' उन्हाचे चटके सोसताना भारतीयांनी केलेले हे १० जुगाड पाहून हसूू आवरणार नाही – InMarathi

उन्हाचे चटके सोसताना भारतीयांनी केलेले हे १० जुगाड पाहून हसूू आवरणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यापाठोपाठ सध्याचा ट्रेन्डींग हॉट टॉपिक म्हणजे दररोजचे वाढते तापमान! मार्च महिन्यापासूनच आग ओकणााऱ्या सूर्याकडे पाहताना एप्रिल आणि मे महिन्याची चिंता व्यक्त केली जात होती.

 

summer inmarathi

 

एप्रिल महिना जसा सुरु झाला तेव्हापासूनच उष्णतेने अंगाची ल्हाईल्हाई करण्यास सुरुवात केली. मग कुणी थंडगार सरबतांकडे धाव घेतली तर कुणी आइस्क्रीमला पसंती दिली. ताक, कोल्ड्रींग्स यांचीही मागणी वाढली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महिलांनी गॉगल्स, कॅप्स, समरकूल कपडे घालून फॅशनचा आधार घेतला. मात्र या सगळ्याने उष्णतेमुळे होणारा त्रास काही कमी होईना.

दिवसभर एसी, थंडगार कुलर, माठातलं गारेगार पाणी, वाळ्याते पडदे, तुमच्या घरातही असे नानाविध प्रयोग सुरु असतील ना?

मात्र पठडीतील कल्पनांना बाजूला सारत काही अवलियांनी भन्नाट शक्कल लढवली आहे. उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या युक्त्या पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

चला तर मग, टेन्शन विसरा, डोकं बाजूला ठेवा आणि या काही भन्नाट कलाकृतींचा आनंद घ्या.

१. फॅन हवाच पण…

 

fan im

 

उन्हाळा आणि पंखा यांचे अतुट नाते आहे. एसी, कुलर असे कितीही पर्याय असले तरी पंख्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, हे नक्की.

घरात किंवा ऑफिसमध्ये पंख्याखालची जागा पटकवण्यासाठी तुम्हीही हरतऱ्हेचे प्रयत्न केले असतील, पण पंख्यालाच आपल्या सोबत नेण्याची ही कल्पना तुम्हाला कधी सुचली होती का?

२. यामध्ये तुम्हाला पोहायला आवडेल का?

 

pool 1 im

 

कोण म्हणतं स्विमिंग पुल केवळ श्रीमंतांचे चोचले आहेत? शक्कल लढवली तर हाती पैसा नसतानाही उन्हाळ्यात थंडगार पाण्यात डुंबण्याचा आनंद घेता येऊ शकतो.

३. नामी शक्कल

 

fan im

 

भारतीयांचं डोकं कधी, कुठे चालेल याचा काही नेम नाही. अशी युक्ती करणाऱ्याची पाठ थोपटायलाच हवी.

४. स्वस्तात मस्त

 

cooler im

 

स्वस्तात मस्त ही शिकवण लहानपणापासून आपल्याला दिली जाते. त्याचेच हे उदाहरण!

५. एसी नको, फ्रीज हवा

 

photo im

 

अंगाची ल्हाईल्हाई होत असताना एसीही अपुरा असतो. अशावेळी या पठ्ठ्याने ही भन्नाट कल्पना शोधून काढलीय.

६. जेव्हा चार्जर तापतो

चार्जर तापल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल मात्र त्यानंतर हा उपाय करण्याचा विचार कधी तुमच्या डोक्यात आला आहे का?

 

charger 1 im

 

७. वाह रे वाह

 

bike im

 

रणरणत्या उन्हात गाडी चालवणे म्हणजे शिक्षाच! तुम्हालाही हा अनुभव आला असेल, मात्र चीडचीड करण्यापेक्षा या पठ्ठ्याने लढवलेली शक्कल भन्नाट आहे. फक्त असलंं धाडस करण्याआधी जरा परिणामांचा विचार करा.

८. असंही वर्क फ्रॉम होम

सध्या वर्क फ्रॉम सुरु असल्याने प्रत्येकालाच घरी प्रचंड उकाड्यात काम करावं लागतंय. अशावेळी एसी, पंखा, गारेगार सरबत याशिवाय काहीतरी भन्नाट उपाय हवा असेल तर मग हा फोटो बघाच.

 

work im

 

९. भन्नाट ‘जुगाड’

 

fun im

 

हा फोटो बघून तुम्हाला हसू आवरता येणं कठीण आहे. मात्र एका गावात केलेला हा जुगाड पाहून त्यांचं कोतुक करावंच लागेल.

१०. कुछ थंडा हो जाए

 

ac im

 

थंडगार कोल्र्ड्रींग कोणाला आवडत नाही? मात्र कोल्र्डींग्सचे कॅन फ्रीजमध्ये थंड करण्यापेक्षा एसीचा वापर केलाा तर? आपल्या डोक्यातही न आलेली ही कल्पना कुणीतही प्रत्यक्षात आणलीय.

हे फोटो केवळ मनोरंजनासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे हे फोटो पाहून कोणतेही धाडस करू नका.

उन्हाळा सोसण्यासाठी पंखा, एसी, थंड पदार्थ असे अनेक पर्याय आहेत, त्यांचाच वापर करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?