' यूपीवर आधी ताशेरे ओढले आता कौतुक; राज ठाकरेंच्या बदललेल्या मतांमागची कारणं – InMarathi

यूपीवर आधी ताशेरे ओढले आता कौतुक; राज ठाकरेंच्या बदललेल्या मतांमागची कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली दोन वर्ष आपण अनेक गोष्टी मिस करत होतो, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे, मोकळेपणाने फिरणे, बाहेरची खादाडी यासारख्या गोष्टींना आपण मुकले होतो, मात्र जसे निर्बंध कमी केले तसे आपोआप सगळ्या गोष्टी रुळावर आल्या आहेत. याचबरोबरीने महाराष्ट्रातील तमाम जनता एक गोष्ट मिस करत होती ती म्हणजे राज ठाकरे यांचे भाषण…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राज ठाकरे यांच्या भाषणाकडे तमाम जनता आणि मीडिया या दोघांचे लक्ष लागून असते. यंदाच्या गुढीपाडवाच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या होम पीचवर तब्बल दोन वर्षांनी भाषण केले, त्यानंतर ठाण्यात सभा घेतली आणि नुकतंच त्यांनी औरंगाबाद येथे सभा घेतली. या तिन्ही सभांना गर्दी तर होतीच मात्र सभा गाजल्या त्या अनेक मुद्यांनी…

 

raj thackrey featured IM

 

मशिदीवरील भोंगे, राष्ट्रवादीवर टीका आणि एक मुद्दा ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या तो म्हणजे उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे कौतुक.

ज्या उत्तर प्रदेशच्या जनतेच्या विरोधात ज्यांनी कधीकाळी टीका केली होती आज त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहे यामुळे सगळ्यांना एक प्रकारचा आश्चर्याचा धक्का बसला आहे, आजच्या लेखात आपण यूपीत झालेल्या विकासाबद्दल जाणून घेणार आहोत…

उत्तर प्रदेश म्हंटल की आपल्या समोर प्रतिमा उभी राहते ती म्हणजे गंगेचे खोरे, बकाल शहरं, अविकसित खेडी, शिक्षणाचा अभाव आणि गुंडाराज. हिंदी सिनेमावाल्यांनी देखील अशाच प्रकारचे वातावरण उभे केलेले आहे मात्र योगी सत्तेत आल्यापासून हे चित्र बदलले आहे.

उत्तर प्रदेशाला तसा खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, वेगवेगळ्या धर्माचाही धार्मिक स्थळे इथे, तसेच गंगेमुळे हा सुपीक प्रदेश आहे. अशा या प्रदेशात योगी सत्तेत आल्यामुळे खाली बदल झाले आहेत. ऑप इंडियाने केलेल्या सर्व्हेनुसार खालील मुद्दे बघुयात

 

Varanasi Uttar Pradesh InMarathi

व्यवसाय, अर्थव्यवस्था रोजगार :

अनेक वर्ष उत्तर प्रदेश भ्रष्टाचार, गैरव्यवहार यात अडकला होता. ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांच्या सर्व्हेनुसार अखिलेश यादव यांचे सरकार असताना त्यांनी ९७००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराला परवानगी दिली आणि राज्य अडचणीत आले. त्यामुळे राज्याला गुंतवणुकीचा अभाव आणि औद्यगिक प्रगतीला खुंट बसला होता.

 

investment im

 

गेल्या काही वर्षांत मात्र ही परिस्थिती बदलेली आहे. सरकारने आपल्या योजनांनमध्ये अनेक बदल केले आहेत, प्रामुख्याने गुंतवणुकीच्या बाबतीतले नियम बदलून अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. मायक्रोसॉफ्ट, ब्राह्मोस, ब्रिटानिया यासारख्या कंपन्यांनी आपले मुख्यतळ या राज्यात वसवले आहेत. तसेच ५ लाखांची रोजगार निर्मिती दरवर्षी होत आहे.

उत्तर प्रदेशातून ८९००० कोटीहून अधिकची निर्यात झाल्याचे सांगितले जात आहे. यात अन्न प्रक्रिया, हस्तकला, कपडे आणि कार्पेट या गोष्टींमध्ये राज्य अग्रेसर आहे असे नमूद केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पायाभूत विकासावर मोठा भर दिला गेला आहे.

विविध योजना :

योगींनी सत्तेत आल्यापासून सांगितले आहे की समाजातीलआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या ४२ लाख लोकांना घरे उपलब्ध करून दिली आहेत. कोव्हीड लॉकडाउनच्या काळात जे मजूर स्थलांतरित झाले होते त्यांच्यासाठी उपजीविकेची साधने निर्माण करून दिली आहेत. तसेच शेतमजूर वर्ग, रस्त्यावरील विक्रेते यांना ५०० रुपये भत्ता सुरु केला आहे.

 

youth im

 

योगी सरकारने वृद्धमंडळींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ६७० कोटी वेगळे ठेवले आहेत. केन्द्र आणि राज्य सरकार हे समान असल्याने केंद्रातील ४२ योजना राज्यात यशस्वीपणे राबवल्या गेल्या आहेत. योगी सरकारने मुलींसाठी विशेष योजना सुरु केली आहे जिचं  नाव आहे कन्या सुमंगल ज्यात मुलीच्या जन्मापासून ते पदवीपर्यंत १५००० रुपये देण्यात येणार आहे.

गुंडाच्या मुसक्या आवळल्या :

यूपीमधील गुंडगिरीचे किस्से आजवर आपण ऐकत आलो आहोत. वाढती गुन्हेगारी हा मुद्दा गेली अनेक वर्ष यूपीमध्ये गाजत होता. राजकारणी मंडळींचा वरदहस्त असलेले अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक समाजात वावरत होते. मात्र NCRB च्या मार्च २०२१ च्या अहवालानुसार यूपीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे.

सरकारने कडक कायदे करून त्यावर अंमलबजावणी केली असून प्रशासकीय आणि जागरूकता निर्माण करणारे प्रकल्प राबवले आहेत. पोलिसांच्या बदलीवरून जे आपले राजकरण चाललेले आहे ते बघता यूपीमध्ये सकारात्मक चित्र दिसून येत आहे. त्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणली आहे, तसेच गुंड माफिया मंडळींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

yogi adityanath inmarathi

 

NCRB च्या डेटानुसार २०१८ साली  गंभीर गुन्ह्यांचा ६५,१५५ केसेस होत्या ज्या २०२० साली ५१,९८३ इतक्या होत्या तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले दिसून आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार २०२० २१  चा यूपीचा GDP हा १९.४८ लाखांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल आता यूपीचा नंबर लागत आहे. आज यूपीमध्ये रस्ते वाहतूक सुधारताना दिसून येत आहे. अनेक एक्सप्रेस हायवेंचे काम सुरु आहे. पर्यटनावर विशेष लक्ष दिले जात आहे.

एकूणच यूपीमधील परिस्थिती बदलत चालली आहे हे या गोष्टींमधून दिसून येत आहे, मोदी आणि योगी या जोडगळीने जे विकासाची स्वप्न बघितली आहेत त्यावरून यूपी एक प्रगत राज्य बनेल हे नक्की….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?