' सध्याच्या अतिकडक उष्णतेच्या लाटेमागची नेमकी कारणं काय? – InMarathi

सध्याच्या अतिकडक उष्णतेच्या लाटेमागची नेमकी कारणं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मार्च महिन्यापासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. मागच्या काही दिवसात तर उन्हाळ्याने फारच दाहक रूप स्वीकारलं आहे. या उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होतेय, तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुद्धा वातावरण तापलंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘सूरज की बाहों में, अब हैं यह जिंदगी’ ही गाण्यातील ओळ सत्यात उतरलेली दिसतेय असं म्हणणारे मिम्स असोत, किंवा ‘यंदाचा उन्हाळा आजवरचा सगळ्यात उष्ण उन्हाळा असला, तरी तो येत्या काळातील सगळ्यात थंड उन्हाळा आहे’ अशाप्रकारचा सामाजिक संदेश असो, सोशल मीडियावरील वातावरणही गरम झालेलं आहे.

 

summer im

 

सोशल मीडियावरील या चर्चेत, ‘हा उन्हाळा एवढा का दाहक ठरतोय?’ हादेखील प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, किंवा हा असाच प्रश्न तुम्हीदेखील कुठेतरी ऐकला वा वाचला असेल. चला मग आज जाणून घेऊया याचंच उत्तर, आणि उन्हाळ्यात लक्षात ठेवायला हव्यात अशा आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी…

उष्णतेची लाट म्हणजे नेमकं काय?

गेले काही दिवस तापमान सातत्याने ४० अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक पारा गाठत आहे. देशात काही ठिकाणी तर तापमानाची नुसतीच चाळीशी पार झालेली नसून, ४५ अंशाचा आकडा सुद्धा गाठलेला दिसतोय. हे असं सातत्याने तापमान चाळीशीच्या पार राहणं, याला उष्णतेची लाट म्हटलं जाऊ शकतं.

 

summer 2 IM

 

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे कमाल तापमान जेव्हा ४० अंश किंवा त्याहून अधिक असतं, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हटलं जातं. पर्वतीय क्षेत्रात हेच कमाल तापमान ३० अंश धरण्यात येतं.

ही उष्णतेची लाटच उष्माघातासारख्या भयंकर परिणामांची सुरुवात असते. उष्माघाताचा फार मोठा परिणाम जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. मागच्या काही दिवसात असे उष्माघाताचे बळी वाढत असल्याचं सुद्धा दिसतंय. म्हणजेच उष्णतेची लाट अधिक भयावह होत चालली आहे.

हेच कमाल तापमान ज्यावेळी ४७ अंशांपर्यंत पोचतो तेव्हा हीट वेव्ह अत्यंत धोकादायक मानली जाते. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात काही ठिकाणी अशी स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.

ध्रुव प्रदेशातील तापमानातही होतेय वाढ…

आर्क्टिक आणि अंटार्क्टिक भागात म्हणजेच ध्रुव प्रदेशात तापमान सर्वात कमी असतं. हे तापमान बऱ्याचदा अंटार्क्टिक ध्रुवावर तर हे तापमान सरासरी -५० अंश इतकं कमी असतं. मात्र गेल्या काही दिवसात हेच तापमान -२० अंश सेल्सियस इतकं वाढल्याचं पाहायला मिळतंय.

 

antartica im

 

अंटार्क्टिकाच्या काही भागात तर हेच तापमान सरासरीहून जवळपास ७० अंश सेल्सियस इतकं अधिक असल्याचं सुद्धा पाहण्यात आलं आहे. आर्क्टिक ध्रुवाच्या परिसरात हाच आकडा जवळपास ५० अंशांनी अधिकचा आकडा गाठताना दिसतोय. सरासरीहून इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिक असणारं तापमान ही धोक्याची घंटा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

का वाढतंय पृथ्वीच्या ध्रुवांवरील तापमान?

पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ एकाचवेळी वितळत असल्याची स्थिती सध्या पाहायला मिळतेय. दोन्ही ध्रुवांवर एकाच वेळी बर्फ वितळण्याची घटना याआधी कधीही घडलेली नाही. हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न केले जात आहेत.

दोन्ही ध्रुवांवरील तापमानात उन्हळ्यानंतर पुन्हा घट होईल अशीच परिस्थिती सध्या तरी म्हणायला हवी. मात्र तरीही एकाचवेळी दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळण्याचं प्रकरण अनाकलनीयच आहे. हा बदल अचानक घडलेला आहे. मात्र या घटना घडणं फारच धोक्याचं सुद्धा आहे.

 

earth im

एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळू लागला, तर समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढेल यात शंकाच नाही. असं घडल्यास, समुद्रकिनाऱ्यानजीक वसलेल्या जगभरातील अनेक शहरांना धोका संभवतो. शहरच्या शहरं पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

ऑस्ट्रलियाच्या दक्षिणेला असलेल्या दक्षिण महासागरावरून वाहणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांचा हा परिणाम असल्याचं काही अभ्यासकांचा मत आहे. तिथल्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिती आढळून येतात. वातावरणातील हा बदल ऑस्ट्रेलियासह पूर्व अंटार्क्टिक भागापर्यंत पोचू लागला आहे. ध्रुवीय वारे याला कारणीभूत ठरत आहेत.

अशी घ्या काळजी…

एकीकडे जगभरातील तापमानातं होणारी वाढ, जगभरातील हे बदल भविष्यासाठी फारच धोकादायक ठरण्याची शक्यता असताना, सध्या या उष्णतेच्या लाटेवर मात करणं आणि उन्हाळ्याचा नेटाने मुकाबला करणं सुद्धा आवश्यक आहे. यासाठी ही काळजी घेणं फारच आवश्यक आहे.

 

mineral water inmarathi

 

 

१. थकवा जाणवला तर सतर्क व्हा. उलट्या, डोकेदुखी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
२. खूप अधिक प्रमाणात घाम येणं, स्नायूंचं आकुंचन अशी लक्षणं दिसल्यास सावध रहा.
४. चक्कर आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. अधिकाधिक पाणी पीत रहा.
६. घट्ट आणि गडद रंगाचे कपडे घालणं टाळा. त्याऐवजी सुती आणि मोकळेढाकळे कपडे घाला.
७. दुपारी बाहेर पडायचं टाळा. बाहेर जाणं अनिवार्य असल्यास, गॉगल, टोपी अशा वस्तूंचा अवश्य वापर करा. दुपारी ११ ते ३ ही वेळ अधिक धोकादायक ठरते.
८. अधिक प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खाणं टाळा.
९. उन्हात उभ्या असणाऱ्या वाहनांमध्ये लहान मुलांना जाऊ देऊ नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?