' पुरे झालं इस्लामिक आक्रमणकर्त्यांचं गुणगान: CBSE बोर्डचा ऐतिहासिक निर्णय! – InMarathi

पुरे झालं इस्लामिक आक्रमणकर्त्यांचं गुणगान: CBSE बोर्डचा ऐतिहासिक निर्णय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जीवनात प्रगती करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच आपले व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये शिक्षणाचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे शाळेमध्ये मुलांना योग्य ते धडे शिकवले गेले पाहिजे.

आपल्या भारत देशाला गौरवशाली असा इतिहास आहे, परंतु CBSE बोर्डमधील पुस्तकांमध्ये नेहमीच भारताच्या पराभवाचा आणि इस्लामीक आक्रमणकर्त्यांचं महिमंडन केले गेले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही दिवसांपूर्वी सीबीएसई ने जाहिर केले आहे की, मुघल आणि कवी फैज यांच्यावर आधारित असलेले अभ्यासक्रमामधील सर्व धडे अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येतील….!

 

CBSE IM

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या जाहीर झालेल्या अभ्यासक्रमात इयत्ता ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमामध्ये काहीसा बदल करण्यात आला असून, काही प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे.

नवीन अभ्यासक्रमामध्ये अनेक धडे काढून टाकण्यात आले आहे.

सीबीएसईने काढलेले धडे :-

सीबीएसईने इयत्ता ११ आणि १२वीच्या राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन विषयांच्या अभ्यासक्रमातून असंलग्न चळवळ, शीतयुद्धाचा काळ, अफ्रीका-आशियाई प्रदेशात इस्लामिक साम्राज्यांचा उदय, मुघल दरबारांचा इतिहास आणि औद्योगिक क्रांतीशी संबंधित प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे इयत्ता १०वीच्या अभ्यासक्रमातील ‘अन्न सुरक्षा’ या विषयातून ‘शेतीवरील जागतिकीकरणाचा परिणाम’ हा विषय वगळण्यात आला आहे.

यासोबतच ‘धर्म, जातीयवाद आणि राजकारण-सांप्रदायिकता धर्मनिरपेक्ष राज्य’ या खंडातील फैज अहमद फैज यांच्या दोन उर्दू कवितांचा अनुवादित अंशही यंदा वगळण्यात आला आहे.

 

faiz ahmad faiz IM

 

सीबीएसई वेबसाइटवरील माहितीनुसार, इयत्ता ११वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या अध्यायांपैकी एक म्हणजे, ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’ शीर्षकाचा धडा, अफ्रीकन-आशियाई प्रदेशांमध्ये इस्लामिक साम्राज्यांचा उदय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि समाजावरील परिणामांशी संबंधित आहे.

हा धडा प्रामुख्याने इस्लामचा उदय, खिलाफत साम्राज्य आणि साम्राज्याच्या उभारणीवर्य विशेषतः लक्ष केंद्रित करतो.

 

central islamic lands IM

 

सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमामधून ‘लोकशाही आणि विविधता’ या विषयावरील अध्याय देखील काढून टाकण्यात आले आहेत. विषय किंवा अध्याय हटवण्याच्या तर्काबद्दल विचारले असता, अधिकाऱ्यांनी सांगितले की हा बदल अभ्यासक्रमाच्या तर्कशुद्धतेचा एक भाग आहे, त्याचसोबत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शिफारशींनुसार आहे.

याचबरोबर आम्हाला अभ्यासक्रमचा स्वरूप ही कमी करायचा आहे. सीबीएसईने जाहीर केले आहे की, इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासक्रमाचा व्याप सुमारे ३०% ने कमी करण्यात येईल.

तसेच २०२२-२३ या शैक्षणिक सत्रासाठी शाळांसोबत सामायिक केलेला अभ्यासक्रमात मागील वर्षी सुरु केलेल्या एका सत्रामध्ये दोन परीक्षेच्या जागी आता एकल-बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे.

 

students IM

 

तथापि, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा दोन भागांमध्ये आयोजित करण्यात आली होती, आणि या प्रकारची परीक्षा तेव्हाची परिस्थिती बघून विशेष उपाय म्हणून जाहीर करण्यात आली होती. सध्या बोर्डाने सांगितले आहे की, यावर्षीदेखील परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतले जाईल.

याआधी पण बऱ्याच वेळा अभ्यासक्रममध्ये बदल :-

२०२० मध्ये पण असाच मोठा वाद झाला होता, जेव्हा सीबीएसईने ११वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात नोटबंदी, संघराज्य, नागरिकत्व, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता या विषयांचा समावेश केला जाणार नाही, असे म्हटले होते. परंतु जर संबंधित शाळांना हे अध्याय शिकवायचे असल्यास ते शिकवू शकतात, असेही बोर्डाने म्हटले होते.

अभ्यासक्रमामध्ये झालेल्या बदलानंतर एका शिक्षिकेचे मनोगत :-

रोहिणी येथील एका सरकारी शाळेतील इतिहासाची शिक्षीका म्हणाली की, “भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक नागरिकाने वेगवेगळ्या धर्मांचे सखोल ज्ञान घेणे आवश्यक आहे. ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’ या अध्यायामध्ये इस्लामचा सविस्तर अभ्यास होता – त्यामध्ये इस्लामच्या उत्पत्तीपासून तर आतापर्यंत अनेक घडामोडी बद्दल वर्णन केले होते.

 

rulers IM

 

त्याचप्रमाणे, मुघल दरबाराशी संबंधित प्रकरण हा वर्ग १२ च्या अभ्यासक्रमातील मध्ययुगीन इतिहासाचा केंद्रबिंदू होता. हे दोन विषय काढून टाकणे पूर्णपणे तर्कहीन आहे. हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा अपमान आहे.”

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?