखील कंबर कसली आहे. आपदेखील या निवडणुकांमध्ये येणार अशी चर्चा आहे त्यात आता अशा ऑफिसरचा नवा पक्ष खरंच गुजरातच्या राजकारणात बदल घडवून आणेल का हे परिस्थिती ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?