' नवरा जोमात, बायको कोमात : पाठ खाजवण्यासाठी माणसाने केला भलताच जुगाड – InMarathi

नवरा जोमात, बायको कोमात : पाठ खाजवण्यासाठी माणसाने केला भलताच जुगाड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाचा उन्हाळा पहिल्यासारखा नाही. गर्मी मुळे अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे. जरा कुठे उन्हात बाहेर गेलं किंवा पंखा बंद केला तर अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

अख्खं शरीर उकडल्यासारखे वाटत आहे. देशातील अनेक राज्ये सध्या उष्णतेच्या कृष्णा छाये खाली आहेत. उकळत्या रसरशीत लाव्हा रसा सारख्या उष्णतेने हैराण झालेल्या वातावरणामध्ये हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेची प्रचंड लाट राहील असे चिंताजनक विधान केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि वैताग यांचा संगम निर्माण झालेला दिसून येत आहे.

पंखा, एसी, कूलर, यांच्या थंड हवेला देखील या वर्षीच्या उष्णतेने सहज एकतर्फी मात दिलेली जाणवते आहे. तप्त शरीराचा दाह शांत करण्यासाठी लोक पर्याय म्हणून कोल्ड ड्रिंक्स, शीत पेये, ताक, सरबत, आइसक्रीम यांचा आसरा घेत आहेत.

 

summer 2 IM

 

अशा प्रचंड उष्ण वातावरणात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत एक अत्यंत साधा सोपा, हलका फुलका आणि मनाला थंडावा देणारा देशी जुगाड.

विविध प्रकारच्या दैनंदिन परिस्थितींना तोंड देण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे म्हणजे जुगाड. पैसा आणि साहित्य या दोन्ही गोष्टींशी जुळवून घेण्याच्या आवश्यकतेतून जुगाड हा दुर्मिळ शब्द जन्माला आला असावा.

सोशल मीडिया वर अनेक प्रकारचे जुगाड आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा अशा करामती माणसांना सुचतात तरी कशा? किंवा किती ते कुरापाती मस्तक! अशी दाद आपल्या मनातून उमटते, आणि आश्चर्याने आपले डोळे अजून मोठे होतात.

अनेकदा तर अशा जुगाडू लोकांचा प्रचंड राग येतो आणि मग ती लोक सोशल मीडिया वर ट्रोल होताना दिसतात. जुगाड करण्यात आपण भारतीयच अग्रेसर आहोत का? तर तसे नाही इतर ही अनेक देश आहेत जेथिल नागरिक देसी जुगाड करून गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न करत असतात.

 

desi jugad IM

सध्या उष्ण आणि तप्त वातावरण असल्याने अनेकदा शरीराला घाम येतो, घाम आल्यानंतर बरेचदा पाठीला खाज सूटते ही पाठीची खाज दूर करण्यासाठी लोक सहसा पावडर, कंगवा, तळहाताचा पंखा किंवा हात यांचा वापर करतात किवा दुसर्‍या कुणाला तरी खाजवायला सांगतात.

परंतु व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मात्र एका व्यक्तीने पाठ खाजवण्यासाठी एक नामी शक्कल लढवलेली आपल्याला दिसते आहे जी तुम्हाला तुमच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत पोट धरून हसायला भाग पडेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो माणूस खोलीत निवांत वामकुक्षी घेत आहे, आणि आराम करण्यात वेळ घालवत आहे. बेडजवळ एक टेबल फॅन लावलेला आहे. ज्याला एक प्लॅस्टिकचा पंखा आपल्या बहद्दराने अशा प्रकारे जोडला आहे, जो पंख्याची हवा खाण्यासोबतच झोपेच खोबरं न करता पाठीची खाजही दूर करत आहे

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला पाहून पोटभर हसाल,सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा त्या माणसाची बायको हा जुगाड पाहते तेव्हा तिलाही आश्चर्य आणि कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे बघून हसायला लागते.

rising.tech या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या देसी जुगाडचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या माणसाच्या जुगाडचे कौतुक करताना अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की,” ये आदमी २०५० में जी रहा है.” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान हास्याचे फवारे निर्माण करत आहे.

विडियो अपलोड झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. हा विडियो पाहणार्‍यांच्या संख्ये मध्ये दिवसें दिवस सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी आपले मतही प्रदर्शित केले आहे.

प्रत्येकजण कमेंट विभागात आपले सगे सोयरे, आपले जिवलग, नातलग, मित्र यांना टॅग करत आहे आणि त्यांना पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे. यावरून हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे याचा अंदाज लावता येतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?