' महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत… – InMarathi

महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तरप्रदेशात पन्नास हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे उतरवले गेले आणि याच पार्श्वभूमीवर काल राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडली. त्यांची सभा सुरु असतानाच अजान सुरु झाली अशाही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर रंगत आहेत.

आधीच मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला ‘मशिदीवरील भोंगे’ हा विषय आता अगदीच शिगेला पोचला आहे, असं म्हणायलाही काहीच हरकत नाही. ‘मशिदीच्या भोंग्यांचा हा विषय लवकर संपेल का?’, ‘मशिदीवरील भोंगे खरंच उतरतील का?’, ‘भोंगे उतरले नाहीत, तर त्याचे अधिक राजकीय परिणाम पाहायला मिळतील का?’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बहुदा येत्या काळात मिळतील. मात्र असं एक गाव महाराष्ट्रात आहे, ज्याचा या भोंग्यांच्या वादाशी काडीमात्रही संबंध नाही. कारण चक्क चार वर्षांपूर्वीच या गावातील सगळेच भोंगे उतरवलेले आहेत. कुठलं आहे हे गाव आणि गावकऱ्यांनी हे नेमकं कसं साध्य केलंय? जाणून घेऊया.

 

loudspekar im

 

ही असली चर्चाच नको म्हणून…

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड नावाचं एक गाव आहे. नावाला आणि दिसायला जरी गाव असलं, तरी हे गाव पुढारलेलं आहे असं म्हणायला हवं. या गावातील स्वच्छता आणि सामान्य जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पाहिल्या तर तुम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. रुग्णालयासारखी आरोग्य सुविधा तर उत्तम आहेच, याशिवाय इथे चांगलं ग्रंथालय सुद्धा पाहायला मिळतं. इथे केली गेलेली वृक्ष लागवड सुद्धा लक्ष वेधून घेते.

 

mudkhed im

शेतकरी बांधवांच्या ‘डोळ्यातून पाणी’ काढणारा कांदा इतका स्वस्त होण्यामागची कारणं

शेती म्हणजे हमखास बुडणारा धंदा, अशी हेटाळणी करणाऱ्यांचेही मन जिंकणारा कमलेश…

या पुढारलेल्या गावाची आणि तिथल्या ग्रामस्थांची दूरदृष्टी यातून अगदी सहज लक्षात येईल. अशीच दूरदृष्टी जणू त्यांनी चार वर्षांपूर्वी दाखवली आहे. भोंगे, त्यामुळे समाजातील आबालवृद्धांना होणार त्रास हा चर्चेचा विषयच नको, म्हणून गावात भोंगाबंदी करण्यात आली आहे. सततच्या आवाजाने अभ्यासात व्यत्यय येत असल्याने वैतागून जाणारे विद्यार्थी या निर्णयामुळे सर्वाधिक खुश झाले होते.

गावातील गल्ल्यागल्ल्यांमध्ये छोटे स्पीकर्स लावलेले आहेत. कुठलीही महत्त्वाची सूचना द्यायची झाल्यास या छोट्या स्पीकर्सचा वापर केला जातो. परिणामी गावात नावाला सुद्धा ध्वनी प्रदूषण उरलेलं नाही.

ग्रामसभेत ठरावच मांडला गेला, आणि…

साधारण १७ हजारांच्या आसपासची लोकसंख्या आणि शेती हा मुख्य व्यवसाय असणारं बारड हे गाव! रस्ते, पाणी, वीज या साधारण गरजा सुद्धा उत्तमरीत्या पूर्ण होण्याची शाश्वती असल्यामुळे ग्रामस्थ सुखी आणि समाधानी आहेत. या समाधानाच्या वातावरणात काही प्रमाणात अडचण आणणारा मुद्दा होता तो म्हणजे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा.

 

mudkhed im 1

 

ग्रामस्थांनी तोसुद्धा निकालात काढायचं ठरवलं. एक ग्रामसभा आयोजित करण्यात आली. हिंदू-मुस्लिमच नाही, तर बौद्ध आणि जैन धर्मीय लोकांनी सुद्धा आवर्जून या सभेला उपस्थिती दर्शवली. धार्मिक स्थळांवर लावण्यात येणारे भोंगे उतरवले जावेत असा ठराव मांडण्यात आला.

भारतातील सर्व धर्मसमभाव कशापद्धतीने आचरणात येतो, याचं उत्तम उदाहरण ठरावं अशा पद्धतीने हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला. हा ठराव केवळ कागदावर मान्य करून सोडून देण्यात आला नाही, र लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले.

हिंदूंची ८ मंदिरं, १ मशीद आणि २ बुद्ध विहार अशा धार्मिक स्थळांवर अगदी सर्रासपणे भोंगे लावलेले असत. मात्र ग्रामसभेत करण्यात आलेला ठराव त्यांनी तातडीने मान्य केला. भोंगे बंद झाले आणि काही अंतरावर असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आनंदित झाले. अभ्यासात येणार व्यत्यय थांबला. अभ्यासात अधिक लक्ष देणं शक्य झालं. वृद्ध मंडळी आणि रुग्णांना होणार आवाजाचा त्रास सुद्धा आपोआपच मोठ्या प्रमाणावर कमी झाला.

तंटे झाले सूर…

गावातील भोंगे बंद झाल्यामुळे गावातील भांडणं मोठ्या प्रमाणावर थांबली. अर्थात ही भांडणं कमी होण्यासाठी आणि गावात सलोखा नांदण्यासाठी आणखी एक कारण महत्त्वाचं ठरलं. गावातील सर्वधर्म समभाव हा कळीचा मुद्दा ठरला. बारड गावातील शिवजयंती अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी होते. सर्व जात-धर्मियांची या दिवशी उपस्थिती असते.

 

loudspekar im 1

 

महाराजांच्या काळात बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. या बारा जातींच्या मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची नवी परंपरा गावात अस्तित्वात आहे. यामुळे गावकऱ्यांच्यात सलोखा वाढला आहे. त्यामुळेच अवघ्या राज्यात भोंग्याच्या विषयावरून गदारोळ माजलेला असताना, बारड मात्र शांत आहे.

आवाज कमी कर डीजे, तुला…

भोंगाबंदीचा निर्णय करण्यात आला, तर तो काही फक्त धार्मिक स्थळांची मर्यादित ठेवणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळेच इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, अगदी लग्नसमारंभात सुद्धा भोंग्याचा वापर केला जात नाही. कारण तशी परवानगीच देण्यात येत नाही. सर्वधर्मीयांच्या मिरवणुका, सोहळे, शोभायात्रा यांमध्ये लाऊडस्पिकर किंवा डीजे यांना परवानगी नाही.

यात कुणालाच सवलत किंवा निराळी वागणूक, निराळा नियम असा दुजाभाव करण्यात येत नाही. बरं हे सगळे नियम फक्त सामन्यांसाठी आणि राजकारण्यांसाठी नाहीत, अशीही स्थिती इथे नाही. निवडणूक प्रचाराच्या वेळी सुद्धा भोंगे आणि लाऊडस्पीकर वापरण्यावर असलेली बंदी इथे पाळण्यात येते बरं का मंडळी.

 

elections inmarathi
asiadialogue.com

 

चार वर्षांपूर्वी भोंगाबंदी होण्यापूर्वी गावात आवाजाचा उच्छाद मांडला जात असे, असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता गावात सुख आणि शांतता नांदते आहे. थोडक्यात काय, तर अवघ्या महाराष्ट्रात भोंग्यांचा आणि त्याविषयावर बोलणाऱ्यांची आवाज चढलेला असताना, बारड ग्रामस्थांना मात्र याविषयी काहीही घेणं-देणं नाही. ते शांतपणे रोजचं आयुष्य आनंदात जगत आहेत.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?