' चवीने खाल्ल्या जाणाऱ्या shawarma ने घेतला मुलीचा बळी; आरोग्यासाठी कितपत आहे सेफ?

चवीने खाल्ल्या जाणाऱ्या shawarma ने घेतला मुलीचा बळी; आरोग्यासाठी कितपत आहे सेफ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आता फिटनेसचं महत्त्व लोकांना पटू लागलेलं असलं तरी जमाना आजही फास्ट फूडचा आहे. अनेकदा लोकांना सकाळी घाईघाईत घरून निघाल्यानंतर सकाळचा नाश्ता बाहेरच करायची सवय असते. मधल्या वेळेस भूक लागते तेव्हाही पटकन काय खायचं म्हटल्यावर बाहेरूनच काहीतरी मागवलं जातं. रात्री घरी पोहोचायला उशीर होणार असेल तरीदेखील बरेच जण घरी जेवायला थांबू नका असं सांगून बाहेरूनच काहीतरी खाऊन येतात.

कॉलेजमधली तरुण मंडळीही कॉलेजबाहेरच्या फूड स्टॉलवरच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. खाण्याचे शौकीन असलेले आपल्यातले अनेकजण स्वस्तात आणि चविष्ट पदार्थ कुठे मिळतील ती ठिकाणं आणि खाऊगल्ल्या धुंडाळत असतो.

 

boy-eating-fastfood-inmarathi

 

फास्ट फूड आपल्याला फार प्रिय असतं आणि ते कधीतरीच प्रमाणात आणि शक्यतो त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी खाल्लं तर त्रास होत नाही. पण बऱ्याचदा अनेकांना नेहमी फास्ट फूड खायची सवय असते आणि कमी पैशात चटपटीत काहीतरी खाऊन भूक भागतेय म्हटल्यावर हेच फास्ट फूड आपल्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं या शक्यतेचं भानच राहत नाही. ‘शोरमा’ हा असाच एक फास्टफूडचा प्रकार. फास्ट फूड खाऊन माणसं आजारी पडल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकली असतील.

 

shawrama im

शाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या!

उत्तम आरोग्यासाठी नियमित मासे खाणं फायदेशीर ठरेल, वाचा!!!

शोरमा खाल्यामुळे केरळमधल्या एका १६ वर्षांच्या मुलीचा चक्क मृत्यू झाल्याची आणि डझनापेक्षाही जास्त जणांना विषबाधा होऊन  रुग्णालयात दाखल करावं लागल्याची बातमी समोर आली आहे. शोरमा हा पदार्थ खरंच आरोग्यासाठी घातक ठरतो का? तो खाल्ल्यामुळे कोणते अपाय होऊ शकतात? हे या निमित्ताने थोडक्यात जाणून घेऊ.

१. स्थूलत्त्व :

कुठल्याही प्रकारच्या फास्ट फूडच्या अति सेवनामुळे ही समस्या उद्भवू शकते. ‘न्यू हम्पशिर’च्या एका संशोधनातून समोर आलंय की, रोज आपण जे खातो त्यातून आपल्याला ७० ते ८० ग्रॅम फॅट्स मिळतात. मात्र शोरमाच्या एका भागातून आपल्याला जवळपास १०० ग्रॅम फॅट्स मिळतात. शोरम्यातले अनावश्यक फॅट्स, त्यात असलेलं साखरेचं अतिरिक्त प्रमाण आणि भरपूर कॅलरीज यांमुळे शोरमा प्रेमींचं वजन भराभर वाढून त्यांना स्थूलत्त्व येऊ शकतं. त्यांचा आळस वाढू शकतो.

 

fat burning inmarathi

 

२. मधुमेह आणि उच्च रक्तदाब :

शोरम्यात साखरेचं प्रमाण अधिक असल्यामुळे अतिरिक्त प्रमाणात शोरमा खाल्ला तर मधुमेह होऊ शकतो. हाडं ठिसूळ होण्यासारखे दीर्घकालीन परिणामही त्यामुळे होऊ शकतात. शोरम्याच्या अति सेवनामुळे उच्च रक्तदाबही होऊ शकतो. सांधेदुखी, हृदयासंबंधीचे आजार अशाही समस्या त्यामुळे उद्भवू शकतात.

 

high BP InMarathi

 

३. निस्तेज त्वचा आणि मुरुमं :

शोरम्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असल्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. शोरम्यातल्या कॅलरीजचा आपल्या रक्तातल्या साखरेच्या पातळीवर दीर्घकालीन परिणाम होऊन त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येतात आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.

 

pimples inmarathi

 

४. स्मृती भ्रंश आणि अपुरी वाढ आणि विकास :

शोरम्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात असलेली साखर आणि फॅट्समुळे आपल्या मेंदूतल्या क्रियांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो आणि स्मृती भ्रंश होण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते. शोरम्यातून आपल्याला शरीरासाठी आवश्यक असलेली पोषकमूल्ये आणि व्हिटॅमिन्स मिळत नाहीत. त्यामुळे आपली वाढ आणि विकास अपुरा होऊ शकतो. शोरम्यात असलेल्या अतिरिक्त सोडा आणि साखरेमुळे दातही पडू शकतात.

 

Stressed girl Inmarathi

 

५. अपचन आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार:

अती शोरमा खाल्यामुळे रक्तातल्या साखरेवर त्याचा परिणाम होऊन शरीराची पिष्टमय पदार्थ खाण्याची गरज वाढते. त्यामुळे आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो आणि या सगळ्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. शोरमा खाल्यामुळे अतिसार, जठर आणि आतड्यासंबंधीत संसर्गजन्य रोग, मळमळ आणि उलटी, विषबाधा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

 

digestion inmarathi

 

६. श्वसनाशी निगडीत आजार :

शोरमा खाल्यामुळे स्थूलत्त्व येतं आणि स्थूल व्यक्तीने भराभर खाल्लं तर तिला श्वास घ्यायला त्रास होतो. स्थूलत्त्वामुळे श्वसनाशी निगडीत बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. एका अहवालातून असं समोर आलंय की, जी लहान मुलं आठवड्यातून ३ ते ४ वेळा फास्ट फूड खातात त्यांना दमा होण्याची शक्यता इतर लहान मुलांच्या तुलनेत अधिक असते.

 

asthma featured inmarathi
NDTV doctor

७. कार्डिऍक इन्फार्क्शन :

शोरमा प्रेमींची जीवनशैली बैठी असेल आणि ते जर निष्काळजीपणे तेलकट पदार्थ, जंक फूड खात राहिले तर त्यांना पुढल्या १० वर्षात कार्डिऍक इन्फार्क्शन म्हणजेच हृदयाच्या स्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन बसणे यासारखी गंभीर समस्याही होऊ शकते.

 

music while working inmarathi

 

८. मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम :

खूप जास्त प्रमाणात शोरमा झाल्याचा परिणाम केवळ व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावरच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही होतो. ‘प्रिन्सटन युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय की, शोरमा खाल्यामुळे गंभीर मानसिक समस्याही उद्भवू शकतात. आपल्या मज्जासंस्थेवरही हे खाल्ल्याचा वाईट परिणाम होऊन आपल्याला नैराश्यही येऊ शकतं.

 

tension inmarathi

 

शोरमा खाण्याचे इतके सगळे दुष्परिणाम समजल्यावर यापुढे आपण शोरमा खाण्यापूर्वी दहा वेळा विचार करूच. पण तसाच विचार बाकी प्रकारचं फास्ट फूड खातानाही करूया. फास्ट फूड खाणं आपल्याला आवडतं त्यामुळे त्यावर अगदी पूर्णपणे फुल्ली न मारताही माफक प्रमाणात ते खाऊन त्याचा आनंद घेता येऊ शकतो. त्याचबरोबरीने व्यायामाकडेही आपलं दुर्लक्ष होऊ देता काम नये. जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात तब्येतीची वाट लागायला नको.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?