'१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं - का? वाचा!

१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – तुषार दामगुडे

===

मी कहाणी सांगणार आहे एका माणसाची “दिवाण दयाराम गिडुमल” यांची.

दयाराम गिडुमल यांचा जन्म १८५७ साली सिंध प्रांतात म्हणजे तत्कालिन भारतात झाला. फारसी ही सिंध प्रांताची अधिकृत भाषा होती. दिवान साहेबांचे प्रभुत्व फारसी अरबी आणि गुरूमुखी भाषेवर होतं.

वयाच्या दहाव्या वर्षापासून या व्यक्तीने स्थानिक लोकांना उच्च शिक्षण मिळावे म्हणुन प्रयत्न केले. ते आणि त्यांच्या भावांनी मिळुन ही संस्था स्थापन केली आणि D.J. science हे नामांकित कॉलेज कराचीमध्ये आणि national college हैदराबादमधे आजही कार्यरत आहे.

 

daya-ram-gidumal-marathipizza

 

पुढे ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत न्यायाधीश म्हणून काम करताना सुद्धा त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

त्यातील एक उदाहरण म्हणजे, शेठ मेवाल दास या नामांकित व्यापाऱ्याने गरीब घरातील एका मुलीवर बलात्कार केला आणि ही केस जेव्हा दयाराम यांच्या पुढे सुनावणीसाठी आहे, हे हिंदु समाजाला कळाले, तेव्हा त्यांना आनंद झाला.

कारण एक हिंदु न्यायाधीश संपूर्ण समुदायाला मान खाली घालायला लावणार नाही असे त्यांना वाटले. परंतु दिवान दयाराम यांनी त्याला त्या वेळच्या कायद्यानुसार सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली. असे त्यांच्या न्यायदानाचे बरेच किस्से आहेत.

निवृत्तीनंतर दिवान दयाराम गिडुमल १९११ साली मुंबईला रहायला आले. त्यांनी गरजवंतांसाठी आयुर्वेदीक उपचार करणारा एक आश्रम उभा केला.

सगळं व्यवस्थित सुरु असताना एके दिवशी त्यांनी आश्रम बंद करत असल्याचे आणि आश्रमातीलच एका सतरा वर्षीय मुलीशी लग्न करत असल्याचे जाहीर केले.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण दिवानसाहेब तत्कालीन भारतातील नामांकित व्यक्तिमत्व होते. ते national conference चे अध्यक्ष होते. सगळीकडे एकच गदारोळ माजला.

हे लग्न लावायला कोणी तयार होईना म्हणुन दिवाणसाहेबांनी धर्म बदलला आणि एका गुरूद्वारात जाऊन लग्न लावले. त्यावेळी त्यांचे वय होते ७० आणि वधूचे वय होते १७.

लग्नानंतर त्यांनी आपला मुक्काम समुद्र किनारी वांद्रे येथे हलवला. दिवान साहेब त्यानंतर हैदराबाद येथे गेले असताना लोकांनी त्यांच्या वर दगड आणि विटांचा मारा केला.

अशीच घटना ते त्यांच्या मूळ गावी सिंध येथे गेले असताना देखील घडली. अनेक वर्तमानपत्रात दिवान साहेबांवर ताशेरे ओढणारे लेख लिहिले गेले.

हे सगळं पाहुन त्यांचे हिंदु महासभेतील मित्र आणि “daily sindhi” या वर्तमानपत्राचे संपादक मित्र विरुमल त्यांना भेटायला गेले आणि या विषयावर खुलासा मागितला. खुलासा न दिल्यास

मलाही तुमच्या विरोधात लिहावे लागेल

हे स्पष्ट केले. दिवानसाहेबांनी –

मी माझे काम केले आहे, तुम्ही तुमचे काम करा…

एवढेच उत्तर दिले.

 

daya-ram-gidumal-marathipizza01

 

त्यानंतर विरुमल यांच्याकडून वर्तमानपत्रातून दिवानसाहेबांविरुद्ध लेखमाला प्रसिद्ध झाली. त्याच दरम्यान दिवानसाहेबांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला.

बघता बघता दहा वर्षे निघून गेली. दिवानसाहेबांनी ही वर्षे समाजातून बहिष्कृत असल्यासारखीच काढली… अचानक एके दिवशी दिवानसाहेबांची अल्पवयीन पत्नी आजारी पडली म्हणून तिने तिच्या आईला बोलावून घेतले.

ती मुलगी जवळपास तिच्या शेवटच्या घटकाच मोजत होती तिने तिच्या आईला शेवटचे सांगितलं ते पुढीलप्रमाणे –

आई, मी आता अधिक काळ हे ओझे सहन करू शकत नाही त्यामुळे मला हे सांगणे भाग आहे. माझ्या एका परपुरुषाशी असलेल्या अनैतिक संबंधातुन मी गर्भवती राहिले, परंतु त्याने माझ्याशी लग्न करणे नाकरले.

अशावेळी कोण पुरुष माझ्याबरोबर लग्न करुन मुलाला पिता म्हणुन स्विकारणार? परंतु ही गोष्ट दिवानसाहेबांना समजताच, त्यांनी माझी अवहेलना होऊ नये म्हणून मला पत्नीचा दर्जा दिला. परंतु गेली दहा वर्षे त्यांचे आणि माझे संबंध एका वडील आणि मुलीचेच आहेत.

ही हकीकत सांगितल्यावर काही काळातच तिचे निधन झाले.

ही हकीकत ऐकून त्या आईने तिच्या नवऱ्याला सांगितले, त्याने त्याच्या नातेवाईकांना सांगितले आणि हळुहळू ही हकीकत सर्वतोमुखी झाली.

आपला धर्म, समाज, सार्वजनिक जीवन, इज्जत, राजकीय आकांक्षा या सगळ्याचा बळी एका झटक्यात दिवान दयाराम गिडुमल यांनी देऊन टाकला, कुठलीही अपेक्षा न बाळगता.

ही सत्य घटना मी तुमच्या बरोबर का शेअर केली ते मला माहिती नाही. तुम्हाला कसलाही उपदेश, तात्पर्य मला सांगायचे नाही. असो, तुम्ही सुज्ञ आहात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?