' अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला... जाणून घ्या

अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला… जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मशिदींमधून लाऊडस्पीकर्स काढून टाका नाहीतर आम्ही मशिदींसमोर लाऊडस्पीकर्सवर ‘हनुमान चालीसा’ लावू असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर वादाला चांगलंच पेव फुटलंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अनेक सेलिब्रिटी मशिदींवरून भोंगे हटवण्याच्या मुद्याच्या समर्थनार्थ पुढे आले. सकाळी भोंग्याच्या आवाजाने जाग येऊन आपलीही अनेकदा झोपमोड झाली आहे असा त्यांचा मुद्दा होता. तर काही जणांनी या सगळ्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते असं म्हणणं मांडलं.

गुढीपाडव्यानंतर सुरू झालेल्या या वादामुळे तापलेलं वातावरण अजूनही थंड व्हायचं नाव घेत नाहीये. राज ठाकरे यांनी इतक्यातच पुन्हा एकदा आपला हाच मुद्दा लावून धरत ईद नंतर जिथे जिथे मशिदींमध्ये लाऊडस्पिकर लावले जातील तिथे तिथे त्याच्या दुप्पट आवाजात लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावण्याचे आदेश मनसेच्या सैनिकांना दिले आहेत.

 

raj thackrey loudspeaker IM

 

उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांमध्ये लाउड्स्पिकरच्या वापरावर पूर्णतः बंदी आणली गेली आहे. महाराष्ट्र सरकार धार्मिक स्थळी लाऊडस्पिकर लावण्याबाबत काय भूमिका घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हा सगळा वाद अजून किती दिवस चालेल ते येणारा काळच ठरवेल. मात्र आताच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मशिदींतून लाऊडस्पिकरवरून पहिल्यांदा अझान द्यायला केव्हा सुरुवात झाली होती हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.

लाऊडस्पिकरवरून अझान देण्यापूर्वी मशिदींमध्ये कशा प्रकारे अझान दिला जात असे? आणि कुठल्या मशिदीतून खऱ्या अर्थाने लाऊडस्पिकरवरून अझान देण्यास सुरुवात झाली? हे जाणून घेऊ.

मनोऱ्यांमधून दिला जायचा अझान :

एकेकाळी जेव्हा लाऊडस्पीकर्स नव्हते तेव्हा उंच मनोऱ्यांतून अझान दिला जायचा. ज्यांचे आवाज मोठे आणि स्पष्ट होते असे अझान देणारे ‘मौझ्झिन’ दिवसातून ५ वेळा अझान देण्यासाठी उंच मनोऱ्यांमध्ये चढून जायचे.

 

 

विशेषतः जास्त लोकसंख्या असलेल्या आणि जिथले लोक विखुरलेले असत अशा ठिकाणी मनोऱ्यांतून अझान देणं फायद्याचं ठरायचं. त्यामुळे अझान देणाऱ्या मौझ्झिन यांचा आवाज दूरवर पोहोचायचा. जिथे मनोऱ्यांची सोय नव्हती अशा ठिकाणी मौझ्झिन अझान देण्यासाठी गच्चीवर किंवा अशाच एखाद्या उंच ठिकाणी जायचे.

मात्र काळ बदलला तशी लोकसंख्या वाढली आणि वाहनं, मशिन्स इत्यादींमुळे ध्वनी प्रदूषण होऊ लागल्यामुळे मौझ्झिन यांचा आवाज पोहोचेनासा झाला. त्यामुळे गरजेपोटी माईक आणि लाऊडस्पीकर्स प्रथमच वापरात आणले गेले.

‘या’ मशिदीत लाऊडस्पिकरवरून पहिल्यांदा दिला गेला अझान :

२०व्या शतकाच्या सुरुवातीला लाऊडस्पीकर्स आले. त्यानंतर लाऊडस्पीकर्स मशिदींपर्यंत पोहोचायला फार वेळ लागला नाही. सुरुवातीला मशिदींमध्ये लाउड्स्पिकरचा वापर करण्याला विरोध दर्शवला गेला.

काही लोकांचं असं म्हणणं होतं की ईश्वर आणि अल्लाचे पाठ म्हणायला अशा प्रकारे मशिन्स वापरता काम नयेत. ‘द बिशप, द मुल्लाह अँड द स्मार्टफोन : द जर्नी ऑफ टू रीलिजन्स इंटू द डिजिटल एज’ या ब्रायन विंटर्स यांच्या पुस्तकानुसार सिंगापूरमधल्या ‘सुल्तान मशीद’ येथे जगात सगळ्यात पहिल्यांदा लाउड्स्पिकरचा वापर केला गेला.

 

masjid im

 

साधारण १९३६ सालची ही गोष्ट आहे. लाऊडस्पिकरमुळे अझानचा आवाज एका मैलापर्यंत जातो अशा बातम्या त्यावेळी तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या होत्या.

सुल्तान हुसेन शहा यांच्या नावावरून या मशिदीला ‘सुल्तान मशीद’ असं नाव पडलं. सिंगापूरच्या रोशोर जिल्ह्यात ही मशीद आहे. या मशिदीच्या बांधकामाला १९व्या शतकातच सुरुवात झाली होती. मात्र १९३२ मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं.

१९७५ साली या मशिदीला देशाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं गेलं. ही मशीद बांधली गेल्यानंतर छोट्या-मोठ्या जीर्णोद्धाराखेरीज या मशिदीत दुसरं कुठलं मोठं कार्य केलं गेलेलं नाही. ही मशीद कला आणि स्थापत्याचा देखणा नमुना आहे.

या मशिदीत नमाज पढणाऱ्या काही जणांनी या मशिदीत अझान देण्यासाठी लाउड्स्पिकरचा वापर करण्याला विरोध दर्शवला होता. मात्र शहरात कोलाहल खूप वाढला आहे. त्यामुळे अझानचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

यादृष्टीने लाउड्स्पिकरचा वापर करणं उपयुक्त ठरेल. या मुद्द्यावरून लाउड्स्पिकरच्या वापराला समर्थन दिलं गेलं. एक चांगलं पाऊल उचललं गेलंय असा विचार करून काही जणांनी लाउड्स्पिकरच्या वापराचं स्वागत केलं तर काहींनी याला आपला विरोध दर्शवला.

‘या’ देशांमध्ये लाऊडस्पिकरच्या आवाजावर लावल्या गेल्या आहेत मर्यादा :

 

loud im 1

 

जगभरात सगळीकडे मुस्लिम जनता आहे. असं असलं तरी स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जीयम, नेदर्लंड्स, फ्रांस, नॉर्वे, जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्ये लाउड्स्पिकरवर अझान दिला जातो. मात्र या देशांमध्ये किती डेसिबलपर्यंत लाउड्स्पिकरचा आवाज असला पाहिजे यावर मर्यादा घातल्या गेल्या आहेत.

याच देशांमधल्या काही शहरांनी मात्र यांच्यावर स्वतंत्रपणे बंदी घातली आहे. लाओस मधलं नायजेरियन शहर आणि अमेरिकेतील मिशिगन हे राज्य यांचाही यात समावेश होतो.

इस्राईलमध्ये आराम करण्याच्या वेळी धार्मिक स्थळी लाऊडस्पिकर वाजवायला परवानगी नाही. ब्रिटनमधल्या लंडन मधील ८ मशिदींमध्ये रमझानच्या वेळी अझानसाठी लाऊडस्पिकर वापरायला परवानगी आहे.

नंतर कोर्टाने एक निर्णय घेतल्यावर लाऊडस्पिकर वापरायला दिलेली परवानगी १९ मशिदींपर्यंत वाढवली गेली. पण यालादेखील प्रचंड विरोध दर्शवला गेला आहे.

सौदी अरेबियातही लाउड्स्पिकरच्या वापरासंदर्भात कडक नियम केले गेले आहेत. तिथे अझानकरता लाऊडस्पिकर वापरायला परवानगी आहे. मात्र मर्यादित आवाजात. त्याहून अधिक वापर केला जाण्यावर तिथे प्रतिबंध आहेत. नियमाच्या विरोधात जाऊन जर कोणी तसा वापर केला तर त्या व्यक्तीवर दंड आकारला जातो.

लाऊडस्पिकरच्या वापरावर ‘या’ देशांमध्ये केला गेलाय विरोध :

 

loudspekar im

 

नजीकच्या काही वर्षात अझान देण्यासाठी जर्मनी या देशाकडून सगळ्यात तीव्र विरोध दर्शवला गेला आहे. झालं असं की, इथल्या ‘कोलोन सेंट्रल मशिदी’च्या बांधकामाच्या वेळी आजूबाजूच्या काही जणांनी अझानच्या संदर्भात तक्रार केली होती.

लोक म्हणाले की, या मशिदीच्या बांधकामानंतर इथे अझान देण्यात येईल आणि त्यामुळे अडचणी निर्माण होतील. लाऊडस्पिकरवरून अझान दिला जाणार नाही या अटीवरून शासनाने नंतर मशीद बांधायला परवानगी दिली. मुस्लिमांची जगातील सर्वाधिक लोकसंख्या इंडोनेशियामध्ये आहे.

इथल्या एका महिलेने अझानदरम्यान लाऊडस्पिकर वापरण्यासंदर्भात तक्रार केली तर तिला तिला ईश्वराची निंदा केली या गुन्ह्याअंतर्गत १८ महिने सजा भोगावी लागली.

भडकलेल्या जमावाने १८ बौद्ध मंदिरं पेटवून दिली. मात्र त्यानंतर मशिदींमध्ये अझानदरम्यान लाऊडस्पिकर वापरण्यावर सरकारने मार्गदर्शक सूचनावली जारी केली.

तुर्की आणि मोरोक्को मध्ये आजही लाऊडस्पीकर्स वापरले जात नाहीत :

वेगवेगळ्या देशांमध्ये लाऊडस्पिकरवरून अझान देण्याचे नियम वेगवेगळे आहेत. तुर्की आणि मोरोक्को सारख्या देशांमध्ये लाऊडस्पिकरवरून अझान देण्यात येतो अशी मशीद अभावानेच आढळेल. नेदर्लंड्समधल्या केवळ ७ ते ८ % मशिदींमध्येच लाऊडस्पिकरवरून अझान देण्यात येतो.

लाऊडस्पिकरच्या वापरासंदर्भात काय नियम बनवले गेले होते?

१९९८ साली ‘कलकत्ता उच्च न्यायालया’ने असा नियम काढला की, कुठलीही व्यक्ती किंवा संस्था परवानगी न घेता लाऊडस्पीकर्सवर १० डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज ठेवून ध्वनी प्रदूषण करणार नाही.

२००० साली ‘चर्च ऑफ गॉड व्हर्सेस केकेआर मॅजिक’ अंतर्गत एक निर्णय घेतला गेला ज्यात रात्री १० ते सकाळी ६ च्या दरम्यान कुठल्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण करू नका असा आदेश दिला गेला.

या व्यतिरिक्त, कलम ५ अंतर्गत काही विशेष प्रसंगी जबाबदार अधिकाऱ्यांची परवानगी मिळवल्यानंतरच रात्री १० ते १२ च्या दरम्यान ठराविक डेसिबलची परवानगी दिली गेली.

 

masjid im 1

 

केवळ हेच नियम नाहीत तर या व्यतिरिक्त वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी कुठल्याही धार्मिक स्थळांवरून किंवा कार्यक्रमांमधून परवानगीशिवाय लाउड्स्पिकरचे आवाज येता कामा नयेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

एखाद्या गोष्टीची त्या त्या वेळची गरज ओळखून ती ती गोष्ट उपयोगात आणली जाते. लोकांनीही आपलं भान जागं ठेवून, गोष्टींच्या वापरासंदर्भांत सांगितले गेलेले नियम पाळून त्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, पण आपल्याकडे कधी कशावरून राजकारण होईल हे सांगता येत नाही.

वादांच्या निमित्ताने काही महत्त्वाचे विषय समोर आलेत असं वाटतं आणि बऱ्याचदा काही काळापुरते त्या विषयाचे नुसतेच बुडबुडे येतात, फुटून जातात आणि मूळ समस्या बाजूलाच राहतात.

नेतेमंडळी, कलाकारमंडळींना या सगळ्यात वेगळ्याच कारणांसाठी प्रसिद्धी मिळते. लाऊडस्पीकरवरच्या वादाच्या बाबतीतही असं घडायला नको अशी आशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?