' धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले; मुंबई पोलीस आता 'हा आवाज' करणार कमी

धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले; मुंबई पोलीस आता ‘हा आवाज’ करणार कमी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याच्या मुद्द्याचा वाद गेले बरेच दिवस पेटलाय. मशिदींमधून भोंगे उतरवले गेले नाहीत तर मनसेचे सैनिक मशिदींसमोर लाऊडस्पिकरवर मोठ्यांदा ‘हनुमान चालीसा’ लावतील असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात दिला होता. इतक्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून पुन्हा एकदा आपला हाच मुद्दा त्यांनी लावून धरला.

 

 

 

त्यांच्या या भाषणाचे संमिश्र पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांना अटक होईल की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. या सगळ्यात मशिदींमध्ये वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजाचा लोकांना त्रास होतो ही गोष्ट मात्र खरीच आहे. कित्येकदा या आवाजामुळे पहाटे लोकांची झोपमोड होते. उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरून भोंगे उतरवले गेलेत.

 

raj thackrey 3 IM

 

महाराष्ट्रात धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले जाणार की नाहीत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असताना मुंबई पोलीस आता वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतही एक महत्त्वाचा निर्णय घेत आहेत.

मुंबईसारख्या ठिकाणी वाहनांमुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होतं. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिलेल्या सूचनांनुसार मोटार वाहनांची निर्मिती करणाऱ्यांना वाहनांच्या हॉर्न्सच्या आवाजाची मर्यादा कमी करा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. मुंबई पोलीस यासंदर्भात नेमकी कुठली पावलं उचलत आहेत याविषयी जाणून घेऊ.

मुंबईत प्रचंड ट्रॅफीक असतं. आपल्या वाहनाला गाड्यांनी खचाखच भरलेल्या ट्रॅफीकमधून वाट काढता यावी म्हणून वाहनचालक जोरजोरात हॉर्न्स वाजवतात. हे केल्याने वाहनचालकांना पुढे जाणं काहीसं सोपं होत असेलही. पण त्यामुळे होणाऱ्या कलकलाटाचा सगळ्यांनाच प्रचंड त्रास होतो.

 

mumbai traffic inmarathi

 

हॉर्नच्या आवाजांनी कानठळ्या बसणारच हे जवळपास आपण सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं. पण धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या वादाच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी मोटार वाहनांची निर्मीती करणाऱ्यांना वाहनांच्या हॉर्न्सच्या आवाजाच्या मर्यादा कमी करा अशी विनंती केली आहे. वाहनांच्या हॉर्न्सचे आवाज सध्या किती मोठे आहेत यावर प्रकाश टाकून याविषयी एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.

सध्या वाहनांच्या हॉर्न्सचे आवाज ९२ ते ११२ डेसिबल्सच्या रेंजमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं हे उल्लंघन आहे असं तो अधिकारी म्हणाला. तो म्हणाला, “मोटार निर्मिती करणाऱ्या बऱ्याच जणांबरोबर आम्ही इतक्यातच मिटिंग घेतली आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांना वाहनांच्या हॉर्न्सचे आवाज कमी करायला सांगितले.”

 

car horn drive InMarathi

इअरफोन्स वापरण्याचे हे घातक ‘धोके’ वाचलेत, तर इयरफोन वापरणं सोडाल..

अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला… जाणून घ्या

हे महानगर ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही मोटार विक्रेत्यांसोबतही मिटिंग घेणार आहोत अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली. शहरातले पोलीस जोराजोराने आवाज करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करत आहेत. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे गोंगाट होतोय का यावरही पाळत ठेवली जाईल, असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं.

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचे आपले प्रयत्न मुंबई पोलिसांनी केवळ मोटार वाहनांपुरतेच मर्यादित ठेवले नाहीत. मुंबई पोलीस इतक्यातच बऱ्याच बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनाही भेटले. बांधकामामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध घाला. लोकांचे रविवार गोंगाटमुक्त जाऊदेत, असं त्यांनी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना सांगितलं आहे.

 

mumbai police inmarathi

 

भोंग्याच्या वादाच्या निमित्ताने ध्वनी प्रदूषणाच्या एकूणच समस्येकडे गांभीर्याने पाहिलं जातंय ही बाब नक्कीच आशादायी आहे. वाहनांच्या हॉर्न्सच्या आवाजामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यात मुंबई पोलिसांना यश यावं अशी आशा करूया.

आणखी कशा कशामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण होतं हेही विचारात घेतलं तर ते जनतेच्या दृष्टीने हिताचंच असेल. आपल्याकडूनही कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची वैयक्तिक पातळीवर आपण काळजी घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?