' हिंदू बहुसंख्य, एकसंध नाही! : धर्मवीर आनंद दिघेंच्या वाक्यातलं भेदक वास्तव

हिंदू बहुसंख्य, एकसंध नाही! : धर्मवीर आनंद दिघेंच्या वाक्यातलं भेदक वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : गौरव आठवले 

===

“हिंदू असणं गुन्हा झालाय… बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही”, आनंद दिघे साहेबांचे हे उद्गार प्रत्येक हिंदूला विचार करायला भाग पाडणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात योग्य अशी समाजव्यवस्था उभी केल्यानंतर आज जी काही या समाजाची अवस्था झाली आहे, ती पाहून प्रत्येकाला लाज वाटायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जरा प्रत्येकाने स्वतःच्या मनात डोकावून पहा. राज्य, प्रांत, भाषा, बोलीभाषा, जात, पोटजात, वंश, घराण, कुळ, गोत्र, पक्ष, अरेरेरे!!! किती ती वर्गवारी… किती तो अनावश्यक गोष्टींचा जाज्वल्य (खोटा) गर्व… अभिमान निश्चित असावा, पण गर्व असू नये…
शतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही…

 

dharmveer im

 

आपण एकसंध का नाही असा प्रश्न केला की सहजपणे जे मनात उत्तर येत, ते म्हणजे “जात”. परंतु, जात हा वरील अनेक फॅक्टर्स पैकी एक फॅक्टर आहे, जो काही राजकारण्यांनी अत्यंत धूर्तपणे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. वरील गोष्टींव्यतिरिक्त, धर्मबंदी, वाळीत टाकणे, बहिष्कृत करणे, आपल्या धर्मग्रंथांचा अर्थ न समजून घेणे, अशी सुद्धा बरीच कारणं आहेत.

धर्मबंदी :

३, ४ वर्षांपूर्वी काही संघटनांनी सुरू केलेली घर वापसी मोहीम, म्हणजे उशिरा आलेल शहाणपण म्हणाव लागेल. पण निदान त्यांनी पुढाकार तरी घेतला. बाकीच्या निद्रिस्त हिंदूंना काही फिकीर नाही, असं म्हणाव लागेल. या घर वापसीला मात्रं फार जुनी पार्श्वभूमी आहे.

११व्या, १२व्या शतकामध्ये काशीच्या हिंदूंनी, मुसलमानांनी बाटवलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घ्यायला विरोध केला. परिणामी तत्कालीन राजाला ती मोहीम रद्द करणे भाग पडले. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात सापडतील.

आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने उपासना करण्याच स्वातंत्र्य देणारा आपला धर्म… परंतु एखाद्याला पुन्हा हिंदू जीवन पद्धती आचरणात आणावी वाटली, तर त्याला मात्र विरोध… हा विरोधाभास नाही काय?

 

muslim war 1 inmarathi

 

पाकिस्तानचे निर्माते, मोहम्मद अली जिना, यांच्या वडिलांचे नाव जिनाभाई पूंजा. त्यांचे आजोबा मूळचे काठीयावाडी हिंदू. परंतु त्यांना काही कारणास्तव (बहुधा जबरदस्तीने) धर्मांतर करावे लागले. त्यांच्यासारख्या अनेक हिंदूंना पुन्हा हिंदू व्हायची इच्छा असूनही तत्कालीन धर्मबंदीमुळे हिंदू होता आले नाही. म्हणून असे लोक घरात आपला धर्म जपत आणि बाहेर मुसलमान म्हणुन वावरत.

या अशा पंथाला इस्मायली खोजा असं म्हणत. जिना ह्याच पंथातले. पुढे त्यांनी पूर्णपणे मुसलमान धर्म स्विकारला आणि नंतरचा इतिहास सर्वांना माहित आहेच. (संदर्भ: कायदे आझम – मराठी अनुवाद, आनंद हर्डीकर) धर्मबंदी नसती, तर पाकिस्तानची निर्मिती कदाचित टळली असती.

 

jina-inmarathi

स्वामी विवेकानंद: जगाला हिंदू धर्माची नव्याने ओळख करून देणारे दैदिप्यमान व्यक्तिमत्व!

“हिंदूंचा सण का साजरा केलास?” यावर मुस्लिम तरुणाचं जबरदस्त उत्तर!

बहिष्कार आणि वाळीत टाकणे

बहुजनांना धर्मात आणि समाजात समान हक्क मिळावेत म्हणुन काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह असे अनेक प्रयत्न केल्यानंतर, सर्वात शेवटी,”हिंदू म्हणुन जन्माला आलो, हिंदू म्हणुन मरणार नाही”, अशी घोषणा करून बहुजनांना बुद्ध धर्माचा अंगीकार करायला लावणारे डॉ. आंबेडकर.

बौद्ध हा हिंदूंचा एक पंथ आहे की नाही, यावर बरेच मतभेद आहेत. परंतु डॉ. आंबेडकरांना अशी घोषणा करायची वेळ कोणामुळे आली, याचा कोणीच कधी विचार करताना दिसत नाही. जन्मावर जात ठरवून त्यांचे मूलभूत हक्क नाकारणारे हिंदू, त्यांना एक प्रकारे बहिष्कृत करून वाळीत टाकणारे हिंदू, धर्मातील मूळ गाभा मात्र विसरले.

 

ambedkar featured IM

 

जात ही जन्मावर नाही, तर कर्मावर आधारित आहे, असं आपल्या वेद उपनिषद आणि गीतेत सांगितल आहे. पण हिंदूंना मात्र त्याचा विसर पडला. आता दोषांचे खापर कोणत्या एका विशिष्ट जातीवर फोडायच असेल, तर तसं करा. पंरतु त्याने जात जाणारे काय? या सर्व परिस्थितीला कुठेतरी प्रत्येक हिंदू जबाबदार आहे, हे मात्र निश्चित…

शिवकालीन समाजव्यवस्था :

धर्मबंदी, वाळीत टाकणे, जात ह्या सर्व गोष्टींवर तोडगा काढून तो सर्वप्रथम अमलात आणणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज… धर्म बंदीला विरोध करत, औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान केलेल्या नेतोजी पालकरला पुन्हा धर्मात घेतला शिवाजी राजांनी…

जन्मावर नाही तर कर्मावर आणि गुणांवर राज्यकारभार आणि बाकीची सर्व राज्याची कामे लोकांवर सोपवली शिवाजी राजांनी… आजकाल हिंदू एक झाले म्हणजे धर्मांधता वाढत चालली आहे अशी ओरड काही मंडळी करतात.

 

shivaji maharaj inmarathi

 

हिंदू म्हणुन एकसंध राहण म्हणजे धर्मांध होण नाही, तर स्वधर्म जपण, दुसर्‍याच्या धर्माचा आदर करण, पण वेळप्रसंगी त्रास देणार्‍या परधर्मीयांना धडा शिकवण होय, हे शिकवल शिवाजी राजांनी…

राजांच्या कोणत्याही किल्ल्यावर जाऊन बघा, मंदिर आणि दर्गा दोन्ही दिसेल… शिवाजी राजे कधीही जात, प्रांत, वंश यात नाही अडकले, म्हणूनच त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेच आहे. परंतु आम्हाला धर्म, एकसंध राहण, धर्माबद्दल बेफिकीर असण आणि धर्मांध होण, ह्यातला फरक कळला तरी आम्ही एक होत नाही, जागरूक होत नाही यापेक्षा दुर्दैव ते काय!!!

२०२० च्या एका अहवालानुसार भारतात ७९.८ % हिंदू समाज आहे, यात वेगळे पंथ आहेत म्हणजेच हिंदू समाज बहुसंख्य आहे असे म्हणता येईल …म्हणुनच दिघे साहेब म्हणाले असावेत, “बहुसंख्य आहोत, एकसंध नाही”.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?