' EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड! – InMarathi

EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उद्योगविश्वात भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीयच आहे. भारतीय उद्योगविश्व म्हंटलं की आपल्यासमोर अंबानी परिवार, अदानी, महिंद्रा अशी नावं येतात. त्यांच्यापैकीच एक मोठं आणि तितकंच प्रतिष्ठित नाव म्हणजे रतन टाटा.

ऑटोमोबाइल, स्टील, किंवा खाद्यपदार्थ असो प्रत्येक क्षेत्रात टाटा यांनी त्यांचा उद्योग वाढवला आहेच शिवाय भारतालासुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात मान-मरातब मिळवून दिला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक व्हेइकल. अजूनही EV हा प्रकार तितकासा रूळलेला नसला तरी सध्या रस्त्यावर इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स दिसायला सुरुवात झाली आहे.

 

electric car IM

 

यात टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्याच आपल्याला सर्रास बघायला मिळत आहेत. पण नुकतीच टाटांनी एक शक्कल लढवली आहे. काय आहे हा जुगाड आणि भारतातील इलेक्ट्रिक कारच्या स्वप्नामध्ये काय आहे टाटांचे पुढचे पाऊल ? चला पाहुयात…

इलेक्ट्रिक कारसाठी टाटांचा ‘जुगाड’ :

टाटांनी इलेक्ट्रिक कार बनवण्याचे ठरवले आणि कोणतीही नवीन जागा खरेदी न करता किंवा कोणतीही नवीन इन्व्हेस्टमेंट न करता त्यांनी जुगाड केला. जुगाड असा की त्यांनी त्यांच्या Tata Motors Ltd कंपनीच्या फ्लॅगशिप प्लांटमधील न वापरलेले शॉप फ्लोअर पुन्हा तयार केले.

इथे कोणतीही फॅन्सी असेंब्ली लाइन उभी न करता अद्ययावत केले. आणखी एक शक्कल म्हणजे टाटांच्या Nexon SUV गाडीतील बॅटरी ही हाताने बसवली जाते फक्त आता तिथेच इलेक्ट्रिक बॅटरीची रिप्लेसमेंट केली गेली.

 

tata nexon IM

 

पेट्रोल मॉडेलसाठी डिझाइन केलेल्या Nexon SUV बॉडीला इलेक्ट्रिक वाहनात बदलून टाटांनी खरोखर कमी खर्चात एक उत्तम वाहन बाजारात आणले आहे.

इलेक्ट्रिक स्पर्धेत टाटांची जोरदार घोडदौड :

प्रोटोटाइप लॅब म्हणून चुकीचे समजू शकणाऱ्या या क्षेत्राने सुरुवातीला दिवसाला फक्त आठ एसयूव्ही बनवल्या. परंतु Nexon EV लाँच झाल्यापासून दोन वर्षांत मागणी वाढली आणि आता टाटा आता दिवसाला १०० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या बनवतात.

जरी त्यापैकी बरेच काही आता जवळच्या दुसर्‍या प्लांटमध्ये हाताळल्या जात असतील तरी भारताच्या ‘जुगाड’ या परंपरेला आकर्षित करणाऱ्या पद्धतीचा टाटांनीही वापर केला.

या विनम्र सुरुवातीसह – जुगाड म्हणजे थोडक्यात केलं काय तर काटकसरी पद्धत पण नवकल्पना आणि वर्कअराउंड्सचा संदर्भ असणारा प्रकार आणि हे वापरूनच टाटा देशाच्या नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटवर वर्चस्व गाजवते.

 

ratan tata IM

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटांची ‘ही’ स्वप्ने :

आगामी काळासाठी टाटा त्यांचे पॉवर कंपनी चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करत आहे. जॅग्वार, लँड रोव्हर यांचे डिझाइनमध्ये योगदान घेऊन तर टाटा केमिकल्स लिमिटेडची बॅटरी रिसायकलिंग आणि स्थानिक सेल निर्मितीसाठी मदत घेऊन जेव्हा टाटाने २०२० मध्ये ईव्ही उत्पादन सुरू केले तेव्हा बहुतेक भाग आयात केले गेले आहेत, पण आता ५० % पार्ट्स हे आता इन-हाऊस बनवले जाणार आहेत.

“आमची योजना प्रत्येक गोष्टीचे स्थानिकीकरण करण्याची आहे. चुंबक वगळता मोटरचे सर्व भाग पुढील काही वर्षांत स्थानिक पातळीवर तयार केले जातील. सेल वगळून, बॅटरी इन-हाउस बनविली जाईल आणि कंपनी स्वतःच्या बॅटरी व्यवस्थापन प्रणालीवर काम करत आहेत”, असे त्यांचे सीईओ गोयल सांगतात.

 

arving goel IM

टाटांच्या EV (Electric Vehicle) समोर आता ‘ही’ आव्हाने :

टाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असले तरी पुढे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.

२०३० पर्यंत देशात विकल्या जाणार्‍या सर्व कारपैकी ३०% कार इलेक्ट्रिक व्हाव्यात अशी सरकारची इच्छा आहे आणि ते उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांना आशादायी वाटत असले तरी व्यावसायिक ठिकाणी स्पर्धा सोपी नाही.

दक्षिण कोरियाच्या Hyundai Motor आणि Kia Motors या वर्षी भारतात ईव्हीची विक्री सुरू करण्याची योजना आखत आहेत, जरी त्यांची मॉडेल्स मोठी आणि जास्त किंमतीची असतील तरी काही प्रतिस्पर्ध्यांकडून गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायब्रीड्स लाँच करण्याची अपेक्षा देखील जास्त आहे.

 

hyundai and kia iM

 

यावेळी टाटा भारतीयांच्या मनात त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे स्थान कायम कसे ठेवते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?