' 'सट्टा मटका' हा खेळ नेमका कसा उदयास आला? वाचा यामागचा अज्ञात इतिहास

‘सट्टा मटका’ हा खेळ नेमका कसा उदयास आला? वाचा यामागचा अज्ञात इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘फिर हेरा फेरी’ मधल्या अक्षय कुमारच्या २१ दिवसांत पैसे डबल या स्कीमच्या नादी लागून फसलेला राजपाल यादव आजही आपल्याला आठवतोच. तो सिनेमा जरी काल्पनिक असला तरी आजही कित्येक लोकं पैसा किंवा यश मिळवण्यासाठी असाच शॉर्ट कट घेतात.

यशस्वी होणं असो किंवा पैसा प्रसिद्धी असो यासाठी शॉर्ट कट घेणं हे नेहमीच आपल्याला वेगळ्या संकटात ओढू शकतं हे आपण लहानपणापासून शिकत आलोच आहोत.

 

phir hera pheri akshay kumar IM

 

तरी काही लोकं शॉर्ट कट घेतात आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या नादी लागतात. आपल्या देशात शेयर बाजाराला अजूनही लोकं जुगार किंवा सट्टा बाजार म्हणतात, पण शेयर मार्केटमध्ये अभ्यास करून वेगवेगळ्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले जातात, त्यामुळे शेयर मार्केट हा जरी एकप्रकारचा सट्टा बाजार जरी असला तरी तो अयोग्य नाही किंवा बेकायदेशिर नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

शेयर मार्केटचा अभ्यास करून काही लोकं आपलं नशीब आजमावतात तर काही लोकं लॉटरी, लकी ड्रॉ, तीन पत्तीसारख्या काही अवैध मार्गांचा अवलंब करतात.

याच काही अवैध मार्गांपैकी एक अत्यंत जुना आणि आजही प्रचलित असलेला मार्ग म्हणजे ‘सट्टा मटका’. खरंतर हा जुगार पार ब्रिटिश काळापासून खेळला जायचा पण सध्या टेक्नॉलॉजीनेदेखील यात बरेच बदल घडवले आहेत.

 

matka IM

 

आजच्या लेखातून आपण याच सट्टा मटकाचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत, हा खेळ नेमका कसा सुरू झाला आणि पारंपारिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या खेळाने लोकांची आयुष्य कशी उध्वस्त केली, हेच या लेखातून तुमच्यासमोर मांडलं जाणार आहे.

कोणताही जुगार हा बेकायदेशीरच त्यामुळे या लेखातून कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालायचा उद्देश नसून केवळ माहिती योग्य आणि सखोल माहिती पुरवणे हाच या लेखाचा हेतु आहे.

सट्टा मटकाची सुरुवात कशी झाली?

सट्टा मटक्याची सुरुवात भारतात स्वातंत्र्यापूर्वी झाली. फार पूर्वी हा खेळ खेळण्यासाठी एका मडक्यात वेगवेगळ्या नंबर्सच्या पावत्या टाकून त्यातून लकी ड्रॉ सारखे नंबर्स काढले जायचे म्हणूनच याला सट्टा मटका हे नाव पडलं.

त्याकाळी कॉटनच्या किंमतीवर हा सट्टा लावला जायचा. न्यू यॉर्क कॉटन एक्स्चेंजमधून बॉम्बे कॉटन एक्स्चेंजला हा माल पाठवला जायचा आणि त्यावेळेस कॉटनच्या किंमतीवर हा सट्टा लावला जायचा.

 

cotton exchange IM

 

आता याला टेक्नॉलॉजीची साथ मिळाल्याने हाच सट्टा मटका एका मोठ्या प्रमाणावर खेळला जात आहे.

सध्या हा मटका कसा खेळला जातो?

इंटरनेटच्या क्रांतीमुळे सध्या हा मटका वेगवेगळ्या साइट्स तसेच मोबाईल ॅप्सच्या माध्यमातूनही खेळला जातो. सर्वप्रथम तुम्हाला यातल्या बऱ्याचशा नंबर्समधून एक नंबर निवडायचा असतो आणि त्यावर पैसे लावायचे असतात.

 

matka online IM

 

हा मटका जर तुम्हाला लागला तर एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते. भारतात जरी हा खेळ उघडपणे खेळला जात नसला तरी भारतात मटकाची क्रेज अजूनही आहे.

कोणत्या प्रकारचे मटके खेळले जायचे?

भारतात वेगवेगळे सट्टा मटकाचे खेळ लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी कल्याण आणि वरळी सट्टा मटका हे २ खेळ अतिशय लोकप्रिय आहेत.

वरळी मटक्याची सुरुवात गुजरातचे शेतकरी कल्याणजी भगत यांनी १९६२ मध्ये केली होती. ह्या खेळात ७ दिवस सट्टा लावला जायचा आणि लाखो रुपयांची उलाढाल व्हायची.

 

kalyanji bhagat IM

 

यानंतर १९६४ साली मटका किंग रतन खत्री यांनी न्यू वरळी सट्टा मटका या खेळाची सुरुवात केली. खत्री यांनी या खेळात आणि त्याच्या नियमात थोडेफार बदल केले, तसेच हा खेळ आठवड्यातले फक्त ४ दिवसच खेळला जायचा.

एका सिंधी कुटुंबात जन्मलेला रतन खत्री हा फाळणीनंतर भारतात आला होता. मटकाच्या विश्वात शिरल्यावर त्याने सर्वप्रथम हा खेळ नेमका काय आहे हे समजून घेतलं आणि मग कल्याणजी भगत यांच्यासोबत तो काम करू लागला.

केवळ मुंबईतच नव्हे साऱ्या देशात मटकाची ख्याती फक्त रतन खत्रीमुळेच पोहोचली. मटका किंग म्हणून खरंतर कल्याणजी भगत यांचं नाव घेतलं जायचं, पण त्यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम करणारा रतन खत्री याने नंतर त्यांना ओव्हरटेक केलं.

दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाले आणि रतन खत्री यांनी स्वतःचा सट्टा मटका सुरू केला. हळूहळू रतनने यातही सगळ्यांना मागे टाकलं आहे ७० च्या काळात तो या अवैध मार्गाने करोडो रुपये कमवायचा असं म्हटलं जातं.

 

ratan khatri IM

 

आणीबाणीच्या दरम्यान रतन खत्रीला अटक करण्यात आली. १९ महीने जेलची हवा खाऊन रतन जेव्हा बाहेर आला तेव्हा सट्टा बाजाराचं रूप पालटून गेलं होतं. अर्थात बाहेर येताच त्याने पुन्हा या विश्वावर स्वतःची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो फारसा यशस्वी झाला नाही.

नंतर त्याने हे सगळे अवैध धंदे बंद करून बॉलिवूडमध्ये सिनेमा निर्मिती क्षेत्रात काम केलं पण तिथेही फारसं यश त्याला मिळालं नाही अखेर २०२० वयाच्या ८८ व्या वर्षी रत्न खत्री उर्फ मटका किंगचा अंत झाला.

कापड गिरण्या, गिरणी कामगार आणि पोलिसांची कारवाई :

जेव्हा मुंबईतल्या कापड गिरण्या बंद होऊ लागल्या, तेव्हा बऱ्याच मिल मजुरांनी सट्टा मटका खेळायला सुरुवात केली. हळूहळू मिलच्या आवारातच या मटकाचे अड्डे दिसू लागले आणि सेंट्रल मुंबई हे मटक्याचं केंद्रस्थान बनलं.

८० आणि ९० च्या दशकात तर या सट्टा मटक्याचं एवढं पेव फुटलं की या खेळातून महिन्याला ५०० करोड इतक्या रुपयांची उलाढाल होऊ लागली. १९९५ च्या आसपास मुंबई पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून या मटक्या उद्योगाला मुंबईबाहेर फेकलं खरं, पण त्याची पाळंमुळं अजूनही मुंबईत आपल्याला बघायला मिळतात.

 

matka 2 IM

 

हळूहळू सट्टा मटका चलवणाऱ्या गॅंगनी त्यांचा मोर्चा इतर अवैध मार्गांकडे म्हणजे लॉटरीसारख्या जुगारी खेळांकडे वळवला.

७० ते ८० च्या दशकात या सट्टा मटक्याने कित्येक लोकांचे संसार उध्वस्त केले. आज जरी या खेळाची तेवढी हवा नसली तरी बऱ्याच ठिकाणी बेकायदेशिर पद्धतीने हा खेळ खेळला जातो.

सध्या या अवैध खेळांचे स्वरूप बदलले आहे. ड्रीम ११ असो, तीन पत्ती असो, रमी असो किंवा इतर ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावणे असो हा सगळा एकप्रकारचा जुगारच आहे, आणि याची सवय खूप महागात पडू शकते.

 

fantasy gaming IM

 

मोठमोठे सेलिब्रिटी या अशा वेगवेगळ्या खेळांना प्रमोट करतात पण आपण सगळ्यांनी एक ध्यानात ठेवलं पाहिजे की यात आपल्याला होणाऱ्या नुकसानाची भरपाई हे सेलिब्रिटी देणार नाहीत, त्यामुळे या सगळ्या प्रलोभनांपासून आपण दूर राहिलंच पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?