' ”योग्य वेळी मूल व्हावं”, मोठ्यांकडून येणाऱ्या या सल्ल्यामधील ‘योग्य वय’ नेमकं कोणतं? जाणून घ्या – InMarathi

”योग्य वेळी मूल व्हावं”, मोठ्यांकडून येणाऱ्या या सल्ल्यामधील ‘योग्य वय’ नेमकं कोणतं? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

समाजात राहताना एका मागोमाग एक अशा प्रश्नांच्या मालिका म्हणजेच जीवन असं म्हणायला हरकत नाही. शिक्षण सुरु असताना पुढे काय करणार? नोकरी लागली की लग्न कधी करणार? लग्न झाले की गुड न्यूज कधी देता? असे सतत पडणारे प्रश्न. आणि त्यांना इच्छा असो नसो सामोरं जावं लागतंच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पूर्वीच्या काळी बाल विवाह होत. मुलगी वयात येईपर्यंत आई वडिलांकडे रहायची. मग वयात आली की सासरी जायची. यथावकाश मुलबाळ झालं की संसार पार झाला असं मानलं जाई. त्यावेळी खूप लहान वयात बाळंतपणाला सामोरं जाताना कितीतरी मुली जीवाला मुकत.

 

marriage im

 

पुढे काळ बदलला. स्त्री शिक्षण, स्वातंत्र्य या कल्पनांनी स्त्रियांना थोडी मोकळीक दिली. मुली शिकू लागल्या. नोकऱ्या करू लागल्या. पण तरीही शिक्षण पूर्ण झाले की लगेचच लग्नाचे पहायची घाई सुरु व्हायची. आणि बघता बघता मुली लग्न होऊन आपल्या घरी जात. एक दोन वर्षात मूल होऊन जायचे. साधारणपणे या पिढीतील मुलगी वयाच्या २५ व्या वर्षी एक ते दोन मुलांची आई झालेली असायची.

पण बदललेला काळ एक वेगळीच समस्या समोर घेऊन आलेला दिसतो. शिक्षण, करीअर यांच्या नादात लग्नाचे वय आणि त्यामुळे पुढील समस्या खूप वाढलेल्या दिसतात.

एक काळ असा होता की कृत्रिम गर्भधारणा करावी लागणे हे वैवाहिक जीवनातील अपयश मानले जाई. बरीच जोडपी हा उपचार चोरून चोरून करायची परंतु आता वंध्यत्व ही मोठी समस्या झालेली आहे की याच्यासाठी आवश्यक इलाजाच्या मोठमोठ्या जाहिराती लागलेल्या दिसतात. काय आहे या समस्येचे मूळ?

 

IVF IM

 

या सध्याच्या पिढीतील मुले मुली यांचे लग्नाचे वयच आजकाल तीस वर्षाच्या घरात गेलेले दिसते.  त्यानंतर एखादे दुसरे वर्ष एन्जॉयमेंट हवी म्हणून मुलाचा विचार नंतर केला जातो. कधी कधी इतरही कारणे असतात. जसे की स्वत:ची जागा नसणे, नोकरीतील प्रमोशन वगैरे. नोकरीमुळे एकमेकांना देण्यासाठी वेळ नसणे ही पण एक समस्या आहेच. पण त्यानंतर मूल होऊ द्यायचे म्हणजे जवळपास वयाची पस्तीशी आलेली असते.

मूल जन्माला येताना केले जाणारे हे ९ प्रकार अचंबित करणारे आहेत…!

अनियमित पाळी ते प्रसुतीमधील अडथळे : महिलांनो, “या” रोगाला वेळीच आळा घाला

मूल होण्यासाठी हे वय योग्य आहे का?

वास्तविक हा प्रश्न अतिशय खाजगी आहे. परंतु जर डॉक्टरना विचारलं तर ते काय सांगतात? त्यांच्या मते मूल होण्याचं स्त्रीचं योग्य वय २५ वर्षे ते ३५ वर्षे. या दरम्यान मूल झाले तर स्त्रीला आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण उशीरा आलेले गर्भारपण अनेक समस्यांचे मूळ ठरू शकते.

खूपदा बीजांड निर्मिती कमी होणे हे पण एक समस्येचे कारण ठरत आहे. इतकेच नव्हे तर मेनोपॉझचे वय पण आजकाल अलीकडे आले आहे असं लक्षात येते आहे. त्यामुळे योग्य वयातच मूल होऊ द्यावे असे डॉक्टर सांगतात.

साधारणपणे स्त्रीच्या बीजकोशातील बीजांडे दरमहा बाहेर पडतात. पण वयाच्या तीस वर्षानंतर त्या बीजांडाची संख्या कमी होते. मग गर्भधारणा होणे थोडेसे कठीण बनते. IVF किंवा IUI या कृत्रिम गर्भधारणेच्या प्रकारातून पण गर्भधारणा होऊ शकते. मात्र त्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. आणि त्यासाठी वेळ देणे हे ही तितकेच महत्वाचे असते.

 

ivf 1 im

 

आजकाल आपल्याकडेही पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण होताना दिसते. त्यामुळे मुली करिअरला जास्त प्राधान्य देताना दिसतात.  करीअरच्या मागे धावताना लग्नाचे, आई होण्याचे वय मागे पडताना दिसत आहे. वय कमी असताना शरीराची सहनशक्ती चांगली असते. वाढत्या वयाबरोबर ती पण कमी होते. शारीरिक क्षमता कमी होते आणि मूल होणे हे अडचणीचे ठरते.

बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. जास्त वयाच्या गरोदरपणात डायबेटीस, ब्लडप्रेशर अशा व्याधींचाही त्रास उद्भवू शकतो. म्हणून डॉक्टर सल्ला देतात तो लवकर लग्न करून लवकर मूल होऊ द्यावं म्हणजे या समस्या भेडसावणार नाहीत.

आणखी एक गोष्ट म्हणजे पुरुषांमध्ये लाखो शुक्राणू दर दिवशी तयार होतात पण स्त्रियांमध्ये जन्मत: दहा लाख अंडी असतात. मासिक पाळी सुरु होण्याच्या वयापर्यंत ही अंडी तीन लाखांवर येतात. वयाच्या ३७ व्या वर्षी या अंड्यांची संख्या २५ हजार होते तर ५१ व्या वर्षी १००० होते. आणि त्यातही फक्त २०० ते ३०० अंड्यांमध्ये मूल जन्माला घालण्याची क्षमता असते. जसे जसे वय वाढत जाते तसतशी अंड्यांची संख्या तर कमी होतेच शिवाय गुणसूत्रांचा आणि DNA चा दर्जाही घसरतो. आणि होणारे मूल हे व्यंग घेऊन जन्माला येण्याचा धोका वाढतो.

शिवाय बऱ्याच महिलांची प्रजननक्षमता रजोनिवृत्तीपूर्वी ८ वर्षे संपते. त्यामुळे आपण ठरवू तेव्हा मूल ही म्हणायला सोपी गोष्ट प्रत्यक्षात अत्यंत किचकट व अवघड आहे. कारण करीअर करताना लग्न व्हायलाच तिशी येते. तोवर हार्मोन्सचा साठा संपत आलेला असतो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. तरुण वयात स्त्रियांमध्ये गुणसूत्रात कमी बिघाड असतात. वाढत्या वयात तो बिघाड जास्त होऊन प्रजननक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे निरोगी मूल जन्मण्याची शक्यता कमी होते.

 

pregnant woman inmarathi

 

म्हणून योग्य वेळी योग्य वयात लग्न आणि योग्य वयात मूल व्हावे. नुकतेच एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे स्त्रियांच्या अंडाशयातील अंड्यांची संख्या ही जनुकीय स्थितीवर अवलंबून असते. पण एकंदरीत आयुष्यात कित्येक उलथापालथी, ताण तणाव यावरही ती संख्या अवलंबून असते. कधी कधी विषारी रसायनांशी येणारा संपर्क पण यात काही बिघाड करू शकतो. त्यामुळे त्याचा दर्जा खालावू शकतो आणि वाढत्या वयात या अंड्यांचा दर्जा खालावत जातो आणि तक्रारी सुरु होतात. म्हणून योग्य वयात मूल होणे आवश्यक आहे.

अशा बऱ्याच जणी आहेत ज्यांनी कमी वयात मूल होऊ दिले. आता ती मुले मोठी झाली आहेत आणि आई पण आपले करीअर अगदी जोमाने करताना दिसत आहे. म्हणून लग्न, बाळंतपण या बहुतांश अपरिहार्य गोष्टी आहेत आणि त्या योग्य वयातच कराव्यात. ज्यांना ते टाळायचेच आहे त्यांचा प्रश्न नसतो पण ज्यांना एकंदर घर संसार, मुलेबाळे हे खूप आवडते त्यांनी यासाठी फार उशीर करू नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?