' साऊथचा हा स्टार आणि बॉलिवूडच्या सिंघममध्ये नेमकी काय बाचाबाची झाली? – InMarathi

साऊथचा हा स्टार आणि बॉलिवूडच्या सिंघममध्ये नेमकी काय बाचाबाची झाली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताची राष्ट्रभाशा कोणती? हा प्रश्न कधी  तुम्हाला पडला आहे? सामान्यांना वाटतं की भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. मात्र वास्तवात या देशाला राष्ट्रभाशाच नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी?

याबाबत वाद आणि वादंग झाल्यानंतर गेली अनेक दशकं हिंदी हीच भारताची अनऑफीशीयल राष्ट्रभाषा आहे.

 

hindi IM

 

गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा यावरुन वादंग माजलं मात्र हे वादंग अलिकडच्या प्रथेनुसार सोशल मिडीयावर वाजलं. दोन सुपरस्टार्समुळे या वादाला तोंड फ़ुटलं आणि नेटकर्‍यांनी आपापल्या बाजू लावून धरल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण कोण होतं वादात?

दाक्षिणात्य स्टार किच्चा सुदिप आणि बॉलिवुड सुपरस्टार अजय देवगण या दोघांत एका सोशल मिडीयावर शाब्दिक चकमक घडली आणि तिथून ही आग सर्वत्र पसरत गेली. सुदिप यानं केलेलं एक विधान अजय देवगणला झोंबलं आणि त्यानं किच्चा सुदिपला हिंदी राष्ट्रभाषेवरुन खडेबोल सुनावले.

 

kiccha sudeep and ajay devgn IM

नेमकं काय म्हणणं आहे किच्चा सुदिपचं?

केजीएफ़ च्या धुंवाधार यशाबाबत नुकत्याच एका नव्या चित्रपटाच्या लॉन्च दरम्यान किच्चा सुदिपनं हिंदी चित्रपट दाक्षिणात्य भाषेत डब होतात यावरुन बॉलिवुडवाल्यांना प्रेक्षकांची गर्दी खेचायला शेवटी डबिंगला शरण जावं लागल्याने आता हिंदी ही राष्ट्रभाषा उरली नसल्याची टिप्पणी केली.

अजय देवगण ही टिप्पणी वाचून वैतागला आणि त्यानं किच्चाला सुनावलं, “भावा, जर हिंदी ही तुझ्यामते राष्ट्रभाषाच नाही तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब का करता? देशभरातील प्रेक्षकांना समजणारी भाषा हिंदीच असल्याने तुम्ही हिंदीत डब करता ना चित्रपट? हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि राहिल. जन गण मन!”

अजय देवगणच्या या विधानानंतर रान पेटलं. दोन गट पडले आणि दोन्ही बाजूकडची लोकं हिरीरीने भांडू लागल्या. काहीजणांच्यामते अगामी चित्रपटासाठी अजय देवगणने वाद मुद्दाम उकरला आहे तर काहींच्या मते किच्चानं राष्ट्रभाषेचा अपमान केला आहे.

 

ajay devgn tweet IM

 

याला उत्तर म्हणून नेटकर्‍यांनी दाखले देत सांगितलं आहे की मुळात हिंदी ही संविधानस्विकृत राष्ट्रभाषाच नाही. हे सगळं कमी म्हणून की काय याला राजकीय रंगही देण्याचा प्रयत्न झाला.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींनी या वादात उडी घेत हिंदीला राष्ट्रभाषा म्हणल्याबद्दल कानपिचक्या दिल्या आणि पुढे असं म्हणलं की, अजय देवगण हा भारतीय जनता पक्षाचा पोपट आहे.

कन्नड, भोजपुरी, तमिळ, तेलगू, मराठी यासारखीच हिंदी देखिल प्रांतिक भाषाच आहे असं सांगून भारत हा विभिन्न भाषांनी नटलेला बगीचा असल्याचं सांगितलं. हिंदी भाषिक वर्चस्व असणार्‍या राजकीय पक्षांकडून हिंदीचं महत्व वाढविण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न चालल्याचंही त्यांनी म्हणलं.

एकीकडे हा वाद पेटलेला असतानाच ज्या दोघांमुळे हा वाद सुरू झाला त्या किच्चा आणि अजयनं मात्र समंजसपणे गैरसमज दूर करत या वादावर माती टाकली आहे.

 

kiccha and ajay IM

 

या दोघांत समेट झाला असला तरीही नेटकर्‍यांचा उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाहीये. एकूण चित्र बघता पुढील काही दिवस तरी हा विषय ट्रेंडिंग राहिल असा अंदाज आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?