'असं नेमकं काय आहे 'रशियाकडे', जे बघून अमेरिकेच्या मनात सुद्धा 'धडकी' भरते!

असं नेमकं काय आहे ‘रशियाकडे’, जे बघून अमेरिकेच्या मनात सुद्धा ‘धडकी’ भरते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज जागतिक महासत्ता होऊन पाहणाऱ्या देशांच्या शर्यतीत हा रशिया प्रबळ दावेदार आहे. जगातील सगळ्यात मोठा देश असलेल्या या राष्ट्राला सांभाळणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही.

या देशाचा सर्वोच्च व्यक्ती देखील तितकाच कठोर असला पाहिजे आणि याबाबतीत रशियाने नशीब काढले असे म्हणावे लागेल!

कारण जगातील सर्वात धाडसी आणि महत्त्वकांक्षी राष्ट्रपती वाल्दीमिर पुतीन त्यांच्याकडे आहेत.

 

vladimir putin inmarathi
business insider

 

कोणत्याही देशाला जगावर निरंकुश वर्चस्व गाजवायचे असेल, तर त्यांची संरक्षण यंत्रणा ही अतिशय सक्षम असावी असे म्हटले जाते.

अमेरिकेने देखील याच संरक्षणाच्या आणि शस्त्रास्त्रांच्या बळावर आज जागतिक महासत्तेचे पद कमावले आहे आणि त्यांच्या याच पदाला धक्का देतोय रशिया, कारण रशियाने देखील महासत्ता होण्यासाठी काय गरजेचे आहे हे अचूक ओळखले आहे.

गेल्या काही वर्षांतील रशियन लष्कराचा आढावा घेतला तर लक्षात येते की, जगातील सर्वात प्रभावी शस्त्रे बनवण्याकडे त्यांचा कल आहे.

आज आम्ही तुम्हाला रशियाकडे असणाऱ्या अश्याच काही प्रभावशाली शस्त्रे आणि साधनांची ओळख करून देणार आहोत, जी येणाऱ्या काळात रशियाच्या सामर्थ्याचे दाखले देऊ शकतात.

 

अरमाता टँक T-14

 

armata tank t-14-marathipizza
nationalinterest.org

 

हे टँक पाच हजार मीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य शोधण्यास सक्षम आहे. त्याची मारक क्षमता ७०००-८००० मीटर आहे. टँकमध्ये तीन क्रू मेंबर बसण्याची सुविधाही आहे.

आर्मरची मजबुती ९०० एमएम असल्याने क्रू मेंबर्सला त्यामुळे सुरक्षा कवच मिळते.

टी-14 ची जास्तीत जास्त स्पीड ताशी ९० किमी एवढी आहे. रिव्हर्स मोडवर हे टँक ५०० किमीपर्यंत प्रवास करू शकते.

हे टँक युद्धादरम्यान ऑटोमॅटिक ऑपरेट होऊ शकतात असा दावा, ते तयार करणाऱ्यांनी केला आहे.

 

बोरे क्लास न्युक्लिअर सबमरीन

 

borei class submarine -russian-marathipizza
pinterest.com

 

रशियाकडे असलेले हे न्युक्लिअर पॉवर सबमरीन जगासाठी मोठे आव्हान आहे. रशियाच्या या क्लास सबमरीनचा अमेरिकेनेही धसका घेतलेला आहे.

 

Mi-28 NM हेलिकॉप्टर

 

Mi-28NM_Helicopter-marathipizza
indiandefensenews.in

 

हे हेलिकॉप्टर नाइट हंटर टँक किलर गनबोटचे अॅव्हान्स व्हेरियंट आहे. नाइट ऑपरेशन्ससाठी या हेलिकॉप्टरमध्ये नवे सेन्सर्स आणि नवीन रडार सिस्टीम आहे.

त्याशिवाय पायलटनाही अपग्रेडेड हेलमेट्स दिले जाणार आहेत.

 

सुखोई T-50 (PAK FA)

 

pak-FA-marathipizza
forumgarden.com

 

हे सुखोईचे नेक्स्ट जेनरेशन फायटर जेट आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता यात आहे. याचा किमान वेग ताशी २,४४० किमी आहे.

रशियाकडे असलेले सुखोई सिरिजचे फायटर जेट्स जगातील सर्वात शक्तीशाली फायटर जेट्स आहेत.

१९८५ मध्ये रशियाने पहिले सुखोई-२७ तयार केले होते. त्यानंतर सुखोई-३० मल्‍टी रोल फायटर, सुखोई-३४ फायटर बॉम्‍बर आणि सुखोई-३५ इंटरसेप्‍टर देखिल तयार केले.

 

RS-24 Yars इंटर-कॉन्टीनेंटल बॅलिस्टीक मिसाइल

 

rs-24 yars intercontinental ballistic missile-marathipizza
reddit.com

 

हे रशियाचे फिफ्थ जनरेशन इंटर-कॉन्टीनेंटल बॅलिस्टीक मिसाइल आहे. हे मिसाइल ११ हजार किमीहून अधिक अंतरावर मारा करू शकते.

२०१४ मध्ये वर्तवण्यात आलेल्या एका अंदाजानुसार रशियाने असे ५० मिसाइल तैनात केले आहेत.

हे मिसाईल ४९,००० किलो वजनाचे असून सेकंदाला ६,८०६ मीटरच्या वेगाने लक्ष्य साधण्याची क्षमता यात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२० पर्यंत रशिया असे १०८ मिसाईल तैनात करणार आहे.

 

एस-400एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम

 

s-400 air defence missile system-marathipizza
sputniknews.com

 

या मिसाइलमध्ये ४०० किमी अंतराच्या रेंजमध्ये येणारे शत्रूचे एअरक्राफ्ट, फायटर जेट, स्टील्थ प्लेन, मिसाइल आणि ड्रोन पाडण्याची क्षमता आहे.

रशियाच्या एस-४०० डिफेन्स सिस्टममध्ये वेगवेगळी क्षमता असलेले तीन मिसाइल आहेत. हे न्यू जनरेशनचे अँटी एअरक्राफ्ट-अँटी मिसाइल सिस्टीम आहे.

हे सुपरसोनिक आणि हायपरसोनिक मिसाइल १२०-४०० किमी रेंजमध्ये असलेले कोणतेही टार्गेट सहजपणे पाडू शकते.

रशियन एक्सपर्टसच्या दाव्यानुसार एस-४०० मिसाइल सिस्टीममध्ये जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता आहे.

रडारवर न दिसणाऱ्या स्टील्थ मोडच्या फिफ्थ जनरेशन फायटर जेटला (अमेरिकन एफ-३५ फायटर जेट) पाडण्याची क्षमताही यात आहे.

आता तुमच्या लक्षात आलेच असेल की रशियाची प्लानिंग किती जबरदस्त आहे ते!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?