' मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय? थांबा, आधी हे वाचा, नाहीतर...

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय? थांबा, आधी हे वाचा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज काल कष्ट न करता झटपट मिळणार्‍या गोष्टींकडे आपला जास्त कल असतो. जेवण बनवण्यासाठी बराच वेळ खर्च होतो परंतु काही वेळाने ते जेवण थंड झाल्यानंतर गॅस वरती गरम न करता मायक्रो व्हेव मध्ये गरम करून घेतले की झाले काम असा अतिशय साधा सरळ आणि सोपा विचार आज काल रुजू होतांना दिसत आहे. पिझ्झा, बर्गर, यांसारखे जंक फूड देखील मायक्रो व्हेव मध्ये अगदी सहज आणि कमी वेळात बनवले जातात.

 

pizza im

 

पण सारासार विचार न करता पटकन घडणार्‍या आणि झटपट पार पडणार्‍या या अन्न गरम करण्याच्या प्रतिक्रियेमुळे आपले आरोग्य धोक्यात तर येत नाही ना? मायक्रो व्हेव मध्ये गरम केले जाणारे अन्न सर्वगुण संपन्न, पोषक आणि सकस राहते ना? या गोष्टींचा विचार आपण कधी करतो का? जर स्वतः ला हा प्रश्न विचारलात तर प्रामाणिकपणे मिळणारे उत्तर असेल “ नाही ”.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपण फक्त मायक्रो व्हेव मध्ये अन्न गरम करतो, आणि पटापट खाऊन दुसर्‍या कामासाठी निघून जातो. परंतु दैनंदिन जीवनात केली जाणारी ही चूक आपल्याला भविष्यात मात्र अतिशय महागात पडू शकते. कारण मायक्रो व्हेव मध्ये गरम केलेले अन्न खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. चला तर आजच्या या लेखात पाहुयात मायक्रो व्हेव मधील अन्न खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम!

अन्नामधील पोषक द्रव्ये नाहीशी होतात, अन्न खराब होते.

 

microwave im

 

एकदा अन्न शिजवल्यानंतर जर आपण त्याला मायक्रो व्हेव मध्ये गरम करत असू तर अन्नामधील पोषक द्रव्ये नाहीशी होण्यासाठी आपण स्वतः सर्वस्वी जबाबदार आहोत. अन्न शिजवून सारखे सारखे गरम केले तर त्याची पौष्टिकता लयास जाते, त्याच्या मधील सकसता नष्ट होते. अन्नातील विघटन होण्यासाठी जबाबदार असलेले घटक उष्णतेमुळे नाहीशी होतात, आणि परिणामी अन्न लवकर खराब होण्यास सुरुवात होते.

कर्करोगाचा धोका 

मायक्रो व्हेव मध्ये गरम केलेल्या अन्नाचे सेवन रोज होत राहिल्यास त्यातील रासायनिक प्रक्रियेचा अन्न व शरीर या दोघांवरती परिणाम होतो , व कर्क रोग निर्माण करणार्‍या पेशींना चालना मिळते असे एका संशोधनात आढळून आले आहे.

 

cancer im

 

आतड्याचा आणि त्वचेच्या कर्क रोगाचा धोका मायक्रो व्हेव मधील अन्न सेवनाने उद्भवू शकतो.

गर्भवती महिला आणि गर्भातील बाळाच्या मेंदूवरती होणारे दुष्परिणाम

गर्भवती महिलांनी मायक्रो व्हेव मध्ये गरम केलेले अन्न खाणे टाळून सकस आहार घ्यण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मायक्रो व्हेव मध्ये गरम केलेले अन्न तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम समाधानकारक नाही. अन्न गरम करत असताना मायक्रो वेव मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे अन्नावरती दुष्परिणाम होऊन गर्भातील बाळाच्या मेंदू आणि हृदय या अवयवांचे नुकसान होते.

 

pregnant inmarathi

 

सतत मायक्रो व्हेव मधील अन्नसेवन गर्भपतास कारणीभूत होऊ शकते अशी चिंता डॉक्टर देखील व्यक्त करतात.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत बनवते

शरीरातील कुठल्याही आजाराशी किंवा रोगाशी लढण्याचे सामर्थ्य असणारे घटक आपल्याला पोषक, सकस अन्नाद्वारे मिळतात. थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा देण्याचे काम अन्नातील पोषक मूल्ये करतात.

 

weakness inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

आपल्याला भूक लागते आणि जेवण करून आपण ताजेतवाने होतो कारण सकस अन्न आपल्या पोटात जाते. परंतु अन्न सारखे सारखे मायक्रो व्हेव मधे गरम केले जाते तेव्हा त्यामधून रोग प्रतिकार शक्ति वाढवणारे घटक नाहीसे होत जातात आणि परिणामी आपली प्रतिकार शक्ति कमकुवत होण्यास सुरूवात होते.

वेळीच सावध व्हा, हे लहानसहान त्रास आहेत ‘किडनी’ खराब झाली असल्याची लक्षणं

घरगुती गॅस सिलेंडर अधिक काळ टिकवण्यासाठी उपयोगी ठरतील या टिप्स

म्हातारपणास आमंत्रण 

जेव्हा आपण सकस आहारा एवजी मायक्रो व्हेव मधील मूल्यद्रव्ये नष्ट झालेले अन्न सेवन करतो तेव्हा शरीरामधे बरेच आंतरिक बदल होऊन चेहर्‍यावर सुरकुत्या येणे, शरीर थकल्यासारखे वाटणे, शरीरामध्ये उत्साह न जाणवणे असे बदल आपल्याला जाणवू लागतात. शरीरावर तरुणपणी अकाली वृद्धत्व आणण्यासाठी मायक्रो व्हेव मधे गरम केलेले अन्न कारणीभूत ठरते.

 

wrinkles inmarathi

 

पारंपरिक रित्या शिजवलेले अन्न हे पोषक असले तरी आपण पाश्चात्य जेवण बनवण्यासाठी मायक्रो व्हेवचा उपयोग करू शकतो. याने आपल्या जेवण बनवण्याच्या पद्धती मध्ये विविधता येईल आणि खाणारा देखील अतिशय चवीने पदार्थ खाऊ शकेन.

शरिराच्या निकोप वाढीसाठी आपण अन्नपदार्थ खातो, मात्र त्या प्रक्रियेत जर कोणतीही चूक होत असेल, तर वेळीच सावध व्हा. तातडीने त्यात बदल करा तरच आरोग्य सुधारेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?