' एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता…. – InMarathi

एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या बॉलीवूड विरुद्ध टॉलिवूड असा एका वादच निर्माण झाला आहे, महेश बाबू या साऊथच्या सुपरस्टारने बॉलीवूडला नाकारले त्यावरून अनेक उलट  सुलट चर्चा आहेत, आता या वादात सुनील शिट्टीने उडी घेतली आहे तो असं म्हणाला की बाप हा बाप असतो. मूळचा आपला शेट्टी अण्णा साऊथचा जरी असला तरी तो मुंबई आणि बॉलीवूडला जास्त प्राधान्य देतो असं त्याच्या एकूण म्हणण्यावरून दिसून येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरं तर शेट्टी आडनाव म्हंटल की उडिपी हॉटेल असं एक समीकरणच त्यावेळी होते मात्र हा अण्णा हॉटेलच्या गल्ल्यावर नव्हे तर सिनेमात रमला, अजय अक्षयसारखे एक्शन हिरो असताना त्यांना टक्कर द्यायला शेट्टी अण्णा बॉलीवूडमध्ये आला, एक्शन हिरो अशी ओळख असलेला सुनील खरं तर एका सिनेमामुळे जास्त लक्षात राहिला.

 

sunil shetty 1 inmarathi

 

मित्रांनो, फार कमी चित्रपट असे असतात जे कोणत्याही क्षणापासून पाहिले तरी तोच आनंद देतात. हेराफेरी हा तसा चित्रपट आहे. या चित्रपटातील संवादांनी जो २१ वर्षापासून धुमाकूळ घातला आहे. तो आजतागायत कायम आहे हे या चित्रपटाचे मोठे यश आहे असेही आपण म्हणू शकतो.

१९७१ साली प्रदर्शित टिव्ही मुव्ही ‘सी द मॅन रन’ वरुन १९८९ मध्ये मल्याळममध्ये ‘रामोजीराव स्पिकींग’ हा चित्रपट आला होता. हे दोन चित्रपट म्हणजे हेराफेरी (Hera Pheri) चित्रपटाचे प्रेरणास्थान. हेराफेरीतील बाबुराव गणपतराव आपटे, राजू, शाम हे तिघं कॉमेडीच्या इतिहासात आज अजरामर झाले आहेत.

या तिघांशिवाय आपण या चित्रपटाची कल्पनाच करु शकत नाही पण ही शामची भूमिका सुनील शेट्टीला (Sunil Shetty) अगदी ऐनवेळेला मिळाली. तेच तब्बूच्या भूमिकेबाबत झालं. आधी ही भूमिका करीश्मा कपूरला दिली गेली. सुरुवातीला होकार कळवून तिने नंतर वैयक्तिक कारणासाठी चित्रपट नाकारला.

 

tabbu inmarathi
newyorkindian.com

 

या चित्रपटाच्या वेळी श्यामच्या भुमिकेवरून घडलेला किस्सा तुम्हाला माहिती आहे का? किस्सा असा आहे की चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी आधी शामच्या भुमिकेसाठी त्यांचा लाडका अभिनेता, मुन्नाभाई एमबीबीएस, अर्थात संजय दत्त याला निवडले होते.

संजूबाबा ने तेव्हा नुकताच त्याचा ‘काडतूस’ या सिनेमाचे काम संपवले होते. त्यालाही या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता होती. पण हेराफेरी चित्रपटासाठी तो तारखा देऊ शकत नव्हता. कारण त्यावेळी त्याची कोर्टात केस चालू होती. हेच कारण होते कि त्याचे सारखं सारखं कोर्टात येणं जाणं चालू होते.

 

sanjay dutt jail inmarathi
peepingmoon.com

चित्रपटासाठी त्याला आपल्या तारखा देता येत नव्हत्या. आणि जरी हे शक्य होत असते तरी संजय दत्तने सांगितले होते कि तो फक्त आणि फक्त रात्रीचेच शूटिंग करू शकतो. जेव्हा ही गोष्ट त्याने निर्माता फिरोझ नाडियादवाला ह्यांना सांगितली तेव्हा त्यांना चित्रपटासाठी फक्त रात्रीचे शूटिंग करणे पटलं नाही. शेवटी संजय दत्तने हा चित्रपट सोडला.

संजय दत्तने चित्रपट सोडल्यानंतर फिरोज नाडियादवाला आणि प्रियदर्शन या दोघांच्या डोक्यात फक्त एकच नाव आले ते म्हणजे अजय देवगण. त्यांनी अजय देवगणला ह्या चित्रपटासाठी विचारणा केली. परंतु अजय देवगण चित्रपटासाठी तारखा देऊ शकत नव्हता त्यामुळे त्यानेही चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

 

ajay devgan inmarathi
in.pinterest.com

 

चित्रपटाची कथा पूर्ण झालेली होती, चित्रपटाची घोषणा झालेली होती परंतु संजय दत्तने चित्रपट सोडला होता. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांना त्याच्या जागी दुसरा नवीन अभिनेता मिळत नव्हता.हीच समस्या जेव्हा अक्षय कुमारला माहिती पडली तेव्हा त्याने दिग्दर्शक आणि प्रोड्युसर दोघांनाही आपला मित्र सुनील शेट्टीला चित्रपटात घेण्यासाठी सांगितले.

सुनील शेट्टीचे नाव ऐकताच दोघेही विचारात पडले होते कारण ते एक कॉमेडी चित्रपट बनवत होते आणि त्यात जे अभिनेते होते ते ऍक्शन हिरो होते. परंतु नंतर अक्षय कुमारने दोघांनाही विश्वास दिला कि ज्याप्रकारे तुम्हांला माझ्यावर विश्वास आहे, त्याचप्रकारे मला सुनील शेट्टीवर विश्वास आहे कि तो या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे निभावेल.

अक्षय कुमारचे हे बोलणे ऐकून शेवटी सुनील शेट्टीला या चित्रपटात घेतले गेले. चित्रपट बनून पूर्ण झाला, चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट तुफान गाजला. आजच्या घडीला ‘हेराफेरी’ चित्रपट सर्वात जास्त लोकप्रिय हिंदी कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जातो.

 

hera pheri inmarathi

साहित्य आणि सिनेमा यांची सांगड घालणारे मराठीतले १२ उत्कृष्ट चित्रपट

बऱ्याच चित्रपट रसिकांना माहिती नसलेल्या “द कम्प्लिट अॅक्टर” बद्दल नक्की वाचा!

आज हेराफेरी एक कल्ट सिनेमा मानला जातो. एका प्रसिद्ध वृत्तसमूहाने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सर्वकालिक सर्वोत्तम चित्रपटाचा बहुमान हेराफेरीने मिळवला आहे. कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?