' स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि आता चक्क स्मार्ट शूज; वाचा हा latest फंडा!

स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि आता चक्क स्मार्ट शूज; वाचा हा latest फंडा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तंत्रज्ञानाशिवाय यापुढे आपल्याला आपल्या आयुष्याची कल्पनाच करता येणार नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत जवळ बाळगावा लागणारा फोन, कामासाठी लागणारा लॅपटॉप या गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून वगळूच शकत नाही.

तंत्रज्ञान विकसित होत जातंय तसतसं अधिक आधुनिक सुविधा लोकांना पुरवतंय. कुठल्याही उपकरणाच्या मागे आता ‘स्मार्ट’ असं विशेषण जोडलं गेलं की त्या उपकरणाची पूर्वी असलेली व्याख्याच बदलून जाते. मग ते आधीपेक्षा अधिक गुंतागुंतीचं, अधिक फायदे देणारं आणि अधिक खर्चिक झालेलं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच विषयी तर आपल्याला माहितीये. पण आता चक्क स्मार्ट शूजही मार्केटमध्ये उपलब्ध झालेत. नेमके कसे असतात हे स्मार्ट शूज? त्यांच्यात कुठले फीचर्स असतात? कुठल्या गोष्टींची खातरजमा करून ते विकत घ्यावे? ते सर्वसामान्यांना परवडणारे आहेत की नाहीत? त्यांचे फायदे-तोटे काय? या सगळ्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

काय आहेत हे ‘स्मार्ट शूज’?

दिसायला अगदी नेहमीच्या शूजसारख्या दिसणाऱ्या या स्मार्ट शूजमध्ये बरेच फीचर्स असतात. स्मार्ट शूजमध्ये असलेल्या काही छोट्या डिव्हाइसेसद्वारे तुम्ही किती पावलं चालला आहात, तुमच्या चालण्याचा वेग किती आहे, तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या आहेत या आणि तत्सम गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं.

 

smart shoes im

 

जीपीएससारख्या जिओ लोकेशन्स सिस्टिम्सद्वारे तुम्ही कुठे आहात हेदेखील हे स्मार्ट शूज तुम्हाला दाखवू शकतात. या स्मार्ट शूजमध्ये प्रेशर सेन्सर असतो जो तुम्ही ते स्मार्ट शूज घातले की तुमचं वजन किती आहे हे दाखवतो.

काही स्मार्ट शूज असेही असतात ज्यांच्यात एकदा तुमचे पाय तुम्ही घातलेत याचे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचले की ते आपोआप बांधले जातात. त्यांच्यातही प्रेशर सेन्सर्स वापरलेले असतात.

आपल्या भोवतालचं वातावरण कसं आहे ते दाखवणारे पर्यावरणीय सेन्सर्सही या स्मार्ट शूजमध्ये असू शकतात. प्रकाश, ध्वनी, समुद्रसपाटीपासून आपण किती उंचीवर आहोत यावर आणि अशासारख्या बाबींवर हे पर्यावरणीय सेन्सर्स लक्ष ठेवतात.

या स्मार्ट शूजना बॅटरी असते. एकदा हे शूज चार्ज केले की ते त्या चार्जींगवर साधारण पुढचे दोन आठवडे चालतात. या स्मार्ट शूजमध्ये काही मजेशीर फीचर्सही असतात.

उदा. स्मार्ट शूजच्या तळव्यांवर एलईडी लाईट्स असतात ज्याचे रंग तुम्हाला बदलता येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या तब्येतीविषयी माहिती मिळवायची असेल तरी या स्मार्ट शूजद्वारे ते काही प्रमाणात शक्य आहे.

तुम्ही तुमचे हे स्मार्ट शूज ब्लूटूथद्वारे फोनला कनेक्ट करू शकता. स्मार्ट शूजशी निगडीत असलेलं एक ऍप तुमच्याकडे असू शकेल जे तुम्हाला दिवस, आठवडा, महिन्यानुसार आरोग्यासंबंधीची आकडेवारी पुरवेल.

स्मार्ट शूज बनवणाऱ्या कंपन्या :

 

smart shoes im1

 

‘डिजिटसोल’ सारख्या काही कंपन्या या केवळ स्मार्ट शूज बनवण्यासाठीच आहेत. डिजिटसोलने पुरवलेल्या स्मार्ट शूजद्वारे तुमची स्थिती, तुम्ही किती पावलं चालला आहात, तुमच्या किती कॅलरीज बर्न झाल्या आहेत यांची माहिती मिळते, पण आता निक, आदिदास, एएसआयसीएस आणि न्यू बॅलन्स यांसारख्या कंपन्यांनीही ही नवी तंत्रज्ञानं चटकन आत्मसात केलेली असून त्यांनीही आता नाविन्यपूर्ण असे स्मार्ट शूज बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.

निकने २०१६ साली पहिल्यांदा आपले स्मार्ट शूज बाजारात आणले. मात्र त्यात सगळ्या प्रकारच्या सुविधा समाविष्ट केलेल्या नव्हत्या. The Nike HyperAdapt 1.0 हे शूज पायात घालून तुम्ही आरामात बसलेले असता तेव्हा हे शूज आपोआप आपल्या लेस बांधतात, पण बाकी स्मार्ट शूजमध्ये असलेले मॉनिटरिंग आणि ट्रॅकींग फीचर्स या शूजमध्ये नाहीत.

Under Armour चे HOVR Phantom शूज काही अधिक फायदेशीर फीचर्स पुरवतात. तुमच्या फोनवरच्या ‘मॅप माय रन’ या ऍपशी तुम्ही हे स्मार्ट शूज जोडू शकता. त्यानंतर हे ऍप तुम्हाला तुम्ही किती पावलं चाललात आणि तुमच्या चालण्याचा वेग किती होता हे दाखवेल.

तुमच्या फिटनेसच्या दृष्टीने काही फायदेशीर ट्रेनिंग प्लॅन्सदेखील तुम्हाला या ऍपवर मिळू शकतात. The Nike adapt bb हे एक लोकप्रिय स्मार्ट शूज आहेत. ते किफायतशीर किमतीत मिळतात आणि बरेच फीचर्स पुरवतात.

किंमत, माप, ब्रँड, मोबाईलशी असलेली सुसंगती, बॅटरी लाईफ, ग्राहकांची मतं, फीचर्स, स्टाईल या सगळ्या बाबी विचारात घेऊन स्मार्ट शूजची निवड करा.

स्मार्ट शूजचे फायदे :

 

smart shoes im2

 

१. ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर्स – स्मार्ट शूज तुम्हाला ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर्स पुरवतात. आपण किती पावलं, किती अंतर चाललोय, आपण किती कॅलरीज बर्न केल्या आहेत यावर ते लक्ष ठेवतात.

२. सोईस्कर – हे स्मार्ट शूज बऱ्यापैकी सोईचे असतात. एकदा तुमच्या स्मार्टफोनशी ते कनेक्ट झाले की तुम्ही कुठे आहेत हे त्यांच्याद्वारे कळू शकतं.

मोबाईल, चाव्या अशा महत्त्वाच्या वस्तू ज्यांच्याकडून नकळत कुठेतरी ठेवल्या जातात त्यांच्यासाठी हे स्मार्ट शूज विशेषतः सोयीचे असतात.

३. तणाव कमी होतो – एकदा हे स्मार्ट शूज तुमच्याकडे असले की आपल्याकडून कुठे वस्तू हरवल्या असतील तरी त्याची आपल्याला चिंता करावी लागत नाही. त्या कुठे आहेत हे तुम्हाला लगेच करू शकतं. त्यामुळे तणाव जामी होतो.

४. टिकाऊ – स्मार्ट शूज हे उत्तम प्रतीच्या साहित्यापासून बनवले जात असल्यामुळे ते खूप टिकाऊ असतात.

५. फॅशनेबल – बरेच उच्च प्रतीचे स्मार्ट शूज फॅशनेबल असतात. तुमच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवलं जाणे आणि शिवाय तुमचे स्मार्ट शूज तुम्हाला मिरवता येणे असे दोन्ही फायदे त्यातून होतात.

६. दर्जेदार डिझाईन – स्मार्ट शूजचं डिझाईन आणि रचना उच्च दर्जाची असते त्यामुळे बरेच जण स्मार्ट शूज खरेदी करतात.

स्मार्ट शूजचे तोटे :

 

smart shoes im3

 

१. बॅटरी लाईफ – स्मार्ट शूजचं बॅटरी लाईफ कमीही असू शकतं. त्यामुळे तुम्हाला जर ते नेहमी वापरायचे असतील तर ते नियमितपणे चार्ज करावे लागतील.

२. किंमत – स्मार्ट शूजचा हा एक मुख्य तोटा आहे. त्यांची किंमत जास्त असू शकते. विशेषतः जर तुम्हाला उच्च प्रतीचे स्मार्ट शूज हवे असतील तर ते महागडे असू शकतात.

३. मर्यादित फीचर्स – मर्यादित फीचर्स असणे हा स्मार्ट शूजचा आणखी एक तोटा. काही स्मार्ट शूजमध्ये केवळ तुम्ही काय ऍक्टीव्हीज करताय यावर लक्ष ठेवणारे फीचर्स असतात तर काही स्मार्ट शूज केवळ तुम्ही कुठे आहेत यावरच लक्ष ठेवत असतात. जर तुम्हाला हे दोन्ही फीचर्स असलेले स्मार्ट शूज हवे असतील तर तुम्हाला शक्यतो जास्त किंमत देऊन ते विकत घ्यावे लागतील.

४. स्मार्ट शूजना असलेले पर्याय –

 

smart shoes im4

 

स्मार्ट शूज ही गरज नाही. त्यांना इतर पर्याय आहेत. आपल्याकडे ऍक्टिव्हिटी ट्रॅकर्स उपलब्ध आहेत ज्यांची किंमत परवडण्यासारखी असते आणि ज्यात आपल्या ऍक्टिव्हिटीज, झोप, आपल्या हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर लक्ष ठेवणारे आणि अशा आणखी बऱ्याच प्रकारचे फीचर्स असतात.

जीपीएस ट्रॅकिंग उपकरणं हा स्मार्ट शूजना असलेला असाच एक पर्याय. या उपकरणांद्वारे आपण कुठे आहोत त्या ठिकाणावर लक्ष ठेवता येतं. कार, सुटकेस सारख्या वस्तूंना ही उपकरणं जोडता येतात आणि त्याद्वारे आपण कुठल्या ठिकाणी आहोत यावर पूर्णवेळ लक्ष ठेवता येतं.

आजच्या घडीला तरी स्मार्ट शूज लोकप्रिय नाहीत. वरच्या सगळ्या बाबी विचारात घेऊन ज्यांना स्मार्ट शूज घेणं शक्य आहे त्यांनी ते जरूर घ्यावेत. कारण, तोटे असले तरी निश्चितच त्यांचे अनेक फायदेही आहेत.

बाकीच्यांसमोर मात्र बाकी सुविधांसाठीचे इतर पर्याय खुले आहेत जे स्मार्ट शूजच्या किंमतीच्या तुलनेत त्यांना बरेच स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्यातल्या बहुतेकांच्या दृष्टीने निदान आतातरी आपले नेहमीचेच शूज वापरण्याचा पर्याय अधिक सोयीचा दिसतो आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?