' आंध्र प्रदेशात वादळाने आणलेल्या 'त्या' सुवर्णरथाचे गूढ कायम

आंध्र प्रदेशात वादळाने आणलेल्या ‘त्या’ सुवर्णरथाचे गूढ कायम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलीही आपत्ती, त्यातही नैसर्गिक आपत्ती आली की सगळ्याच स्तरांवरच्या व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होतो. प्रसंगी मोठ्या प्रमाणावर हानी, नुकसान होतं. माणसं पुरती हादरून जातात. गोष्टी खरोखरच निसर्गाच्या नियंत्रणात असतात, निसर्ग एकदा कोपला की माणसाचं त्याच्यापुढे काहीही चालत नाही याची आपल्याला अशावेळी नव्याने जाणीव होते.

 

water 1 im

 

भूकंप, त्सुनामी यांसारख्या आपत्ती कुठलेही पूर्वसंकेत न देता येत असल्या तरी चक्रीवादळासारख्या आपत्तीचा अंदाज हवामान खातं आधी देतं ही त्यातल्या त्यात काहीसा दिलासा देणारी बाब. त्यामुळे आलेल्या संकटाला सामोरं जाण्याची किमान प्राथमिक तयारी करणं तरी जिथे हे चक्रीवादळ येणार असतं तिथल्या स्थानिक नागरिकांना शक्य होत असेल. पण अशा तीव्र चक्रीवादळाने येताना स्वतःसोबत आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशी एखादी गोष्ट वाहून आणली तर?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आंध्र प्रदेश मधल्या श्रीकाकुलम जिल्ह्यात कुणालाही थक्क करेल अशी एक घटना नुकतीच घडली आहे. आंध्र प्रदेशमधल्या श्रीकाकुलम जिल्ह्यात ‘असानी चक्रीवादळ’ आलेलं असताना तिथल्या ‘सुन्नापल्ली सी हार्बर’ या समुद्रात चक्क एक सोनेरी रथ दिसला. समुद्राच्या लाटांनी हा रथ आपल्यासोबत वाहून आणला. सोनेरी दिसणारा हा रथ सोन्याचा आहे का? हा सोनेरी रथ आढळून आल्यानंतर काय काय घडलं? जाणून घेऊ.

आंध्र प्रदेशमधल्या ‘असानी’ चक्रीवादळामुळे तिथे मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच अचानक तिथल्या ‘श्रीकाकुलम’ जिल्ह्यातील ‘सुन्नापल्ली सी हार्बर’ या समुद्रात चक्क एक सोनेरी रंगाचा रथ तिथल्या स्थानिकांना दिसला.

 

golden rath im

 

एखादं चक्रीवादळ येतं तेव्हा ते आपल्याबरोबर असं काहीतरी वाहून आणेल हा विचारही कुणाच्या मनात येत नाही. त्यामुळे हा सोनेरी रथ पाहून तिथले स्थानिक रहिवासी आश्चर्यचकित झाले. हा रथ कदाचित थायलंड किंवा म्यानमारहून वाहत येऊन आंध्र प्रदेशात पोहोचला असल्याची शक्यता आहे.

गंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं गूढ वैज्ञानिक कारण : “ब्रह्म द्रव्य”…??!

दूरून स्पष्ट दिसणाऱ्या या किल्ल्याजवळ जाताच तो क्षणार्धात चक्क दिसेनासा होतो…

या रथाचा व्हिडियो सध्या सगळीकडे तुफान व्हायरल होतोय. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी हा रथ ओढत आणून समुद्रकिनाऱ्यावर आणल्याचं आपल्याला या व्हिडियोमध्ये दिसतं. हा सोनेरी रंगाचा रथ सोन्याचा असल्याचं कुठेही समोर आलेलं नाही.

 

 

सोन्याचा रथ की घातपाताचा प्रयत्न?

आयएएस अधिकारी आणि श्रीकाकुलम जिल्ह्याचे कलेक्टर असलेल्या श्रीकेश बी. लाठकर यांच्याशी ‘इंडिया टुडे’ ने यासंदर्भात बातचीत केली तेव्हा त्यांनी हा रथ सोन्याचा नसून केवळ त्याचा रंग सोनेरी आहे हे स्पष्ट केलं. आता हा रथ तिथल्या स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे असं त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी ज्यांनी हा रथ पाहिलाय आणि ज्यांना या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणता येईल त्या एम वेंकट गणेश या श्रीकाकुलमच्या पोलीस अधिकाऱ्याशी ‘इंडिया टुडे’ चे पत्रकार बोलले.

‘टेक्कली सर्कल’ च्या या मंडळ निरीक्षकांनी तपासांनंतर पोलिसांना “सोन्यासारखा कुठलाही मौल्यवान धातू रथात आढळून आला नाही. तो स्टील आणि लाकडापासून बनलेला आहे. मात्र त्याचा रंग सोनेरी आहे.”, अशी माहिती दिली. “अधिक तपासासाठी आम्ही आज बॉम्बशोधक पथकाला बोलावलं आहे.”, असं ते पुढे म्हणाले.

तिथल्या स्थानिकांनी काढलेले या रथाचे फोटोदेखील त्यांनी पाठवले. हा रथ नेमका कुठून आणलाय हे जिल्हा प्रशासनाला अद्याप खात्रीशीरपणे कळलेलं नाही. कलेक्टर लाठकर म्हणाले, “त्याच्यावर काही शिलालेख आहेत. त्यांचा अर्थ समजावा यासाठी आम्ही तज्ञांची मदत घेत आहोत. त्यातून आम्हाला काहीतरी सुगावा लागू शकतो.”

 

rath im

 

सोनेरी रंगाचा दिसणारा हा रथ खरंच सोन्याचा असेल का हे कुतूहल मनात उत्पन्न होणं सहाजिक होतं. पण त्याचा रंगच केवळ सोन्याचा असल्याचं निश्चितपणे समोर आलेलं आहे. तरीदेखील आताही या रथाचं गूढ कायम आहे.

समुद्री लाटांनी एक रथच स्वतःसोबत वाहून आणणं याला निसर्गाची किमयाच म्हणायला हवं! आपत्ती येते तेव्हा नेहमी काहीतरी घेऊनच जाते. ही आपत्ती मात्र आख्खा रथच देऊन गेली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?