'जाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

जाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही कधीतरी कुठेना कुठे पॉवर ऑफ अटर्नी विषयी नक्कीच ऐकले असेल. त्याविषयी वेगवेगळे प्रश्न सुद्धा तुमच्या मनात आले असतील, की काय असते पॉवर ऑफ अटर्नी? किती प्रकारची असते पॉवर ऑफ अटर्नी? कोण तयार करू शकते पॉवर ऑफ अटर्नी वगैरे वगैरे!

चला मग या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनात पॉवर ऑफ अटर्नी विषयी कोणतीच शंका राहणार नाही.

power-of-attorney-marathipizza01
istockphoto.com

 

१. काय आहे पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नी हा एक असा लिखित दस्तावेज असतो जो तयार करणाऱ्या व्यक्तीला ‘प्रिंसिपल’ म्हटले जाते आणि ज्याच्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी  बनवली जाते त्याला ‘एजंट’ म्हटले जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, पॉवर ऑफ अटर्नी एजंटला प्रिंसिपलची कामे किंवा अधिकार हस्तांतरित करते. एक विशेष गोष्ट अशी आहे की, पॉवर ऑफ अटर्नी तयार झाल्यानंतर एक एजंट ती सर्व कामे करू शकतो आणि सर्व अधिकार वापरू शकतो जे प्रिंसिपल वापरायचा.

 

२. पॉवर ऑफ अटर्नी किती प्रकारची असते?

पॉवर ऑफ अटर्नी दोन प्रकारची असते, ज्यामध्ये पहिली ‘पॉवर ऑफ अटर्नी जनरल’ आणि दुसरी ‘पॉवर ऑफ अटर्नी स्पेशल’ बनवली जाते. पॉवर ऑफ अटर्नी जनरल नुसार एजंटला प्रिंसिपलची जवळपास सगळी कामे करण्याचा हक्क कायद्यानुसार प्राप्त होतो आणि पॉवर ऑफ अटर्नी स्पेशलनुसार एजंटला प्रिंसिपलची काही ठराविक विशेष कामे करण्याचा हक्क कायद्यानुसार प्राप्त होतो.

 

३. पॉवर ऑफ अटर्नी कोणकोणत्या कामांसाठी बनवली जाते?

पॉवर ऑफ अटर्नी ही विशेषत: करार करण्यासाठी, अधिकार हस्तांतरित करण्यासाठी, अस्थिर आणि स्थावर असलेल्या मालमत्तेशी निगडीत कामासाठी, आयकर परतावा करण्यासाठी तसेच इतर व्यक्तींशी कायदेशीररित्या व्यवहार करण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी बनवली जाते.

power-of-attorney-marathipizza02
contractstore.com

 

४. पॉवर ऑफ अटर्नी कोणाच्या हितासाठी बनवली जाते?

पॉवर ऑफ अटर्नी हा खूप महत्त्वाचा सरकारी कागद असतो. याच कारणामुळे पॉवर ऑफ अटर्नी मधून एजंट निवडण्याआधी खूप काळजी घेणे गरजेचे आहे, कारण पॉवर ऑफ अटर्नी बनवल्यानंतर एजंट जे काही काम करेल त्याला प्रिंसिपल पूर्णपणे जबाबदार आणि बांधील राहील. त्यामुळे एजंट म्हणून प्रत्येकवेळी एका अश्या व्यक्तीला नियुक्त करावे जो पूर्णपणे विश्वासाच्या पात्र असण्याबरोबरच प्रिंसिपलची कामे चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम असेल.

 

५. कशी बनवायची पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नीची कार्यवाही १०० रुपयाच्या नॉन-जुडिशियल स्टॅम्प पेपर वर केली जाते आणि याला नोटरी करणे आवश्यक आहे. यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी बनवणाऱ्या व्यक्तीची सही, स्वीकार करणाऱ्याची सही आणि दोन साक्षीदारांची आवश्यकता असते.

 

६. कधीपर्यंत वैध असते पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नीची वैधता तेव्हा पर्यंत असते जेव्हापर्यंत ती रद्द केले जात नाही किंवा ती स्वतः रद्द होत नाही, परंतु स्थावर संपत्तीच्या हस्तांतरण संबंधात बनवण्यात आलेली पॉवर ऑफ अटर्नीची वैधता एका वर्षाचीच असते.

power-of-attorney-marathipizza03
legaldesk.com

 

७. कधी रद्द होते पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नी प्रिंसिपल कडून रद्द केल्यावर, प्रिंसिपलचा मृत्यू झाल्यावर, दिवाळखोरी अथवा मानसिक संतुलन बिघडण्याच्या स्थितीमध्ये, ज्या कार्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आहे ते कार्य संपल्यानंतर, प्रिंसिपल आणि एजंटच्या सहमतीने किंवा एजंटने अधिकार सोडल्यावर रद्द होते.

काय मंडळी लक्षात आलं का हे गुंतागुंतीचं वाटणारं प्रकरण किती सोप्पं आहे ते! चला तर मग इतरांसोबत ही माहिती शेअर करा आणि त्यांच्या देखील ज्ञानात भर टाका.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

7 thoughts on “जाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

 • November 29, 2018 at 3:38 pm
  Permalink

  पॉवर ऑफ अटर्नी प्रिंसिपल

  Reply
  • August 1, 2019 at 7:27 pm
   Permalink

   जर accused च्या नावावर गाडी असून गाडी ही कोर्टच्या ताब्यात असेल आणि accused जेल मध्ये असेल तर त्या गाडीची पॉवर ऑफ अटर्नी ही वडिलांना दिली असेल तर मे.कोर्टनी गाडी पॉवर ऑफ अटर्नी (वडिलांना) मिळणार नाही असे सांगितले आहे तर काय करावे लागेल…
   मे. कोर्टला काय सांगावे लागेल किंवा अशी कोणती Caselaw आहे की गाडी पॉवर ऑफ अटर्नी केलेल्या व्यक्तीला मिळेल
   Replay-sarveshnikam111@gmail.com

   Reply
 • February 19, 2019 at 4:51 am
  Permalink

  Nice information telling you. Increasing knowledge of low. This information tell you in Marathi language Very good. Because this knowledge send to Common man. Thanks a lot.

  Reply
 • March 21, 2019 at 6:46 pm
  Permalink

  Thanks. for very useful information

  Reply
 • March 24, 2019 at 10:06 pm
  Permalink

  How cancel power of attorney? I f X man give power of attorney to Y. That p of attorney is doubtful .y isnot help to X how can cancel X that s passed of attorney? What is procger of in this matter?

  Reply
 • July 23, 2019 at 6:00 pm
  Permalink

  जर एखाद्या जागा मालकाने पाॕवर आॕफ अटाॕर्नी बिल्डरला दिली आणि जमिनीचे हस्तांतरण ( conveyance deed ) होण्याच्या आधी मुळ जागामालक मृत पावला तर पाॕवर आॕफ अटाॕर्नी आपोआप संपुष्टात येते का ?

  की लॕड डेव्हलपमेंट अॕक्ट प्रमाणे ती conveyance deed होईपर्यत अस्तित्वात असते ?

  असे असेल तर असा केस लाॕ आहे का ?

  Reply
 • October 2, 2019 at 2:53 am
  Permalink

  पॉवर ऑफ attorny कोण रद्द करू शकतो

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?