' लॉटरीत या महिलेने वापरलीये अशी युक्ती, की महिन्याला मिळतायत ९.५ लाख – InMarathi

लॉटरीत या महिलेने वापरलीये अशी युक्ती, की महिन्याला मिळतायत ९.५ लाख

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉटरी ही काहींची आवड असते, काहींचा छंद असतो, तर काहींच्यासाठी व्यसन! अनेकजण लॉटरीपासून दूर राहणं पसंत करतात. मात्र लॉटरी या प्रकाराबद्दल काहीच माहित नाही अशी व्यक्ती सापडणं निव्वळ अशक्यच!

लॉटरी लागावी अशी अपेक्षाही अनेकजण करत असतात. एखाद्या लॉटरीमध्ये चांगलं मोठंथोरलं घबाड हाती लागावं आणि पुढचं आयुष्य सुकर व्हावं अशी अपेक्षा किंवा स्वप्नरंजन प्रत्येकानेच आयुष्यात एकदा तरी केलेलं असतं.

हेच स्वप्न जर सत्यात उतरलं तर? दार महिन्याला बक्कळ रक्कम हातात येईल अशी लॉटरी तुम्हाला लागली तर? नुसता विचार करूनच हरखून गेलात ना?

मात्र एका महिलेला चक्क अशीच एक दमदार लॉटरी लागली आहे. ज्यात तिला पुढील काही वर्षं दर महिन्याला रग्गड रक्कम मिळणार आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, ते समजून घेऊया.

विश्वासच बसत नाही…

 

lottery im

 

इंग्लंडमधील नॉटिंगहॅम शहरातील ही घटना आहे. एका ४० वर्षीय महिलेच्या आयुष्यात गतवर्षीच्या मार्च महिन्यात सुखाचा अविश्वसनीय वर्षाव झाला.

जोडीदार कर्क स्टीवन्स याच्यासोबत राहणारी ही महिला, एक लॉजिस्टिक्स फर्ममध्ये काम करते. तिला ज्यावेळी या लॉटरी संदर्भात फोन आला, त्यावेळी तिला यावर अजिबातच विश्वास बसत नव्हता. ती जे काही ऐकत होती, ते विश्वास बसावा असं नव्हतंच मुळी!

एका खास लॉटरी स्कीमच्या माध्यमातून तिची निवड करण्यात आली. ज्यानुसार तिला पुढील तीस वर्षं, दरमहा तब्बल १०,००० पाऊंड्स म्हणजेच जवळपास साडे नऊ लाख रुपये, इतकी मोठी रक्कम देण्यात येणार आहे.

लॉरा हॉयल असं तिचं नाव असून, तिला फोनवरून माहिती मिळत असताना या सगळ्या गोष्टींवर तिला अजिबात विश्वास बसत नव्हता. ‘सेट फॉर लाईफ’ असं या लॉटरीचं नाव होतं.

पाच आकडे आणि एक लाईफ बॉल अशा गोष्टी लॉटरी मार्फत काढण्यात आलेल्या गोष्टींशी जुळतात की नाही, यावर विजेता ठरवण्यात येणार होता. लॉराचं नशीब इतकं जोरावर होतं, की पाचही आकडे आणि लाईफ बॉल, अशा सगळ्याच गोष्टी नियतीने तिच्या पदरी दिल्या होत्या.

याचं फलित म्हणूनच, तिला ही अशी लॉटरी लागली. अशी ही मेगा लॉटरी लागणं, ही जवळपास अशक्य बाब आहे. म्हणूनच, तिला फोनवर याविषयी कळवण्यात आलं, तेव्हा तिचा कानांवर विश्वास बसत नव्हता.

असं उजळलं नशीब…

 

lottery im1

 

नॅशनल लॉटरी ॲपवरून लॉरा यांनी हे लॉटरीचं तिकीट काढलं होतं. या ॲपवर तिला आलेल्या नोटिफिकेशन मध्ये, तिला ही लॉटरी लागली असल्याचं तिला कळलं. मात्र त्यावर तिने पूर्णपणे विश्वास ठेवला नाही.

स्वतः खात्री करून घ्यावी या उद्देशाने तिने या ॲपशी निगडित ऑफिसला फोन केला. तिथल्या व्यक्तीशी बोलल्यावर, आपल्याला खरंच लॉटरी लागली आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी तिचं मन तयार होऊ लागलं. असं असूनही, तिच्या तिच्या कानांवर सुद्धा सुरुवातीला पूर्ण विश्वास बसला नव्हता.

तिच्या मनात पुसटशी सुद्धा शंका राहू नये, यासाठी त्या व्यक्तीने तिच्याशी योग्य संवाद साधला. ‘सेट फॉर लाईफ’ या खेळाची ती सर्वात भाग्यवान विजेती ठरली असल्याचं, त्याने तिला वारंवार सांगितलं अणि पटवून दिलं.

खरोखरच इतकी भाग्यवान ठरली असल्याचं कळल्यावर मात्र, तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मजेत जगतायत आयुष्य…

या लॉटरीने लॉरा आणि कर्कचं आयुष्य बदलून टाकलं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘बहुदा मी ही लॉटरी जिंकली आहे’, असं म्हणत शहारलेल्या अंगाने नॅशनल लॉटरीमध्ये फोन करणाऱ्या लॉराने खरोखर लॉटरी लागल्यानंतर नोकरी सोडली आहे.

भुताखेतांनी पछाडलेल्या, झपाटलेल्या जागा शोधणं, त्याविषयी माहिती मिळवणं हा तिचा छंद ती आता जोपासते आहे.

या जोडप्याने एक नवं घर सुद्धा घेतलं असून, त्यांच्या जीवनशैलीत मोठा फरक पडला आहे. कर्क सध्या मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील त्याचं पुढील शिक्षण घेण्यात व्यस्त आहे. एका अविश्वसनीय अशा या लॉटरीने ऐन चाळीशीतच लॉराचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?