' हिंदी Vs. प्रादेशिक भाषा या वादात भर घालतोय चिरंजीवींचा हा व्हायरल व्हिडिओ… – InMarathi

हिंदी Vs. प्रादेशिक भाषा या वादात भर घालतोय चिरंजीवींचा हा व्हायरल व्हिडिओ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटांत अनेक दाक्षिणात्य स्टार्सचं आगमन झालं आणि त्यांच्या लोकप्रियतेची एक लाटच आली. ही लाट आज पुषापर्यंत RRR पर्यंत ओसरलेली नाही. सध्याची परिस्थिती पहाता ही लाट नजीकच्या भविष्यात उतरेल अशी चिन्हं नाहीत. त्या काळात साऊथच्या चित्रपटांनी देशभरातल्या तरुणांना अक्षरश: वेड लावलं होतं.

त्याकाळात सबटायटल्ससहित चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा नव्हती. सर्रास हिंदीत डब करुन प्रदर्शित होणंही रुळलं नव्हतं.

एखाद दोन चित्रपट डब होत असत. तरिही लोक भाषा समजत नसतानाही हे चित्रपट त्यातल्या सिनेमोटोग्राफ़ीसाठी (सिव्हन), अभिनयासाठी (रोजा, बॉम्बे), दिग्दर्शनासाठी (प्रियदर्शन, मणीरत्नम) बघत असत.

 

south films IM

 

म्हणूनच त्या काळात ज्या दाक्षिणात्य स्टार्सनी हिंदी चित्रपट बघणार्‍या बॉलिवुड प्रेक्षकांना वेड लावलं ते कौतुकास्पदच होतं. प्रेक्षकांना भाषेचा अडसर या स्टार्सना डोक्यावर घेताना आलेला नाही मात्र अलिकडेच एक दुर्दैवी वाद या दोन इंडस्ट्रीत पेटला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी गुण्यागोविंदानं चाललेल्या बॉलिवुड आणि टॉलिवुड या दोन इंडस्ट्रीत आज मात्र हिंदी विरुध्द दाक्षिणात्य भाषा हा वाद उफाळून आला आहे. योगायोग असा की नव्वदीच्या दशकातला बॉलिवुड सुपरस्टार अजय देवगण याच्या एका वक्तव्यानं या वादाच्या ठिणगीला हवा मिळाली आहे.

तुम्हाला माहितच असेल की कीच्चा सुदीपनं केलेल्या एका शेरेबाजीनंतर अजय देवगणनं त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा असल्याचं ठणकावून सांगितलं.

या एका विधानाने हा देश विशेषत: आजच्या आधुनिक भारतातला सोशल मिडियावरचा संवेदनशिल देश पेटून उठला आणि थेट भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या कालखंडात जाऊन पोहोचला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी हाच वाद देशभरात पेटला होता.

 

 

भारताची अधिकृत राष्ट्रीय भाषा कोणती असावी? यावर हिंदी हे उत्तर आल्यानंतर दाक्षिणात्य जनतेने याचा कडाडून विरोध केला. हिंदी ही भारतातील काही प्रांतात बोलली जाणारी इतर भाषांप्रमाणेच एक प्रादेशिक भाषा असल्याने तिला माथी मारू नये असं या सगळ्यांचं मत होतं.

अखेर भारताला त्याची अशी अधिकृत भाषा लाभली नसली तरिहि अनऑफ़िशियली हिंदी हीच भारताची भाषा बनली. भारताबाहेर या देशाचं भाषिक प्रतिनिधित्व करणारी हिंदी भाषाच आहे. अनेक सामान्य भारतीयांना कल्पनाही नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.

अजय देवगण आणि किच्चा सुदिप यांच्यातला सोशल मिडियावरचा युध्दाचा सिनेमा सामंजस्याने दी एण्ड झाला असला तरिही आता पुन्हा एकदा याची चर्चा होऊ लागली आहे आणि यावेळेस या चर्चेचं कारण आहे, नव्वदीच्या दशकातला दाक्षिणात्य स्टार चिरंजीवी.

 

chiranjeevi IM

 

त्याचा एक जुना व्हिडिओ अलिकडे जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधे त्यानं एक जुनी घटना सांगितलेली आहे. १९८९ सालातली ही घटना आहे. चिरंजीवीच्या रुद्रवीणाला नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला होता आणि तो स्विकारण्यासाठी चिरंजीवी दिल्लीत गेलेला होता.

मुख्य सोहळ्याच्या पूर्वसंध्येला या सर्व पुरस्कारप्राप्त कलाकांसाठी एक सन्मान भोजन आयोजित करण्यात आलं होतं. या सोहळ्यात भारतीय चित्रपटांचं सेलिब्रेशन केलं जाणार होतं. या समारंभात भारतीय चित्रपट सृष्टीत काम करणारे विविध भाषिक मान्यवर सहभागी होणार होते.

चिरंजीवी पुढे सांगतात की याठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान असणार्‍यांच्या सन्मानार्थ एक भिंत छायाचित्रांनी सजविण्यात आली होती. या भिंती समोरुन जाताना चिरंजीवीच्या हे लक्षात आलं की एमजीआर, जयललीता आणि प्रेम नजीर यांचीच केवळ छायाचित्रं लावण्यात आली होती.

 

mgr and jaylalitha IM

 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील राज कुमार ते शिवाजी गणेशन अशा अनेक दिग्गजांना अनुल्लेखानं मारलं होतं आणि हे त्याला अत्यंत अपमानास्पद वाटलं. हिंदी सिनेमाला इंडियन सिनेमा असं संबोधताना भारतात इतर भाषेत बनलेल्या चित्रपटांना प्रादेशिक चित्रपट या वर्गवारीत समाविष्ट केलेलं होतं.

हे कमी म्हणून की काय या समारंभातही पूर्ण प्रकाश झोत हिंदी चित्रपटात काम करणार्‍यांवरच होता आणि इतर भाषिक कलाकारांची दखलही घेतली जात नव्हती. हे चित्र अत्यंत क्लेषदायक होतं. मात्र आता पूर्वीचा काळ बदलला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजमौली यांनी बाहुबलीलाच्या माध्यमातून ही प्रादेशिकतेची भिंत तोडली आहे. हिंदी चित्रपट आणि इतर चित्रपट ही वर्गवारी या चित्रपटांच्या दणकून झालेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं पुसून टाकली आहे.

चिरंजीवीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतोय, आणि हिंदी विरुद्ध इतर प्रादेशिक भाषा अशा लढाईत आता आणखीनच भर पडली आहे.

 

 

खरंतर बाहुबलीसारख्या सिनेमाने भाषेची बंधनं तोडून पार जगभरात भारतीय सिनेसृष्टिचे नाव मोठे केले, पण इथे मात्र हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा यावरून चाललेला गदारोळ हा फार दुखद आहे.

सिनेमा कोणत्याही भाषेचा असो प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाशिवाय तो अपूर्णच असतो हे प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीने ध्यानात ठेवलं पाहिजे.

आज साऊथच्या सिनेमांना सुगीचे दिवस आले आहेत उद्या हिंदी सिनेमांना येतील, हे शेवटी कालचक्र आहे, त्यामुळे आज जो वर आहे तो उद्या खाली नक्की जाणार हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहीजे आणि या वादांपासून दूर राहिलं पाहिजे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?