' खाण्याआधी आंबे पाण्यात भिजू दिले पाहिजेत; जाणून घ्या यामागील विज्ञान!

खाण्याआधी आंबे पाण्यात भिजू दिले पाहिजेत; जाणून घ्या यामागील विज्ञान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उन्हाळा हा प्रचंड उकाड्याने बेजार करणारा ऋतू असला तरी एका कारणाकरता आपण उन्हाळ्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो. ‘आंबा’ हे आपल्या बहुतेकांचं सगळ्यात आवडतं फळ खाण्याची मजा आपल्याला केवळ उन्हाळ्यातच लुटता येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आंबा म्हणजे ‘फळांचा राजा’. आपल्या याच बिरुदावलीला जागत दर्जा आणि किंमत या दोन्ही बाबतीत आंब्याचा शाही कारभार असतो. आंब्याचे भाव थोडे उतरेपर्यंत आपण वाट बघतो आणि साधारण एप्रिलच्या सुमारास आंबे घ्यायला सुरुवात करतो.

आमरसापासून, मँगो मिल्कशेक, मँगो आइस्क्रीमपर्यंत आंब्याचे तर्हेतर्हेचे पदार्थ करून त्यांचा आस्वाद घ्यायला एव्हाना लोकांची सुरुवात झाली असेलच.

आंबे खाण्याच्या लहानपणीच्याही अनेक आठवणी आपल्या मनात असतात. तोंड, हात बरबटवून घेऊन, कपड्यांवर आंब्याचा रस सांडवून आणि त्यानंतर आईचा धपाटा खाण्याच्या आठवणी आपण विसरलेलो नसतो.

 

mangomasti-inmarathi

 

आंबा कधी खाऊ अशी आपल्याला तेव्हा नुसती घाई झालेली असायची. पण तो खाण्यापूर्वी घरातल्या मोठ्या माणसांकडून आपल्याला हमखास एक महत्त्वाची सूचना मिळायची. ती म्हणजे, आंबा धुवून खा.

खाण्यापूर्वी, आमरस काढण्यापूर्वी आंबे थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवण्याची पद्धत आहे.आंब्यावर फवारलेली रसायनं आणि त्यावरची घाण निघून जावी यासाठी आपण हे करतो, पण खाण्यापूर्वी आंबे पाण्यात भिजवून ठेवण्यामागे एवढं एकच कारण आहे का?

आपल्याला कदाचित माहीत नसेल पण ही कृती करण्यामागे इतरही काही शास्त्रीय कारणं आहेत. काय आहेत ही कारणं? जाणून घेऊ.

१. ते थंड राहतात :

 

mango im

 

आंबा हे उष्ण फळ आहे. आधीच उन्हाळा असतो आणि त्यात आपण आंबे खातो त्यामुळे शरीरातली उष्णता वाढते. ही उष्णता वाढल्यामुळे तोंडावर फोड येऊ शकतात ज्याला आपण बोलीभाषेत ‘आंबे येणे’ असं म्हणतो.

खाण्यापूर्वी थोडा काळ आंबे पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे आंब्यातले थर्मोजेनिक म्हणजेच उष्णता निर्माण करणारे गुणधर्म कमी व्हायला मदत होते.

२. फायटिक ऍसिडपासून सुटका :

फायटिक ऍसिड आपल्या तब्येतीसाठी उपयुक्तही ठरू शकतं आणि अपायकारकही. हे एक अँटी-न्युट्रियन्ट समजलं जातं ज्यामुळे लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतरही खनिजं शरीरात शोषून घेतली जाण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होते.

 

badami mango inmarathi

 

आहार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंब्यामध्ये फायटिक ऍसिड असतं जे बरीच फळं, भाज्या आणि सुक्या मेव्यातही दिसतं. त्यामुळे, जेव्हा आपण काही तासांकरता आंबे पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारं अतिरिक्त फायटिक ऍसिड काढून टाकायला मदत होते.

३. त्यावर फवारलेली रसायनं निघून जातात :

पिकांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यावर ज्या कीटकनाशकांची फवारणी केलेली असते ती विषारी असतात आणि आपल्या शरीरावर त्यांचा वाईट परिणाम होऊन त्यामुळे डोकेदुखी, श्वास घेण्याच्या मार्गात जळजळ, मळमळ, ऍलर्जी, डोळे चुरचुरणे आणि त्वचेची जळजळ हे आणि असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.

आंबे पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे त्यावर फवारलेली रसायनं धुवून निघतात आणि आंब्यावर जो फायटिक ऍसिडचा दुधाळ रस असतो तोही निघून जातो.

 

mango inmarathi 1

 

४. फॅट्स कमी करायला मदत :

आंब्यामध्ये पुष्कळ प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. आंबे पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यांच्यातली फायटोकेमिकल्सची मात्रा कमी होते आणि ते ‘नैसर्गिक फॅट बस्टर्स’ ठरतात.

५. रोगांचा धोका टळतो :

 

eating mango inmarathi

 

आंबे पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे आणखीही काही फायदे होतात. पुरळ उठणे, मुरूमं यांसारख्या त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि आतड्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू न देण्याला त्यामुळे मदत होते.

“फळं पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे त्यांच्यातल्या उष्ण तत्त्वांपासून आपली सुटका होते. ही पद्धत अवलंबली जाते जेणेकरून अतिसार आणि मुरुमासारख्या त्वचेच्या समस्या यांसारखे साईड इफेक्ट्स होत नाहीत.”

फळं, भाज्या आपण शक्यतो धुवूनच वापरतो. भाज्या आपल्याला धुतल्याधुतल्या लगेचच वापराव्या लागतात. मात्र फळं खाण्यापूर्वी जर ती आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायची सवय नसेल तर वरचे मुद्दे लक्षात घेऊन यापुढे आंबाच असं नाही, उष्णतावर्धक असणारी कुठलीही फळं खाण्यापूर्वी आपण ती आधी काही काळ पाण्यात भिजवून ठेवू आणि मगच खाऊ.

अशा प्रकारे थोडी अधिक काळजी घेतल्यामुळे नको ते रोग, समस्या होणं टळणार असेल तर ते करण्यात आपल्याकडून टाळाटाळ व्हायला नको.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?