' मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा – InMarathi

मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : कौस्तुभ कस्तुरे (इतिहास अभ्यासक)

===

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं:

महेश मांजरेकर नवा चित्रपट घेऊन येतायत म्हटल्यावर बहुतांशी जण एकदम हर्षभरीत होऊन सालाबादप्रमाणे “त्या” सात नावांची (एखाद्या वृत्तपत्राची बातमी वाटली ना? असो) पोस्ट फिरवायला लागतील, म्हणून आधीच हा लहानसा शैक्षणिक धडा –

१) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विठ्ठल पिलदेव अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्दी हिलाल ६) विठोजी शिंदे आणि ७) सरनौबत कुड्तोजी उर्फ प्रतापराव गुजर.

 

veer daudle saat IM

 

ही सात नावे, पैकी पहिली सहा नावे नेसरीच्या खिंडीत प्रतापरावांसोबत धारातीर्थी पडल्याचा कसलाही पुरावा नाही. किंबहुना यातलं एक नाव, विठोजी शिंदे हे सर्जखानाशी लढताना आधीच मारले गेले होते, ते नेसरीत असणं केवळ आणि केवळ अशक्य आहे.

मग ही सहा नावे खोटी आहेत का?

अजिबात नाही. ही नावे, या व्यक्ती खरंच प्रतापराव गुजरांसोबत सैन्यात होत्या. जयराम गंभीरराव पिंड्ये नावाच्या शिवरायांच्या समकालीन कवीने पर्णालपर्वत ग्रहणाख्यान नावाचं एक काव्य रचलं आहे ज्यात कोंडाजी-अण्णाजी दत्तोंनी पन्हाळगड जिंकून घेतला ती मुख्य हकीकत आहे.

या हकीकतीनंतर, जेव्हा पन्हाळा हातचा गेला हे पाहून आदिलशहाने अब्दूलकरीम बहलोलखानास महाराजांवर पाठवलं, आणि वाटेतच उमराणीला प्रतापरावांनी बहलोलचा पराभव केला तीही हकीकत दिली आहे. वर उल्लेखलेले सहाही जण या युद्धात प्रतापराव गुजरांसोबत असल्याचा या काव्यात उल्लेख आहे.

 

battle of nesari IM

 

उमराणीला हाती आलेला बहलोल सोडून दिला म्हणून महाराज वैतागले, आणि नंतर नेसरीचा प्रसंग घडला आदि जयरामाने काहीही दिलेलं नाही.

पण कोणीतरी उगाच या सहा मुख्य सरदारांना नेसरीच्या प्रसंगाशी जोडून अफवा उठवली जी वाऱ्यावर वेगाने पसरते आहे. प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

तेव्हा, कोणी हा मेसेज पुन्हा पसरवल्यास त्याला सत्य सांगुया. पुराव्यांवर आधारित इतिहासावरच विश्वास ठेवूया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?