' लग्नानंतरचा बलात्कार : न्यायाधीशांमध्ये भांडणं लावणारा ३० देशांमधील ज्वलंत विषय

लग्नानंतरचा बलात्कार : न्यायाधीशांमध्ये भांडणं लावणारा ३० देशांमधील ज्वलंत विषय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्नसंस्था यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. आपल्या भारतीय लग्नपद्धतीची भुरळ अगदी  परदेशी मंडळींना देखील पडली आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असं म्हंटलं जातं. लग्न खरं तर दोन व्यक्तींचे होत असते मात्र यात अनेकजण जोडले जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे दोन अनोळखी कुटुंबामध्ये एक भावनिक नाते तयार होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं होत नाही, दोन माणसांचे एकमेकांशी पटणं, एकमेकांचे स्वभाव समजून घेणं, शारीरिक गोष्टींच्या बाबतीतलं मोकळीकता या अशा अनेक गोष्टी असतात. मानसिकरीत्या जोडपे जितके एकमेकांशी कनेक्ट असतात तितकेच ते शारीरिक बाबतीत  कनेक्टेड असायला हवेत.

 

brahmin marriage IM

स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१

विवाहित महिलांनो तुमच्यविषयीचे हे कायदेशीर अधिकार जाणून घ्या!!

आजच्या धावत्या युगात नवरा बायकोला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळच नसतो. केवळ शारीरिकरित्या ते जवळ येतात मात्र मनाने एकमेकांपासून लांबच असतात आणि मग कुठे तरी चुकतंय या भावनेने एखाद्या काउन्सिलरकडे जातात.

भारतात आजही अनेक जोडप्यांमध्ये लग्नानंतर संवाद फार कमी होत जातो आणि फक्त शारीरिक संबंध ठेवले जातात. कधी कधी हे संबंध दुसऱ्या व्यक्तीची परवानगी नसताना देखील ठेवले जातात. नुकतंच दिल्ली हायकोर्टाने कलम ३७५ मधील वैवाहिक बलात्काराबद्दल एक मोठा निर्णय दिला आहे, नेमकं काय आहे म्हणणं आहे कोर्टाचं जाणून घेऊयात…

कोर्टाचं नेमकं म्हणणं काय?

बलात्काराचे निकष सांगणाऱ्या कलम ३७५ च्या बाबतीत कोर्टाने असं म्हंटल आहे की, पतीने आपल्या पत्नीशी कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवले असल्यास ते बलात्काराच्या अंतर्गत येणार नाही. मात्र याच संदर्भात दिल्ली कोर्टातील दोन न्याधीशांमध्ये मतांतरे आढळून आली. ज्यात एका न्यायाधीशांनी वैवाहिक बलात्कार हा गुन्हा आहे तर दुसऱ्या न्यायधीशांनी याला दर्जा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण बहुदा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

 

supreme court inmarathi

 

भारतीय कायद्यात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही. खरं तर याविरोधात अनेक संघटनांनी आवाज उठवला होता आणि गेली कित्येक वर्ष हा कायदा करावा अशी मागणी होत आहे. केरळ हायकोर्टाने देखील मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये या संदर्भात आपले म्हणणे मांडले होते की भारतात वैवाहिक बलात्काराच्या बाबतीत शिक्षेची कोणतीही तरतूद केली नाही मात्र घटस्फोटासाठी हे निमित्त ठरू शकते.

२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही आणि तो जर गुन्हा झाला तर लग्न संस्थेवरील लोकांचा विश्वास उडेल.

सर्व्हेचं म्हणणं काय?

राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील ३२ % महिला या लग्नानंतरच्या अत्याचारला बळी पडल्या आहेत. या अत्याचारांमध्ये शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण इत्यादी प्रकार आहेत.

 

rape victim inmarathi

 

१८ ते ४८ वयोगटातील विवाहित महिला शारीरिक आणि लैंगिक शोषणाचा अत्याचार सहन केला असून त्यातील ७ टक्के महिलांना शारीरिक इजा देखील झाल्या आहेत. यातील कित्येक इजा या गंभीर स्वरूपाच्या आहेत.

इतर देश :

UN WOMEN च्या अहवालानुसार भारताचं नव्हे तर इतर ३४ देशात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जात नाही यात प्रामुख्याने विकसनशील देश आहेत. पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, म्यानमार, लाओस, माली, ताजिकिस्तान इत्यादी देश येतात.

आज भारतात कौटूंबिक हिंसाचाऱ्याच्या केसेस सर्वात जास्त आहेत, ज्यात केवळ महिलांवरील अत्याचारच नव्हे तर अनेक पुरुषांना देखील अशा हिंसाचारला तोंड द्यावे लागत आहे. कोर्टाचं असेही म्हणणं आहे की जर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला तर पुरुषांसाठी ही बाब चिंतेची होऊ शकते.

 

women village im

 

काही वर्षांपूर्वी आलेल्या पिंक या सिनेमात बच्चनजींच्या तोंडी एक वाक्य होते ते म्हणजे ‘नो मीन्स नो’, म्हणजे कुठल्या ही स्त्रीने जर तुम्हाला नकार दिला असेल तर तो नकार असतो तुम्ही त्यावर जबरदस्ती करू शकत नाही. हा संवाद आज प्रत्येक पुरुषांनी लक्षात ठेवायला हवा….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?