' गेल्या ६ महिन्यांमध्ये खूप मार खाल्लेले पण फंडामेंटली चांगले आणि आता घेण्यासारखे ५ स्टॉक्स!

गेल्या ६ महिन्यांमध्ये खूप मार खाल्लेले पण फंडामेंटली चांगले आणि आता घेण्यासारखे ५ स्टॉक्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

शेअर मार्केट ही एक विचित्र जागा आहे. या मार्केटमध्ये दररोज शेअर्सचे भाव वरखाली होतात आणि त्याचबरोबर ट्रेडर्स व इन्व्हेस्टर्सचे खिसे देखील भरतात व रिकामे होतात. हे सत्र शेअर बाजारामध्ये अव्याहत सुरु असते. या शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि आपले खिसे जर कायम भरलेले ठेवायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणे अतिशय गरजेचे आहे.

शेअर बाजार हा “डिमांड” आणि “सप्लाय” यांचा खेळ आहे. मागणी आणि पुरवठा जसा असेल त्यानुसार शेअर्सच्या किमती वरखाली होत असतात.

एखाद्या शेअरमध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणात मागणी निर्माण होते तेव्हा त्या शेअरची किंमत गगनाला भिडू लागते. परंतु याच शेअरमध्ये जेव्हा मागणी कमी होते आणि पुरवठा वाढत जातो तेव्हा या शेअरची किंमत खाली पडू लागते.

 

share market 3 IM

 

शेअरच्या किमती ठरण्यामागे मागणी आणि पुरवठा हे तर कारणीभूत असतातच, परंतु या व्यतिरिक्त शेअरची किंमत ठरवणारी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कंपनीचे फंडामेंटल्स! दीर्घकालीन गुंतवणूक करीत असताना नेहमी असे म्हणले जाते, की चांगले फंडामेंटल्स असणार्‍या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. चांगले फंडामेंटल्स म्हणजे काय?

तर अशी कंपनी असावी जिचा महसूल दरवर्षी वाढत आहे, ज्या कंपनीचा निव्वळ नफा दरवर्षी वाढत आहे, ज्या कंपनीवर फारसे कर्ज नाही, ज्या कंपनीची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे, ज्या कंपनीच्या व्यवसायाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. हे आणि असे बरेच ठोकताळे लावून आपण कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास करतो आणि त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. सुरुवातीला म्हणल्यानुसार शेअर मार्केट ही एक विचित्र जागा आहे.

इथे काही वेळा फंडामेंटली चांगल्या कंपन्यादेखील अतिशय कमी किमतीला मिळू शकतात. कारण शॉर्ट टर्ममध्ये मागणी आणि पुरवठ्याचे गणित व्यस्त झालेले असू शकते आणि त्यामुळे अतिशय चांगला शेअरदेखील कचरा भावात उपलब्ध झालेला असू शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण अश्याच काही फंडामेंटली चांगल्या कंपन्या बघणार आहोत ज्यांच्या शेअर्सच्या किमती गेल्या सहा महिन्यांमध्ये सपाटून खाली पडलेल्या आहेत.

या लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नसून एक वैयक्तिक मत आहे आणि जे चुकीचेदेखील असू शकते. तेव्हा कोणताही आर्थिक निर्णय पूर्ण अभ्यास करुन तसेच स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावा.

युटीआय एएमसी (UTIAMC) :

 

uti IM

 

म्युच्युअल फंड वितरणाच्या व्यवसायामध्ये असलेली ही कंपनी. भारतामध्ये म्युच्युअल फंडांची सुरुवात याच कंपनीने केली. पूर्वी ही कंपनी पूर्णपणे सरकारी मालकीची होती. आता ही पब्लिक झालेली आहे तरीदेखील काही प्रमुख बॅंकांच्या माध्यमातून या कंपनीमध्ये सरकारी मालकीचे वर्चस्व अजूनही आहे.

2021 च्या सप्टेंबर महिन्यामध्ये या शेअरची किंमत 1200 रुपये होती. परंतु सध्या हाच शेअर सुमारे 750 रुपयांच्या आसपास मिळत आहे. ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. म्युच्युअल फंड या क्षेत्रामधील आघाडीची अशी ही कंपनी आहे.

यांचा व्यवसाय हा प्रेडिक्टेबल असा आहे, याचे कारण म्हणजे म्युच्युअल फंडांमध्ये लोक दीर्घकालीन गुंतवणूक करीत असतात. जोपर्यंत लोकांची गुंतवणूक यांच्याकडे आहे तोपर्यंत दरवर्षी यांना महसूल मिळत राहतो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर यांचा महसूल दरवर्षी 7 ते 8 टक्के वाढत आलेला आहे.

निव्वळ नफा दरवर्षी 10 ते 11 टक्के वाढत आलेला आहे. बाजारामध्ये जेव्हा तेजी येते तेव्हा यांचा महसूल वाढतो, कारण तेजीमध्ये खूप सारे गुंतवणूकदार बाजारामध्ये येत असतात. सध्या मंदी आहे त्यामुळे हा शेअर अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध आहे.

एचडीएफसी एएमसी (HDFCAMC) :

 

hdfc IM

 

म्युच्युअल फंड वितरण क्षेत्रामधीलच ही अजून एक महत्वाची कंपनी. यांचेदेखील बिझिनेस मॉडेल युटीआय प्रमाणेच आहे. हा शेअर काही महिन्यांपूर्वी 3400 रुपयांच्या आसपास होता. तो सध्या 1900 रुपयांच्या आसपास मिळत आहे.

ही देखील पूर्णपणे कर्जमुक्त अशी कंपनी आहे. यांचा महसूल गेल्या पाच वर्षांमध्ये वार्षिक 6 टक्के दराने वाढलेला आहे, आणि निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांमध्ये वार्षिक 20 टक्क्यांनी वाढलेला आहे. हे असे शेअर्स म्हणजे मंदीमधील पर्वणी असते. कारण शेअर बाजारामध्ये कायम मंदी कधीच रहात नाही.

नौकरी डॉट कॉम (इन्फो एज) (NAUKRI) :

 

naukri.com IM

 

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणाला नोकरी शोधायची असेल तर तो इंटरनेटवर शोधतो. कोणाला रहायचे घर हवे असेल तर तो इंटरनेटवर शोधतो. शिक्षण घ्यायचे असेल तरी तो ऑनलाईन पर्याय शोधतो. लग्न करायचे झाले तरी वधु-वर सूचक मंडळ ऑनलाईन आहे.

या सर्वांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणारी अशी ही नौकरी डॉट कॉम कंपनी. 99 एकर्स हा प्लॅटफॉर्मदेखील यांचाच. जीवनसाथी डॉट कॉम हे वधु-वर सूचक मंडळ यांचेच. शिक्षा डॉट कॉम हा एज्युकेशन प्लॅटफॉर्म यांचाच. या व्यतिरिक्त यांनी झोमॅटोसारख्या भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांमध्येदेखील गुंतवणूक केलेली आहे.

नुकतेच झोमॅटोचे बाजारमध्ये लिस्टिंग झाल्यामुळे यांच्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. यांचा व्यावसायिक नफादेखील बर्‍यापैकी चांगला असतो.

असे असूनदेखील ऑक्टोबर 2021 मध्ये 7500 च्या आसपास असणारा हा शेअर मंदीमध्ये जोरदार कोसळला आणि सध्या 3800 रुपयांच्या आसपास मिळत आहे.

व्हर्लपूल ऑफ इंडिया (WHIRLPOOL) :

 

whirlpool IM

 

फ्रिज, वॉशिंग मशीन, एयर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, वॉटर प्युरिफायर्स यापैकी एक वस्तु अशी सांगा जी तुम्ही वापरलेली नाही. सर्वांसाठी आवश्यक अश्या वस्तु बनवणारी व्हर्लपूल कंपनी. नाव ऐकले की लगेच आपल्या डोक्यात “व्हर्लपूssल व्हर्लपूssल” ही जाहिरात वाजू लागते.

गेली अनेक वर्षे भारतीयांच्या घराघरांमध्ये असणारी ही कंपनी. आता उन्हाळा संपत आला आहे. पहिल्या तिमाहीचे निकाल जुलै महिन्यांमध्ये येतील. यावेळचा उन्हाळा कडक होता, त्यामुळे आपण अशी आशा करु शकतो की एसींची विक्री चांगली झाली असेल.

शेअरची किंमत मात्र जानेवारी 2022 मध्ये 2800 होती ती सध्या उतरुन 1500 रुपयांवर आली आहे.

डीमार्ट (DMART) :

 

dmart IM

 

भारतामध्ये सर्वांना स्वस्तात किराणा माल पुरवणारी सर्वात मोठी कंपनी कोणाला ठाऊक नाही? शेअर मार्केटचे भीष्म पितामह आर के दमानी यांनी स्थापन केलेली फंडामेंटली जबरदस्त असणारी अशी ही कंपनी आहे.

या कंपनीबद्दल बरेच केस स्टडी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यामुळे पुन्हा नव्याने फंडामेंटल्स सांगत बसत नाही. परंतु शेअरची किंमत मात्र ऑक्टोबर 2021 मध्ये 5900 होती ती आता उतरुन 3500 रुपयांवर आलेली आहे.

वॉरेन बफे यांचे प्रसिद्ध वाक्य आहे – “बी फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी, बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फीअरफुल!” म्हणजे जेव्हा सगळा गाव हावरटपणे बाजारामध्ये शेअर्स घेत असतो तेव्हा आपण भ्यावे, आणि सगळा जेव्हा भेदरुन बाजाराबहेर बसलेला असतो तेव्हा आपण हावरट व्हावे.

चांगल्या शेअर्सच्या किमती खाली उतरणे हे सगळा गाव भेदरलेला आहे याचे द्योतक आहे. तेव्हा या गोष्टीचा विचार व्हावा इतकेच सांगतो आणि इथेच थांबतो.

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. सोप्या मराठी भाषेमध्ये हे प्रशिक्षण तुम्हाला घेता यावे यासाठी आपला “गुंतवणूक कट्टा” हा उपक्रम आहे.

neeraj borgaonkar 2 IM

 

वेळ मिळेल तेव्हा इंटरनेटवर “गुंतवणूक कट्टा” असे सर्च करुन बघा. तसेच नीरज बोरगांवकर हा आपला युट्यूब चॅनलदेखील सबस्क्राईब करुन ठेवा.

युट्यूब चॅनल लिंक – https://marathimarket.in/youtube

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?