' केंद्रात सरकार आलं तर PM म्हणून या दोघांपैकी कोण चांगलं? शिवसेना खासदाराचं उत्तर!

केंद्रात सरकार आलं तर PM म्हणून या दोघांपैकी कोण चांगलं? शिवसेना खासदाराचं उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवारांचा किती दबदबा आहे याविषयी वेगळं सांगायला नको. ते कधी कुठली खेळी खेळतील आणि जिंकतील हे सांगता येत नाही.

खुद्द पंतप्रधान मोदीही ज्यांना आपले राजकीय गुरू मानतात ते शरद पवार किती चलाखीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकतात याचा प्रयत्य आपल्याला गेल्या निवडणुकीतून आलाच. असं असलं तरी शरद पवारांचे चाहते असणारे आणि शरद पवार अजिबात न आवडणारे असे दोन गट आपल्याला दिसतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांनी आजवर केलेल्या राजकीय डावपेचांमुळे अनेकांना ते अविश्वासार्ह वाटतात. बारामतीत शरद पवारांनी कमालीच्या सुधारणा केल्या आहेत. शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असं म्हटलं गेलं. उद्धवजींच्या बोलण्यामुळे काही लोकांना ते अगदी आपलेसे वाटले, त्यांचे आवडते मुख्यमंत्री झाले.

तर आयत्या वेळी त्यांनी भाजपाला दगा दिला असं म्हणत काहींनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्यावर आपली नापसंती दर्शवली. पण अखेरीस शरद पवारांच्या हुशारीने आखलेल्या रणनीतीतून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं.

 

mahavikas aghadi inmarathi

 

राजकारणात इतकी उलथापालथ घडवून आणण्याचं सामर्थ्य असलेल्या शरद पवारांच्या बाबतीत एक कुतूहल मात्र लोकांना कायम वाटत आलेलं आहे. इतकी वर्षं राजकारणात सक्रिय असूनही शरद पवार अजूनपर्यंत पंतप्रधान कसे झाले नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतो. शरद पवारांच्या विरोधकांना हे त्यांचं राजकारणातलं मोठं अपयश वाटतं.

इतक्यातच ‘सकाळ डिजिटल’ने ‘Sarkarnama Open Mic Challenge’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांना या कार्यक्रमादरम्यान त्यांना “केंद्रामध्ये तुमची सत्ता आली तर पंतप्रधान म्हणून शरद पवार चांगले असतील की उद्धव ठाकरे?” असा प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना खासदारांनी यावर नेमकं काय उत्तर दिलं? जाणून घेऊ.

‘सकाळ डिजिटल’ने आयोजित केलेल्या ‘Sarkarnama Open Mic Challenge’ या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. २०१४ ते २०१९ ही श्रीकांत शिंदे यांची खासदार म्हणून पहिली टर्म होती. ही श्रीकांत शिंदे यांची दुसरी टर्म आहे.

 

shrikant shinde IM

 

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी श्रीकांत शिंदे यांना “दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला संसदेत काय फरक वाटतो?”, असा प्रश्न विचारला. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “२०१४ मध्ये सगळंच नवीन होतं. २०१४ चा सुरुवातीचा काळ सगळ्या गोष्टी समजून घेण्यात, शिकण्यात गेला. त्यावेळी निवडून आलेल्या नेत्यांच्या भाषणांतून खूप काही शिकण्यासारखं होतं. २०१९ मध्ये नवी पिढी खूप मोठ्या प्रमाणावर निवडून आली आहे. त्यांच्याकडूनही खूप शिकण्यासारखं आहे. आधीचा अनुभव वेगळा होता, आताचा वेगळा आहे.”, असं ते म्हणाले.

यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी “केंद्रामध्ये तुमची सत्ता आली तर पंतप्रधान म्हणून शरद पवार चांगले असतील की उद्धव ठाकरे?”, असा पेचात टाकणारा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला. पण त्यावर श्रीकांत शिंदेंनी अजिबात न कचरता “अर्थातच उद्धव ठाकरे” असं उत्तर दिलं.

 

sharad pawar uddhav thackrey IM

 

हे झाले राजकीय प्रश्न आणि त्यांच्यावरची उत्तरं. पण श्रीकांत शिंदे यांना या कार्यक्रमात एक खासगी प्रश्नही विचारला गेला.

राज्यातील सत्ताधारी पक्षातील मित्र काँग्रेस नेते आमदार धीरज देशमुख यांनी “तुमची आवडती अभिनेत्री कोण?”, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यांच्या या प्रश्नावर एकच हशा पिकला. “बऱ्याच अभिनेत्री आवडत्या आहेत.”, असं उत्तर त्यावर श्रीकांत शिंदे यांनी दिलं.

या प्रश्नोत्तरांनी कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. इतक्या कमी वेळातही श्रीकांत शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचा महत्त्वाचा मुद्दा सुटला नाही.

पंतप्रधान म्हणून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली पसंती मुख्यमंत्र्यांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेला मत देणाऱ्या तमाम नागरिकांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणणारी आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?