लाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जर तुम्हाला सुद्धा तुमचा लाईफ इन्शुरन्स किंवा मेडीकल पॉलिसी काढायची इच्छा असेल आणि तुम्हालाही प्रश्न पडले असतील की लाईफ इन्शुरन्स कोणत्या कंपनी कडून घ्यावे आणि कोणती पॉलिसी घ्यावी आणि किती रकमेची घ्यावी? तर तत्पूर्वी या खालील गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

 

life-insurance-marathipizza01
policyx.com

 

१. कवर आणि बजेटची किंमत ठरवा

विमा घेताना सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्या की विमा कवर किती आहे. त्यासाठी तुम्ही पर्सनल फाइनान्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता. विमा कवर बद्दल संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच लाईफ इन्शुरन्स घ्या.

 

२. कंपनीची बद्दल रिसर्च करा

कोणत्याही कंपनीकडून लाईफ इन्शुरन्स घेण्याआधी त्या कंपनीबद्दल लोकांना कसे अनुभव आले आहेत ते जाणून घ्या. कोणत्याही कंपनीकडे जाण्याअगोदर त्यांच्या क्लेम सेटलमेंट बद्दलचा इतिहास जाणून घेणे देखील आवश्यक आहे. जर एखाद्या कंपनीचा क्लेम सेटलमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, तर इन्श्युरन्ससाठी त्या कंपनीची निवड करण्यास हरकत नाही.

 

३. नेहमी दोन कंपन्यांची निवड करा

जर तुम्ही जास्त रक्कमेचा विमा घेणार असाल, तर त्यासाठी दोन कंपन्यांकडून विमा घ्या. तुमची जी रक्कम आहे ती समान वाटून  दोन कंपन्यांमध्ये सारख्या रकमेचा विमा बनवा. त्याचा फायदा हा होईल की जर कधी भविष्यात तुम्हाला एक पॉलिसी बंद करायची असेल तर दुसरी निरंतर सुरु राहील. तसेच इन्श्युरन्स प्लान नुसार तुम्हाला दोन्ही कंपन्यांकडून वेगवेगळे लाभही मिळतील.

 

life-insurance-marathipizza02
forbes.com

 

४. पॉलिसीचा कालावधी

जेव्हा कधी तुम्ही विमा घ्याल, तेव्हा त्या पॉलिसीच्या कालावधी बद्दल जाणून घ्या. तुम्ही तुमची पैश्याची गरज आणि आवश्यकता पाहूनच विमा घ्या. जर तुम्हाला लवकर पैसे परत हवे असतील, तर जास्त कालावधीची पॉलिसी अजिबात घेऊ नका.

 

५. पैसे वसूल कसे होतील त्याबद्दल जाणून घ्या

जर तुम्ही मेडिकल पॉलिसी घेत असाल, तर या गोष्टीची नक्की खात्री करून घ्या की, त्यामध्ये डे केयर प्रोसिजर, पूर्वीपासून असलेले आजार, रुग्णालयात भरती होण्याआधीचा आणि नंतरचा खर्च समाविष्ट आहे की नाही. सोबतच हे देखील जाणून घ्या की तुम्हाला कोणत्या खर्चाची रक्कम परत मिळणार आहे आणि त्याबद्दल कोणते नियम व अटी आहेत.

 

६. इतर पॉलिसींसोबत तुलना करा

आजकाल पॉलिसींची तुलना (Comparison) करण्यासाठी कित्येक संकेतस्थळे आहेत, ज्यामध्ये त्यांच्या अटी, विम्याचा हप्ता इत्यादीच्या आधारावर त्यांची तुलना केली जाते. त्यामुळे कोणताही विमा घेण्याआधी आपल्या पॉलिसीची दुसऱ्या पॉलिसीशी तुलना करावी ज्यामुळे तुम्हाला, कोणत्या गोष्टीत आपला फायदा आहे हे लक्षात येईल आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

 

life-insurance-marathipizza03
pinterest.com

 

७. एमडब्लूपीएची ही महिती घ्या

जेव्हा कधी तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्याल तेव्हा एमडब्लूपीए बद्दल नक्की माहिती घ्या. या कायद्यानुसार पॉलिसी घेणारा ही खात्री करून घेऊ शकतो की, विमा धारकाच्या मृत्यू नंतर क्लेमची रक्कम त्याच्या कुटुंबियांनाच मिळेल.

 

८. नियमित हप्त्याची निवड करा

सामान्यत: नियमित (Regular) हप्त्याची पॉलिसी घेणे खूप चांगले आणि फायद्याचे असते, कारण यामुळे टॅक्समध्ये थोडीफार सूट मिळण्याची शक्यता असते.

 

९. फॉर्ममध्ये लबाडी करू नका

जीवनात प्रामाणिकपणा बाळगणे सर्वात चांगली गोष्टआहे. पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म स्वतः भरा. सर्व आवश्यक सत्य गोष्टी सांगताना सावधानी बाळगा. सध्याची मेडिकल स्थिती, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींची माहिती लपवणे आपल्या हितासाठी चांगले नाही, कारण टेस्टवेळी तुम्ही लगेच पकडले जाऊ शकता. त्यातुनही सुटलात तर भविष्यात एखादा नवीन खुलासा झाल्यास त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागू शकतो.

 

life-insurance-marathipizza04
bkic.com

तर अश्या या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य ती इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करून स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?