' रेल्वे रुळांमध्ये ‘खडी’ टाकण्यामागे काय असावं कारण? कधी विचार केलाय? – InMarathi

रेल्वे रुळांमध्ये ‘खडी’ टाकण्यामागे काय असावं कारण? कधी विचार केलाय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शोले मधला डाकू आणि ठाकूर यांचा चेस सीन तुम्हाला ठाऊक असेलच, शिवाय राजेश खन्नायांच्या आराधना सिनेमातलं ‘मेरे सपनो की रानी’ गाणं तर प्रत्येकालाच आठवत असेल!

या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे ‘ट्रेन’, शोले मधल्या सीन मध्ये दाखवलेली कोळशाच्या वाफेवर चालणारी ट्रेन तर कुणीच विसरू शकत नाही, आराधना मधलं ते गाणं आणि ती रुळांवरून धावणारी रेल्वे सगळ्यांनाच आजही अगदी व्यवस्थित लक्षात आहे!

 

sholay train inmarathi

 

त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा रेल्वे एक महत्वपूर्ण भाग आहे! शिवाय मुंबईकरांसाठी तर लोकल रेल्वेचा प्रवास काय नवीन नाही, त्याच किचाट गर्दीतून प्रत्येक मुंबईकर हा कामाला जातो आणि त्याच गर्दीतून तो पुन्हा घरी येतो!

मुंबईच्या माणसाच्या नाशिबातच लोकल चा जीवघेणा प्रवास लिहिला आहे! पण तरीही न कंटाळता प्रत्येक मुंबईकर या लोकल मधल्या युद्धासाठी सज्ज असतो!

या रेल्वेतून प्रवास करताना सहज कधीतरी नजर जाते रेल्वे रुळांवर आणि त्याच्यामध्ये पडलेल्या असंख्य लहान लहान दगडांवर..!

 

train tracks Inmarathi

 

तुम्ही इतक्या वेळा रेल्वे ने प्रवास केला असेल, पण कधी तुमच्या मनात हा प्रश्न आलाय का की रेल्वे रुळाच्या मधोमध खडी का टाकलेली असते? किंवा त्या रुळावरून रेल्वे कधीच घसरत का नाही?

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना या रुळांच्या मध्ये खडी ओतताना देखील पाहिलं असेल. मनात विचार येतो – असं का? काय उपयोग होतो या दगडांचा?

 

rail track staff InMarathi

 

जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा जमीन आणि रेल्वे रुळांमध्ये कंपन निर्माण होते. उष्ण तापमानात रूळ प्रसरण पावतात आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. वातारणातील बदलामुळे रेल्वे रुळाच्या आसपास रानटी गावात उगवते.

या सर्व गोष्टींना उपाय म्हणून रेल्वे रुळांमध्ये दगडी खडी टाकली जाते.

 

rail track stones 2 InMarathi

 

ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…!

खडी टोकदार असल्याकारणाने लाकडाच्या पट्ट्या यांवरून घसरत देखील नाही. (सध्या सिमेंटच्या आणि अधिक टिकाऊ सामग्रीपासून बनवलेल्या पट्ट्या वापरल्या जातात. परंतु बहुतांश रेल्वे रुळांमध्ये अजूनही लाकडाच्या पट्ट्यांचाच वापर केल्याचे आढळून येते.)

 

Crushed stones railway tracks InMarathi

 

रेल्वेचा संपूर्ण जोर प्रथम लाकडाच्या पट्ट्यांवर येतो आणि हाच जोर पुढे या दगडी खडींवर टाकला जातो. यामुळे कंपन, रुळांचे आकुंचन आणि रेल्वेचा जोर सर्वच गोष्टी सहजगत्या पेलल्या जातात.

सामान्यत: रेल्वे रूळ हे जमिनीपासून काही अंतरावर बसवले जातात त्यामुळे पावसाचे पाणी देखील थांबत नाही. कधीकधी रेल्वे रुळांमधील ही खडी जोराच्या पावसात वाहून जातात. त्यामुळे सर्वप्रथम दगडी खडी टाकण्याचे काम तत्परतेने केले जाते.

 

rail track staff 2 InMarathi

 

रेल्वे रूळ टाकताना भक्कम पायाच्या रुपात सर्वप्रथम ही दगडी खडी टाकली जाते आणि नंतर त्यावर लाकडाच्या पट्ट्या बसवल्या जातात.

या दगडी खडीमुळेच कित्येक रेल्वेच्या दुर्घटना टाळल्या जातात. शिवाय या खडीचा आणखीन एक फायदा म्हणजे रुळाच्या आजूबाजूला कसलही गवत किंवा पावसाळ्यात उगवणार शेवाळं इथे उगवू नये! यासाठी सुद्धा रेल्वे रुळांमध्ये नियमितपणे खडी भरली जाते!

 

railway tracks inmarathi

 

आणि ती खडी भरल्याशिवाय तो रूळ वापरता येणं देखील अशक्य असते!

शिवाय  रेल्वे जेंव्हा एखाद्या परिसरातून जाते तेंव्हा तिच्या वेगामुळे प्रचंड कंपनं निर्माण होतात आणि या कंपनांचा तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होऊ शकतो, म्हणूनच या कंपनांची तीव्रता कमी करण्यासाठी सुद्धा त्या रुळावर खडी टाकली जाते!

Untitled

तर या काही कारणांमुळे रेल्वे रुळांवर खडी टाकली जाते आणि या खडीमुळेच आपली रेल्वे हे वेगवांधावू  शकते! आणि ही गोष्ट फक्त भारतातच नव्हे तर सगळ्या जगात लागू होते, कित्येक प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा रेल्वे रुळांवर या खडीचा वापर करतात!

याला म्हणतात मूर्ती लहान पण काम महान!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?