' "अवतारचं शीर्षक मीच दिलं, पण भूमिका नाकारली" गोविंदा असं का म्हणाला होता...

“अवतारचं शीर्षक मीच दिलं, पण भूमिका नाकारली” गोविंदा असं का म्हणाला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२००९ साली प्रदर्शित झालेला जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार ‘ हा चित्रपट आठवतोय? तोच तो सुपर डुपर हिट चित्रपट, ज्यामध्ये तो शेपटीवाला निळ्या रंगाचा आणि अंगावर नक्षी कोरलेला हीरो एका ग्रहावरील एका प्रजातीला त्यांच्या शत्रू असलेल्या दुसर्‍या प्रजातीपासून वाचवतो.

हॉलिवूडपट असल्यामुळे त्यात सायन्स फिक्शन पुरेपूर भरले होते. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक इतिहास रचला. तब्बल १२ वर्षानी आता या सिनेमाचा सिक्वल ‘अवतार 2 ‘ पडद्यावर येणार आहे.

 

avtar 2 im

 

आपल्या ‘चीची’ भैय्याने म्हणजे गोविंदाने आपल्याला अवतार १ मध्ये भूमिका करण्याची ऑफर आली होती, पण आपण ती नाकारली असे वक्तव्य करून राजकीय गुर्हाळाने उबलेल्या नेटीझन्सना एकदम ‘तडकेवाली ‘ बातमी पेश करत खळबळ उडवली आहे.

मित्रांनो फक्त कल्पना करा त्या अवतारात गोविंदा कसा दिसला असता याची, मग तुम्हाला कल्पना येईल की इतका भारी सिनेमा आपल्या ‘हीरो नंबर वन’ ने का नाकारला असेल..

तो जे बोलला त्या गोष्टीत किती तथ्य असेल हे माहिती नाही पण त्यामुळे सर्वांची करमणूक होते आहे हे नक्की. असे काय बोलला बऱ चीची भैय्या? चला पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

टेलीविजन वरील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात निवेदकाने त्याला त्याने नाकारलेल्या सिनेमांविषयी छेडले असता त्याने हा अवतार सिनेमाचा किस्सा सांगितला त्याबरोबरच त्याने इतर नाकारलेल्या सिनेमांबद्दल ही टिप्पणी केली.

अवतार सिनेमा बद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला जेव्हा या सिनेमात काम करण्याची ऑफर आली तेव्हा मी हा सिनेमा करण्यास नम्रपणे नकार दिला. त्याचवेळी मी चित्रपटाचे शीर्षक (अवतार) जेम्स कॅमेरॉनला सुचवले होते.

 

govinda im

 

तो सुपरहिट चित्रपट ठरला. मी त्याला (अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन) याची माहिती दिली होती. हा चित्रपट खरोखरच चांगला चालेल, पण मला वाटतं की चित्रपट पूर्ण व्हायला सात वर्ष लागतील. मी असं सांगितल्यावर तो चिडला.

त्याने विचारलं, हे असेच होईल याची तुला खात्री कशी आहे? मी त्याला सांगितले की तो ज्याची कल्पना करत होता ते जवळजवळ अशक्य आहे. जरी त्याच्या चित्रपटाचे नाव ‘अवतार’ ठेवलेले आहे, तरी सिनेमात तो एका एलियनची गोष्ट दाखवणार आहे.

तेव्हा नकाराचे कारण देताना तो पुढे म्हणाला, की मी ४१० दिवस शूटिंग करावे अशी त्याची इच्छा होती जे मला तेव्हा शक्य नव्हते. त्याचबरोबर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीसाठी, संपूर्ण शरीरावर पेंट करणे आणि ते इतक्या कालावधीसाठी सतत वागवणे देखील अशक्य होते.

 

avtar 2 im1

 

हे मी करू शकत नव्हतो. म्हणून, मी माझा नकार कळवला व माफी मागितली. अवतार सिनेमा सारखेच गोविंदाने गदर, चांदनी, ताल आणि देवदास सारखे चित्रपट नाकारल्याचा खुलासाही केला.

जेम्स कॅमेरॉनचा अवतार रिलीज झाल्यानंतर तीन वर्षांनी , गोविंदाने २०१२ मध्ये अवतार नावाच्या बॉलीवूड चित्रपटासाठी शूट केले . गोविंदाचा बॉलीवूड चित्रपट ‘अवतार’ पहलाज निहलानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात सनी देओल देखील होता. मात्र, या चित्रपटाला यश मिळाले नाही.

काही असो आपल्या चित्रपटात कधी भोजपुरी लहेजा, तर कधी अवधी बोली अथवा युपी, एमपी मधील पानासारखी रंगेल हिन्दी बोलणार्‍या गोविंदाने ही अवतार कथा सांगून नेटीजन्सचे धमाल मनोरंजन करत आपली ‘हिरोपंती’ वसूल केली हे नक्की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?