' खरं वाटणार नाही पण भारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज अजूनही कायम आहेत – InMarathi

खरं वाटणार नाही पण भारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज अजूनही कायम आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अनुप कुंभारकर

===

“भारत हा सापांचा आणि गारुड्यांचा देश आहे” हा गमतीशीर गैरसमज आजही अनेक पाश्चात्य देशांमधे आहे. तसेच पाश्चात्य देशांबद्दल काही गैरसमज भारतीयांमधेसुद्धा आहेत.

 

snake-and-garudi-inmarathi

 

अमेरिकेबद्दल असेच ३ फार मोठे गैरसमज आपल्या सर्वांच्या मनात आहेत. हे गैरसमज इतके दृढ आहेत की वाचून आश्चर्य वाटेल.

चला तर बघूया काय आहेत हे गैरसमज –

१ – अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला

आपल्या शाळांमधे हे बिनधोक शिकवलं जातंय की ख्रिस्तोफर कोलंबस ह्या spanish खलाश्याने अमेरिकेचा शोध लावला. पण हे पूर्णपणे चूक आहे !

 

Columbus portrait marathipizza

स्त्रोत

अमेरिकेचा शोध (हा “शोध” लागण्याआधी तिथे red indians ही जमात रहात होती, हे तर आपल्याला माहित आहेच !) John Cabot ह्या इंग्लंडच्या खलाश्याने लावला. पण वसाहतवादाच्या विरुद्ध अमेरिकेचा इंग्लंडशी बराच काळ संघर्ष राहिल्याने अमेरिकेने Cabot ला दुर्लक्षित करून कोलंबसला भरपूर प्रसिद्धी दिली… आणि इतिहासात गैरसमज पसरत गेला !

कोलंबस, त्याच्या प्रसिद्ध ४ सफरींच्या दरम्यान, अनेक Caribbean बेटांवर पोहोचला खरा. पण त्यातील एकही किनारा सध्याच्या USA चा नव्हता !

 

२ – अमेरिकेत निवडणुकीद्वारे सरळ सरळ “राष्ट्राध्यक्ष” निवडला जातो

हा probably सर्वात मोठा गैरसमज आहे. पण हे अर्धसत्य आहे.

हो – मतपत्रिकेवर इच्छुक राष्ट्राध्यक्षच असतात. पण मत सरळ सरळ राष्ट्राध्यक्ष पदाच्या इच्छुकांना मिळत नाही – तर नॉमिनीला (ज्याला Elector म्हणतात) जातं. सर्वात जास्त मत मिळालेले हे नॉमिनीज जिंकतात आणि मग सर्व नॉमिनीज मिळून त्यांचा राष्ट्राध्यक्ष निवडतात.

ह्या सिस्टीमला Electoral College म्हणतात.

सन २००० च्या निवडणुकींमधे बुश ना अल गोरपेक्षा कमी मतं मिळाली होती – पण त्यांचे नॉमिनीज जास्त निवडून आल्याने ते राष्ट्राध्यक्ष झाले होते.

 

us-election-2000-inmarathi

 

थोडक्यात – राष्ट्रपती होण्यास इच्छुक व्यक्तीला अक्ख्या देशातील जनतेचं बहुमत नकोय – निवडून आलेल्या नॉमिनीजचं हवंय !

३ – अमेरिका ही “द्विपक्षीय लोकशाही” आहे !

“भारतात अमेरिकेसारखीच द्विपक्षीय पद्धत रुजावी” हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. आपल्याकडे एक सार्वत्रिक गैरसमज आहे की अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असे दोनच पक्ष आहे.

पण… 🙂 …वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे :

अमेरिकेतील विवीध पक्षांचे चिन्ह :

 

us-political-parties-inmarathi

 

अर्थात, हे खरं आहे की अमेरिकेत दोनच पक्षांचं प्रभुत्व आहे. पण त्यामागे ह्या पक्षांचा मोठा पसारा, भरपूर फंड्स आणि एकच-विजेता-सरकार-बनवेल अशी सिस्टीम हे कारण आहे. “द्विपक्षीय पद्धत” असं काही तिथे अस्तित्वात नाहीये. अमेरिकासुद्धा बहुपक्षीयच आहे !

मोठेच गैरसमज आहेत नाही !

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?