' कोणत्याही खानाला जमण्याआधीच – मिथुनदांनी एक “जगात भारी” काम करून दाखवलं होतं! – InMarathi

कोणत्याही खानाला जमण्याआधीच – मिथुनदांनी एक “जगात भारी” काम करून दाखवलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जी गोष्ट एकेकाळी बॉलिवूडसाठी अत्यंत सोप्पी होती तीच गोष्ट आता त्यांच्यासाठी कठीण होऊन बसली आहे. ती म्हणजे तिकीटबारीवर लागणारे हाऊसफूलचे बॅनर आणि बॉक्स ऑफिसवरची करोडोची स्पर्धा.

एक काळ असा होता की बॉलिवूडचा कोणताही कमर्शियल मसालापट हमखास १०० ते २०० करोडचा आकडा सहज पार करायचा. खान मंडळीतर एका पाठोपाठ एक स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करायचे.

 

bollywood 100 crroe club IM

 

सलमानची ईद, शाहरुखची दिवाळी आणि आमीरची ख्रिसमस या तिन्ही मोठ्या सणांच्या निमित्ताने तिघेही बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राडा घालायचे. अध्येमध्ये अक्षय कुमारसुद्धा त्याचे हात साफ करून घ्यायचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एकंदरच तो काळ बॉलिवूडने एक हाती बॉक्सऑफिसवर राज्य केलं आहे. आता मात्र करोडोची कमाई सोडाच, बॉलिवूडकरांना प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यातच यश मिळत नाहीये.

साऊथच्या सिनेमांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जम बसवला आहे ते पाहता पुढचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अत्यंत खडतर ठरणार हे निश्चित आहेच. 

 

kgf rrr pushpa IM

 

१००,२००,३०० करोड क्लब मध्ये खेळणाऱ्या हिंदी सिनेमाची जागा आता पुष्पा, RRR, केजीएफने घेतली आहे. पण तुम्हाला माहितीये का की साऊथ सिनेमे आणि या खान, कुमार मंडळींच्याही आधी ८० च्या दशकातच एका अभिनेत्याने हा विश्वविक्रम केला होता.

चक्क ८० च्या दशकात जगभरात १०० करोड कमावणारा तो अभिनेता म्हणजे गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मिथुन चक्रवर्ती. हो हो! हे वाचून तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल, पण १०० करोड क्लबमधला पहिला सिनेमा हा मिथुनदा यांचाच होता.

साधारणपणे ८० चा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी कठीणच होता, कारण राजेश खन्ना,अमिताभ बच्चन यांचे सिनेमे फारसे चालत नव्हते. संजय दत्त, अनिल कपूर ही नावं नुकतीच लोकांना परिचयाची होऊ लागली होती. एकंदरच सिनेमातलं स्टारडम हळू हळू कमी होऊ लागलं होतं.

या सगळ्या काळात कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. तेव्हा कमी बजेटमध्ये प्रोड्यूसर्सना एक झकास पर्याय उपलब्ध झाला तो मिथुनदा यांच्या रूपात.

 

mithunda inmarathi

 

मिथुनदा यांना त्या काळात गरिबांचा बच्चन म्हणायचे कारण हे होते की ज्या निर्मात्यांना अमिताभ बच्चन यांना सिनेमात घेणं परवडायचं नाही ते मिथुन यांना आपल्या सिनेमात घेऊन दुधाची तहान ताकावार भागवल्यासारखं करायचे.

याचा फायदा असा झाला की मिथुन यांचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला, जो अजूनही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि त्या काळात एकंदरच स्टार सिस्टिम लोप पावायला लागल्याने बुडत्याला काडीचा आधार अशा अर्थाने मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा फिल्म इंडस्ट्रीला स्टार पॉवर कशी टिकवायची हे दाखवलं.

मिथुन यांचे सिनेमे हे बरेचसे डोकं बाजूला ठेवून बघायचे असले किंवा कमी बजेटचे असले तरी त्यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच बिझनेस केला. त्यापैकीच एक सिनेमा ज्याने मिथुन यांना डान्सरची ओळख मिळवून दिली तो म्हणजे ‘डिस्को डान्सर’!

 

disco dancer IM

 

हॉलीवूडच्या कित्येक स्टार्सचे डान्स बघून बघून स्वतःची नृत्यशैली निर्माण करणाऱ्या मिथुनदा यांना खरी ओळख या डिस्को डान्सरनेच मिळवून दिली. केवळ भारतातच नव्हे तर युरोप, चायनापासून रशियासारख्या कित्येक देशात मिथुनच्या डिस्को डान्सरने तूफान बिझनेस केला.

१९८२ मध्ये आलेल्या या सिनेमाने शोलेसारख्या सिनेमाचे रेकॉर्ड तर मोडलेच पण जगभरात १०० करोडचा गल्ला कमावणारा हा पहिला हिंदी सिनेमादेखील ठरला.

सिनेमातल्या जीम्मीच्या खडतर प्रवासाशी प्रेक्षक लगेच कनेक्ट झाले आणि त्यांनी सिनेमासोबत मिथुन यांनासुद्धा अक्षरशः डोक्यावर घेतलं. भारतीय सिनेमात डिस्को थीम आणणारा हा पहिला सिनेमा ज्याने सिनेसृष्टीला एक अजरामवर समीकरणसुद्धा मिळवून दिलं ते म्हणजे मिथुनदा आणि बप्पी लहरी.

 

mithun da IM

 

सिनेमा आणि कथेबरोबरच यातल्या गाण्यांनीही लोकांना भुरळ घातली. मिथुनच्या डिस्को डान्सरनंतर थेट १९९४ साली आलेल्या हम आपके है कौन या सिनेमाने १०० करोडचा गल्ला केला.

खरंतर सध्या ओटीटी हक्क आणि डिजिटल हक्क यामुळे एवढी मोठी कमाई करणं हे सोप्पं झालं आहे, पण त्या काळात हे इतकं सहज शक्य नव्हतं. आज इतक्या वर्षांनीसुद्धा पुन्हा हाच प्रश्न हिंदी चित्रपटसृष्टिसमोर उभा ठाकला आहे.

आजही बॉलिवूडला हे सहज शक्य आहे पण सध्या बॉलिवूड स्वतःच्या कोशातून बाहेर येत नसल्याने हे वातावरण इतर प्रादेशिक सिनेमांना पूरक बनलं आहे. नक्कीच हेसुद्धा दिवस बदलतील आणि पुन्हा एकदा हिंदी सिनेमेसुद्धा बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई करतील अशी आशा आपण सध्या व्यक्त करू शकतो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?