' खरं वाटणार नाही, पण सेलिब्रिटींच्या लग्नाचे कपडे शिवणारा सब्यसाची कधीकाळी आत्महत्या करणार होता – InMarathi

खरं वाटणार नाही, पण सेलिब्रिटींच्या लग्नाचे कपडे शिवणारा सब्यसाची कधीकाळी आत्महत्या करणार होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यूँ तो चलते रहेंगे इन गर्दिशोंके कारवां..
पर सवेरा खिलता रहे..
तू चलता जा राही अपने रास्ते
सफ़र का साथ तुझे मिलता रहे..

कोणत्याही चित्रपटातील गीत नाही हे ,पण एका व्यक्तीची जीवन कहाणी नक्कीच होवू शकते. मित्रहो आपल्या आजूबाजूला अशा अनेक संघर्ष, स्वत:ला ओळखण्याची धडपड यांनी सजलेल्या यशोगाथा आपण पाहतो, ऐकतो वाचतो. त्यातून प्रेरणा घेतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सब्यसाची मुखर्जी याची कथा अशीच वेगळ्या मार्गाने जाणारी आहे. आता सब्यसाची कोण हे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही पण आज तो एक आयकॉन कसा बनला? काय घडले होते त्याच्या आयुष्यात? या सगळ्या गोष्टींची उत्सुकता तुम्हाला असेलच. चला जाणून घेवू या फॅशन दिवा बद्दल.

 

sabyasachi im

 

सब्यसाची हा एकमेव भारतीय डिझायनर आहे ज्यांना मिलान फॅशन वीक २००४ मध्ये त्याचे लेबल प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. फॅशनच्या दुनियेत स्वत:साठी एक वेगळे स्थान निर्माण करणारा सब्यसाची मुखर्जी फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाच्या असोसिएट डिझायनर सदस्यांपैकी एक आहे आणि भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या सर्वात तरुण मंडळ सदस्य आहे.

लहानपणापासूनच मुखर्जी यांना हस्तकला आणि कारागिरीची प्रचंड आवड होती. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्याची आई सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक होती आणि वडील खाजगी नोकरी करत होते. वयाच्या १५ व्या वर्षी सब्यसाचीने फॅशनमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला त्याच्यासाठी प्रसिद्ध डिझायनर रोहित खोसला हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रेरणास्थानी राहिले आहेत.

सब्यसाचीने आपला निर्णय जेव्हा आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्याच्या घरातील परिस्थिती गंभीर होती. नुकतीच त्याच्या वडिलांची नोकरी गेली होती आणि आर्थिक परिस्थिती देखील ठीक नव्हती. साहजिकच त्याच्या पालकांनी त्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्यास नकार दिला. निराश झालेल्या सब्यसाचीने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. तेव्हा त्याच्या आईने दाखवलेल्या प्रसंगावधानाने ती कटू वेळ टळली. विषय तेवढ्यावरच थांबला नाही तर या फॅशन डिझायनिंगच्या वेडापायी तो चक्क गोव्याला पळून गेला आणि काही दिवस तेथील एका हॉटेल मध्ये त्याने वेटरचे काम केले.

त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या NIFT परीक्षेसाठी पैसे देण्यास नकार दिला असला तरी आपल्या आवडीबद्दल दृढनिश्चय केल्यामुळे सब्यसाचीने नंतर आपली सर्व पुस्तके विकली आणि अथक परिश्रमातून आपल्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला.

 

sabyasachi 1 im

 

१९९९ मध्ये NIFT मधून पदवी घेतल्यानंतर, त्याने आपल्या बहिणीकडून २०००० रुपये उसने घेतले. केवळ तीन कर्मचाऱ्यांसह फॅशन स्टोअर सुरू केले. त्या काळात कामालाच त्याने आपले सारेकाही मानले होते. तो कधी कधी रात्रभर त्याच्या डिझाइन्सवर काम करत असे आणि हा ट्रेंड सुमारे पाच वर्षे अथकपणे चालू राहिला.

सब्यसाचीने २००२ मध्ये इंडियन फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. त्याने प्रेझेंट केलेल्या ‘द वुमन वेअर डेली’ ला भारतीय फॅशनचे भविष्य म्हणून पाहिले गेले. त्याच्या कामाची प्रशंसा केली गेली यामुळे त्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुढे जाऊन, त्याने २००३ मध्ये सिंगापूरमधील मर्सिडीज बेंझ न्यू एशिया फॅशन वीकमध्ये ग्रँड विनर अवॉर्डसह प्रथम आंतरराष्ट्रीय फॅशन ईरामध्ये पदार्पण केले. त्याच्या कामाला सर्वांकडून भरभरून दाद मिळत होती आणि ही फक्त सुरुवात होती.

सब्यसाचीने अनेक फॅशन इव्हेंटमध्ये त्याच्या लेबलचे प्रतिनिधित्व केले आणि २००६ हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट होता. प्रतिष्ठित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वार्षिक ‘ब्लॅक टाय चॅरिटी डिनर फॅशन शो’ मध्ये त्याचा संग्रह ‘द नायर सिस्टर्स’ प्रदर्शित करण्यास त्याला सांगण्यात आले. तेव्हाच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि जगभरातील लोक त्याला ओळखू लागले.

 

dress im

 

त्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांव्यतिरिक्त, सब्यसाची एका कारणासाठी देखील कार्य करतो. त्यांने ‘सेव्ह द साडी’ नावाचा एक प्रकल्प सुरू केला. जिथे तो हाताने विणलेल्या भारतीय साड्या ना-नफा तत्त्वावर रु. किमतीत विकतो आणि ती संपूर्ण रक्कम मुर्शिदाबादच्या विणकरांना जाते. त्याच्या या उपक्रमाला ऐश्वर्या राय बच्चन आणि विद्या बालन सारख्या बॉलीवूड सेलेब्रिटीजनी पाठिंबा दिला आहे.

गेल्या १५ वर्षांपासून, सब्यसाची मुखर्जी यांनी त्यांच्या डिझाईन्समध्ये भारतीय हातमागाचा वापर केला आहे. त्याच्या आयकॉनिक खादी, कॉटन आणि सिल्कच्या हस्तकलेच्या पोशाखांनी जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. फॅशनच्या चकचकीत आणि झगमगत्या समुद्रात सब्यसाची एका दीपस्तंभाप्रमाणे खंबीर उभा आहे.

रंगाच्या गडद छटा, सोन्याची जरदोसी, क्वीलटिंग वर्क, कापडाच्या स्नोबचे ज्ञान यांमुळे त्याची डिझाईन्स एखाद्या तार्‍यासारखी चमकतात.

 

sabya im

 

संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट उद्योगात पदार्पण केले ज्यासाठी त्यांना २००५ मध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

बाबूल , लागा चुनरीमे दाग, रावण, गुजारिश, पा, नो वन किल्ड जेसिका आणि इंग्लिश विंग्लिश या चित्रपटांसाठी देखील त्याने कॉस्च्युम डिझायनिंग केले होते.

सब्यसाचीच्या ग्राहकांमध्ये सामंथा अक्किनेनी, आलिया भट्ट, राणी मुखर्जी, श्रीदेवी, तब्बू, शबाना आझमी, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सुष्मिता सेन आणि करीना कपूर खान आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेनी झेलवेगर आणि रीझ विदरस्पून या ही सब्यासाचिने डिझाईन केलेले कपडे वापरतात.

 

sabya sachi im

 

गेल्या १५ वर्षांपासून, सब्यसाची मुखर्जी यांनी त्यांच्या आयकॉनिक खादी, कॉटन आणि सिल्कच्या हस्तकलेच्या पोशाखांनी जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.

ध्येय निश्चित असेल तर अनेक संकटांवरही सहज मात करता येते असे हे उदाहरण आपल्यासाठी प्रेरणादायी ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?